News Flash

PM Kisan Yojana: 2000 रुपये मिळाले नाहीत? अशी करा तक्रार

साडेआठ कोटी शेतकऱ्यांच्या खात्यात पंतप्रधान किसान सन्मान निधीच्या रुपाने १७ हजार कोटी रुपये जमा

(संग्रहित छायाचित्र)

साडेआठ कोटी शेतकऱ्यांच्या खात्यात पंतप्रधान किसान सन्मान निधीच्या रुपाने १७ हजार कोटी रुपये जमा करण्यात आल्याची माहिती पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ९ ऑगस्ट रोजी एका कार्यक्रमादरम्यान दिली. शेतकरी सन्मान योजनाचा हा सहावा हप्ता आहे. शेतकऱ्यांच्या खात्यावर पैसे जमा झाल्याचा आनंद असल्याचं मोदींनी म्हटलं. ही रक्कम प्रत्येकाच्या खात्यावर आली आसेलच. पण तुमचेही पंतप्रधान किसान सन्मान योजनेचं खाते आसेल आणि तुमच्या खात्यात पैसे आले नसतील तर कुठे तक्रार करायची याबद्दल आपण माहिती जाणून घेणार आहोत.

PM Kisan Samman Nidhi Yojana अंतर्गत वर्षाला शेतकऱ्यांच्या खात्यात २००० रुपयांचे तीन हप्ते पाठविले जातात. अशाप्रकारे 6000 रुपये थेट शेतकऱ्यांच्या खात्यात पोहोचतात. पण कधीकधी काही तांत्रिक कारणामुळे रक्कम खात्यावर जमा होत नाही. अशावेळी तुम्ही तक्रार दाखल करु शकता. त्यासाठी केंद्र सरकारनं हेल्पलाईन क्रमांक जारी केलेला आहे. १५५२६१, १८००११५५२६ (टोल फ्री) आणि ०११-२३३८१०९२ या क्रमांकावर तक्रार दाखल करु शकता. pmkisan-ict@gov.in इमेलद्वाराही तुम्ही तक्रार करु शकता. तक्रार केल्यानंतर तुम्हाच्या अडचणीवर योग्य ती दखल घेऊन कारवाई केली जात. त्यामुळे तुमचं समाधान होईल.

प्रधानमंत्री किसान सम्मान निधि योजनेचं खात आणि माहिती घेण्यासाठी https://pmkisan.gov.in/ या आधिकृत संकेतस्थळावर जा. संकेतस्थळावर गेल्यानंतर ‘Farmers Corner’ वर क्लिक करावे. त्यानंतर ‘Beneficiary Status’ चा पर्यावर क्लीक करा. त्यानंतर नवीन पेज ओपन होईल. या पेजवर तुम्हाला सर्व माहिती भरावी लागेल. आधार क्रमांक, बँक खाते क्रमांक किंवा मोबाईल नंबर ही सर्व माहिती टाकावी लागेल. यानंतर ‘Get Data’ वर क्लिक केल्यास सर्व माहिती येईल. ही सर्व प्रक्रिया पूर्ण झाल्यावर जर तुम्हाला पेजवर ‘FTO is generated and Payment confirmation is pending’ अशी माहिती आली तर याचा अर्थ तुमच्या खात्यामध्ये लवकरच २००० रुपयांचा हप्ता येणार आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on August 17, 2020 11:20 am

Web Title: pradhan mantri kisan samman nidhi yojana didnt you get 2000 rupees installment of pm kisan nidhi complain like this nck 90
Next Stories
1 सिम स्वॅपिंग म्हणजे काय? ज्याद्वारे तुमच्या बँकेतील पैसे होऊ शकतात लंपास
2 १५ ऑगस्ट रोजीच भारताला का मिळालं स्वातंत्र्य… जाणून घ्या कारण
3 Taxpayers Charter आजपासून देशात लागू; जाणून घ्या याचा नक्की काय फायदा होणार
Just Now!
X