सध्याच्या घडीला एकतरी आरोग्य विमा (Term Insurance Plan)असणं गरजेचं आहे. पण आधिकच्या प्रीमियम शुल्कामुळं अनेकजण आरोग्य विमा घेणं टाळतात. अशाच सर्वसामान्य लोकांसाठी पंतप्रधान जीवन ज्योती विमा योजना (Pradhan MantriJeevan Jyoti Bima Yojna) एक चांगला पर्याय आहे. पंतप्रधान जीवन ज्योती योजनेअंतर्गत (PMJJBY) एखाद्या व्यक्तीचा अपघातात मृत्यू झाल्यास त्याच्या वारसाला विम्याची दोन लाख रूपयांची रक्कम दिली जाते. यासाठी फक्त भारतीय असणं एवढी एकच अट आहे.

म्हणून प्रधानमंत्री जीवन ज्यो​ती विमा योजनेला द्या पसंती

एक वर्षांचे विमा संरक्षण असणारी ही एक आयुर्विमा योजना आहे. या योजनेचे दर वर्षी नूतनीकरण आवश्यक आहे.

१८ ते ५० वयोगटातील सर्व बचत बँक खातेधारक या योजनेत सहभागी होऊ शकतील. एकाच व्यक्तीची अनेक बचत खाती असतील तर अशी व्यक्ती कुठल्याही एका बचत खात्याद्वारे हा विमा उतरवू शकेल. विमा उतरविणाऱ्या व्यक्तीचा आधार क्रमांक पायाभूत मानला जाईल.

योजनेचा कालावधी दर वर्षी १ जून ते ३१ मे असा राहील व विमा हप्ता बँक खात्यात परस्पर नावे टाकला जाईल. पुढील वर्षांच्या नूतनीकरणाचा अर्ज ३१ मेपर्यंत देणे आवश्यक राहील. योजनेत सहभागी होण्यासाठीचा काळ सरकार सुरुवातीला ३ महिनेपर्यंत वाढवू शकते.

विमाधारकाचा कुठल्याही कारणाने मृत्यू झाला तर वारसास रु. २ लाख भरपाई मिळेल.

विमा हप्ता ३३० रुपये प्रति व्यक्ती प्रति वर्ष राहील व बँक बचत खात्यात परस्पर नावे टाकला जाईल.

विमाधारकाने वय वर्षे ५५ पूर्ण केल्यावर / बँकेच्या बचत खात्यात विमा हप्ता नावे टाकण्यास पुरेशी शिल्लक नसेल तर / बँक खाते बंद केले तर विमा संरक्षण संपुष्टात येईल.

तांत्रिक अडचणीमुळे संपुष्टात आलेली विमा पॉलिसी काही अटींची पूर्तता केल्यावर पुन्हा चालू करता येईल.

ठळक वैशिष्टय़े
रुपये ३३० वार्षिक हप्ता
लाभार्थी वयोगट १८ ते ५०

लाभ – मृत्यू झाल्यास २ लाख रुपये भरपाई

अट – फक्त बँकेत खाते असणे आवश्यक.

अधिक माहितीसाठी टोल फ्री क्रमांक

महाराष्ट्रासाठीचा टोल फ्री क्रमांक : महाराष्ट्र बँक – १८००-१०२-२६३६
राष्ट्रीय टोल फ्री क्रमांक : १८००-१८०-११११ /१८००-११०-००१