करोना व्हायरसमुळे जगभरात भितीचं वातावरण आहे. ३० हजार पेक्षा जास्त लोकांचा या व्हायरसने बळी घेतला आहेत. तर लाखो लोक या व्हायरसच्या चपाट्यात आले आहेत. १९५ देशांमध्ये या व्हायरसने आपली पायमुळं रोवली आहेत. जागतिक आरोग्य संघटनेनं या व्हायरसला महामारी असे घोषित केलं आहे. WHO च्या रिपोर्ट्सनुसार, करोना व्हायरस हा एका व्यक्तीपासून साधारण तीन व्यक्तींमध्ये आणि असं करत काही दिवसांतच १००० लोकांना आपल्या विळख्यात घेऊ शकतो. भारतामध्ये करोना व्हायरसमुळे मृत्यूची आकडेवारी पसत्तीशीपार झाली आहे तर १३०० पेक्षा जास्त जणांना या विषाणूची लागण झाली आहे. या विषाणूमुळे लोकांमध्ये भितीचं वातावरण असून अनेक अफवा उडाल्या आहेत. सरकारने अशा अफवांकडे लक्ष न देण्याचं आवाहन केलं आहे. पाहूयात सरकारने आवाहन केलेल्या १५ अफवांबद्दल…

थंड वातावरण आणि बर्फ करोनाचे विषाणू मारू शकत नाही

करोना व्हायरसचा धोका सर्व वयाचा लोकांना आहे. लहानापासून वयोवृद्ध व्यक्तीला या व्हायरसची लागण होऊ शकते. ज्याची रोगप्रतिकारशक्ती कमी असेल किंवा एखादा रोग आधीच असेल तर करोनाचा धोका जास्त आहे.

हँड ड्रायर मशिननं हात सुकवल्यानं करोनाचे विषाणू मरत नाहीत. त्यामुळे त्याचा वापर प्रभावी ठरत नाही.

कोरोना व्हायरसच्या संसर्गापासून वाचण्यासाठी नियमितपणे मिठाच्या पाण्यानं नाक स्वच्छ धुवावे. याबाबत कोणताही कोणताही पुरावा किंवा संशोधन नाही. त्यामुळे मिठाच्या पाण्याने नाक स्वच्छ धुतल्यामुळे करोना होत नाही यावर विश्वास ठेवू नका.

दमट आणि कोरड्या वातावरणामध्ये करोना व्हायरचे विषाणू लवकर संक्रमित होतात.

अल्ट्राव्हायोलेट लाइट निर्जंतुकीकरणासाठी वापरु नये. त्याचा त्वचेवर वाईट परिणाम होऊ शकतो.

लसूण आरोग्यासाठी चांगले आहे. पण असा कोणताही पुरवा नाही की, लसूण खाल्याने करोना व्हायरस होत नाही.

डासांच्या चावण्यामुळे करोना व्हायरसचा फैलाव होत नाही

थर्मल स्कॅनरद्वारे ताप आहे का नाही हे ओळखू शकतो पण करोना व्हायरस थर्मल स्कॅनरद्वारे करोनाचं निधान करता येत नाही.

प्रतिजैविक (Antibiotics) व्हायरसविरोधात लढत नाही. प्रतिजैविक फक्त बॅक्टेरियाचा नायनाट करतात.

कोणत्याही प्राण्यापासून करोना व्हायरसच्या विषाणूचं संक्रमण होत नाही. मांजर, कुत्रा किंवा इतर कोणत्याही पाळीव प्राण्यापासून करोनाचे विषाणू परसल्याचा कोणताही पुरवा नाही.

संपूर्ण शरिरावर अल्कोहोल किंवा क्लोरीन फवराल्यामुळे शरिरात आतमध्ये असणारे करोनाचे विषाणू मरत नाहीत.

सध्याच्या घडीला करोना व्हायरसवर कोणतेही औषधं किंवा लस उपलबद्ध नाही.

गरम पाण्यानं आंघोळ केल्यामुळे करोना व्हायरसेचे विषाणू मरत नाहीत.