News Flash

लसीसाठी Cowin वर स्लॉट बुक करताना या चुका केल्या तर कायमचे व्हाल बॅन

कोविन पोर्टलवर नविन नियम व अटी लागू करण्यात आल्या आहेत

लसीकरणासाठी स्लॉट बुक करताना अनेकांना अडचणी येत आहेत

करोनाचा प्रसार रोखण्यासाठी देशभरात लसीकरणाची मोहिम हाती घेण्यात आली आहे. लसीकरण करण्यासाठी कोविन पोर्टलवर नोंदणी करण्याची आवश्यकता असते. अनेक ठिकाणी लस उपलब्ध नसल्याने अनेकांना नोंदणीसाठी अडचण येत आहे. लसीकरणासाठी अनेकांना स्लॉट मिळत नसल्याने अनेक जण दिवसातून अनेक वेळा सर्च रिक्वेस्ट बटणावर क्लिक करत आहे. त्यामुळे पोर्टलसाठी नविन नियम लागू करण्यात आले आहेत.

आता, दिवसभरात लस घेताना स्लॉट बुक करण्यासाठी १००० पेक्षा जास्त वेळा सर्च केल्यास किंवा ५० पेक्षा जास्त वेळा ओटीपी क्रिएट केल्यास कोविनवर ब्लॉक करण्यात येणार आहे. १५ मिनिटांमध्ये २० पेक्षा जास्त वेळा स्लॉट शोधणाऱ्यांचे अकाऊंट देखील आपोआप लॉग आउट होणार आहे अशी माहिती अधिकाऱ्यांनी दिली.

गेल्या काही दिवसांत देशभरात किमान ६,००० वापरकर्त्यांच्या संशयास्पद कृतींमुळे त्यांचे अकाऊंट लॉग आउट करण्यात आले आहे.“आम्ही अशा सर्व युजर्सचा मागोवा घेत आहोत. वारंवार असे करताना आढळल्यास, त्यांना कायमचे ब्लॉक देखील केले जाऊ शकते. बॉट सॉफ्टवेअरचा वापर रोखण्यासाठी आम्ही प्रयत्न करत आहोत” असे अधिकाऱ्यांनी म्हटले आहे,

Covid-19 vaccine registration: लसीकरणासाठी नोंदणी कशी करायची? जाणून घ्या…

पोर्टलवर नवीन सेवा आणि अटी

जर एखाद्या व्यक्तीचे अकाऊंट लॉग आउट असेल आणि  त्यांच्या अकाऊंटमध्ये दुसरे कोणी काही करत असल्यास त्या युजरला कोविन पोर्टलवरुन फोन अलर्ट येणार आहे. पोर्टलवरील नवीन अटींनुसार स्लॉट बुक करण्यासाठी बॉट्ससारख्या सॉफ्टवेअरचा वापर करणे बेकायदेशीर असणार आहे. अशा प्रकारे स्लॉट बुक करणारे मोबाईल नंबरवर आम्ही लक्ष ठेवणार आहोत. त्यांच्यावर कायदेशीर कारवाईदेखील केली जाऊ शकते अशी माहिती केंद्रीय अधिकाऱ्यांनी दिली.

करोना लस प्रमाणपत्रातील चुका कशा सुधाराल, जाणून घ्या…

दिवसभरात लस घेण्यासाठी स्लॉट बुक करण्यासाठी १००० पेक्षा जास्त वेळा सर्च केल्यास किंवा ५० पेक्षा जास्त वेळा ओटीपी क्रिएट करणाऱ्यांना कोविनवर ब्लॉक करण्यात येणार आहे. ज्या ज्या फोन नंबरवरुन अशा प्रकारे स्लॉट बुक करण्याचा प्रयत्न केला जाईल तो नंबर ब्लॉक करण्यात येईल असे पोर्टलच्या अधिकाऱ्यांनी सांगितले.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on June 10, 2021 3:48 pm

Web Title: make these mistakes when booking slots on cowin for vaccines you will be banned forever abn 97
टॅग : Corona,Coronavirus
Next Stories
1 जाणून घ्या : दि. बा. पाटील कोण होते? नवी मुंबई विमानतळाला त्यांचं नाव देण्याची मागणी का केली जातेय?
2 जाणून घ्या: शेतकरी आंदोलनाचं मूळ असलेलं MSP म्हणजे काय?
3 समजून घ्या : रेड अलर्ट म्हणजे काय?; तो कधी जारी करण्यात येतो?
Just Now!
X