News Flash

जाणून घ्या ‘बजेट’ या शब्दाची उत्पत्ती कशी झाली

‘बजेट’ शब्द प्रचलित होण्यामागे एक गंमतीदार किस्सा आहे.

जाणून घ्या ‘बजेट’ या शब्दाची उत्पत्ती कशी झाली
'बजेट' या शब्दाची उत्पत्ती कशी झाली

‘बजेट’ हा शब्द आपल्या आयुष्यातील अविभाज्य घटक आहे. आपल्या उत्पन्नातून किती पैसे आपण कशाकशावर खर्च करणार याच्या अंदाजाला आपण सर्वसाधारणपणे ‘बजेट’ असं म्हणतो. परंतु ‘बजेट’ हा शब्द आला तरी कुठून? या शब्दाची नेमकी उत्पत्ती कशी झाली? किंवा ‘बजेट’ हा शब्द कसा प्रचलित झाला?

‘बजेट’ या शब्दाची निर्मिती फ्रेंच शब्द ‘बुजेत’पासून झाली आहे. या शब्दाचा अर्थ ‘चामड्याची पिशवी’ असा होतो. फ्रेंच मंडळी पैसे सुरक्षित ठेवण्यासाठी चामड्याच्या पिशवीचा वापर करत. या पिशवीला ते ‘बुजेत’ असे म्हणत.

असा झाला बुजेतचा ‘बजेट’?

‘बजेट’ शब्द प्रचलित होण्यामागे एक गंमतीदार किस्सा आहे. १७३३ साली इंग्लंडचे माजी अर्थमंत्री सर रॉबर्ट वॉलपोल वार्षिक अर्थसंकल्प सादर करण्यासाठी संसदेत आले होते. येताना त्यांनी स्वत:सोबत एक चामड्याची पिशवी देखील आणखी होती. याच पिशवीत त्यांनी अर्थसंकल्पाचे कागदपत्र ठेवले होते. ती पिशवी खोलताना त्यांनी ‘बुजेत इज ओपन’ असे म्हटले. परंतु ‘बुजेत’ हा शब्द त्यांनी अशा प्रकारे उच्चारला की सभागृहातील इतर मंडळींना तो ‘बजेट’ असा ऐकू आला.

त्यानंतर विरोधकांनी रॉबर्ट वॉलपोल यांची खिल्ली उडवण्यासाठी व आर्थिक नियोजनातील चुका दाखवण्यासाठी ‘बजेट इज ओपन’ या नावाने एक पुस्तिका प्रकाशित केली. परंतु वॉलपोल देखील कच्चे खेळाडू नव्हते. त्यांनी ही खिल्ली खिलाडूवृत्तीने स्विकारत बुजेतला ‘बजेट’ असेच म्हणायला सुरुवात केली. आणि तेव्हापासून बुजेतचे ‘बजेट’ असे नामकरण झाले.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on March 6, 2020 10:32 am

Web Title: maharashtra budget 2020 story of word budget scsg 91
टॅग : Budget 2020
Next Stories
1 Cryptocurrency म्हणजे काय? जाणून घ्या १० खास गोष्टी
2 समजून घ्या सहजपणे: करोनाची भीती नको…
3 कसे काम करते ‘टीव्ही-एसी’चे रिमोट?
Just Now!
X