News Flash

गॅस सिलिंडरचा स्फोट झाला तर कसा करतात विम्याचा क्लेम?

एलपीजी कनेक्शन घेणाऱ्या प्रत्येक ग्राहकाला मोफत इन्श्युरन्स मिळतो

LPG gas cylinder accident insurance : एलपीजी गॅस कनेक्शन घेणाऱ्या प्रत्येक ग्राहकाला मोफत इन्श्युरन्स (अपघात विमा) मिळतो. यासाठी ग्राहकाला वेगळा अपघात विमा घ्यायची गरज नाही. गॅस कनेक्शन घेताना अपघात विमा तुम्हाला मोफत मिळतो. गॅस सिलिंडरच्या स्फोटामध्ये व्यक्तीचा मृत्यू झाल्यास कंपनी प्रत्येक व्यक्तीला सहा लाख रुपये नुकसान भरपाईच्या रुपाने देते. याशिवाय स्फोटामध्ये घर किंवा प्रॉपर्टीच नुकसान झालं असेल तर दोन लाख रुपयापर्यंत नुकासान भरपाई मिळते.

अपघात विम्याची रक्कम देण्यापूर्वी कंपनी स्फोट झालेल्या ठिकाणाची तपासणी करते. स्फोट किंवा अपघात गॅस सिलेंडरमुळेच झाला आहे का? हे या तपासात पाहिलं जातं. तपासादरम्यान कंपनीला जर गॅस सिलिंडरमुळे अपघात झाला असून त्यामध्ये नुकासान झाल्याचं समोर आल्यास योग्य ती नुकासान भरपाई दिली जाते. ग्राहकाला विमा कंपनीमध्ये या अपघातासाठी क्लेम किंवा संपर्क करण्याची गरज नाही.

विम्याची रक्कम मिळवण्यासाठी काय करावं लागेल?

– सर्वात आधी जवळील पोलीस स्टेशनमध्ये तक्रार नोंदवा, एएपआयआर दाखल करा.

– गॅस डिस्ट्रीब्यूटरला एफआयआरची एक प्रत द्या

– गॅस डिस्ट्रीब्यूटर तुमची एफआयआर प्रत तेल कंपनीला पाठवेल.

– विमा कंपनीची एक टीम घटनास्थळावर दाखल होईल आणि तपास करेल.

– तपासानंतर गॅस सिलिंडरच्या स्फोटामुळे झालेलं नुकसानाची रक्कम ही टीम ठरवेल.

– तेल कंपनी क्लेम केलेली रक्कम वितरकाकडे पाठवले.

– वितरक ही रक्कम ग्राहक किंवा त्याच्या परिवाराला सुपूर्द करेल.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on July 27, 2020 12:51 pm

Web Title: lpg gas cylinder accident insurance claims learn full process here nck 90
Next Stories
1 मुलीच्या नावे बक्कळ पैसा जमा होणाऱ्या सुकन्या समृद्धी योजनेबद्दल या गोष्टी माहित आहेत का?
2 “करोना कवच” की “करोना रक्षक”, कोणता आरोग्य विमा निवडाल?
3 रिलायन्स इंडस्ट्रीज सरकारला नक्की किती टॅक्स देतं?; जाणून घ्या
Just Now!
X