– संदीप नलावडे

‘कुकरच्या तीन शिट्टय़ा झाल्या की गॅस बंद कर..’ घरोघरी महिलावर्गाकडून केल्या जाणाऱ्या या आदेशांचे पालन आपल्यापैकी बहुतेकांनीच केले असेल. प्रेशर कुकर हे आपल्या मुदपाकखान्यातील एक महत्त्वपूर्ण ‘पाक उपकरण’. वेळ आणि इंधन वाचवून वाफेच्या साहाय्याने पदार्थ शिजवणाऱ्या या उपकरणाला ३५० वर्षांचा इतिहास आहे.

A chance for historic success for Indian chess players sport news
भारतीय बुद्धिबळपटूंना ऐतिहासिक यशाची संधी!
Iran Israel Attack Live Updates in Marathi
Iran Attack Israel : “आमच्यावर कोणी हल्ला करत असेल तर….”, भारतातील इस्रायलच्या राजदूतांनी दिला इशारा
Vidit Gujarathi defeated Hikaru Nakamura in the Chess Candidates competition sport news
विदितचा नाकामुराला धक्का; गुकेशचा प्रज्ञानंदवर विजय; हम्पीची सलग दुसरी बरोबरी
Nagpur Central Jail, Notorious Gangster, Chetan Hazare , Assaulted by Inmate, crime news, police,
धक्कादायक! मध्यवर्ती कारागृहात टोळीयुद्ध, टिनाच्या पत्र्याने प्राणघातक हल्ला

वाफेच्या जोरावर फडफडणारी चहाची किटली पाहिली आणि जेम्स व्ॉट या स्कॉटिश संशोधकाने वाफेच्या इंजिनाचा शोध लावला. हा वैज्ञानिक इतिहास सर्वानाच ज्ञात आहे. जेम्स व्ॉटने १७६९ मध्ये वाफेच्या इंजिनाचा शोध लावला असला तरी त्याच्या ९० वर्षांपूर्वी म्हणजेच १६७९ मध्ये डेनिस पॅपिन या फ्रेंच भौतिकशास्त्रज्ञाने वाफेच्या जोरावर अन्न शिजवणाऱ्या ‘स्टीम डाइजेस्टर’चा शोध लावला होता. डेनिसचे ‘स्टीम डाइजेस्टर’ म्हणजे आताच्या प्रेशरचे कुकरचेच प्राथमिक रूप. लंडनच्या ‘रॉयल सोसायटी’समोर डेनिसने आपले हे संशोधन सादर केले. त्या वेळी डेनिसच्या या संशोधनाचे कौतुक झाले. मात्र या उपकरणाचा घरगुती वापर करणे कठीण होते. कारण त्यासाठी भलीमोठी भट्टीची गरज भासायची. त्यामुळे हे उपकरण हॉटेल आणि कारखान्यांमध्ये वापरले जाई.

डेनिसच्या शोधानंतर जॉर्ज गटब्रॉड या जर्मन शास्त्रज्ञाने १८६४ ओतीव पोलादाचा वापर करून प्रेशर कुकरचे उत्पादन सुरू केले. मात्र त्याचा उपयोग कारखान्यांमध्येच केला जात असे. अमेरिकेच्या नॅशनल प्रेस्ट्रो इंडस्ट्रीनेही १९१७ मध्ये कारखान्यांमध्ये वापर केल्या जाणाऱ्या प्रेशर पॅनचे उत्पादन करण्यास सुरुवात केली होती. मात्र घरगुती वापरासाठी पहिला प्रेशर कुकर बनवला आल्फ्रेड व्हीशरने. न्यूयॉर्कमध्ये १९३८ मध्ये भरलेल्या व्यापार प्रदर्शनात व्हीशरने आपले संशोधन सादर केले आणि पुढील वर्षी न्यूयॉकमध्येच भरणाऱ्या जागतिक संशोधन प्रदर्शनासाठी त्याला संधी मिळाली. आपल्या या प्रेशर कुकरला त्याने नाव दिले प्रेस्टो (स्र्१ी२३). झटपट अन्न शिजवणाऱ्या या ‘प्रेस्टो’चे महिला वर्गात खूपच कौतुक झाले आणि या ‘पाक उपकरणा’ला जगमान्यता मिळाली. पुढे तर प्रेस्टो हा शब्द अमेरिकेत प्रेशर कुकरचा समानार्थी शब्द झाला. अमेरिकेत मग प्रेशर कुकरचे उत्पादन करण्यासाठी अनेक कंपन्या पुढे आल्या. १९४१ मध्ये अमेरिकेत घरगुती उपकरणामध्ये सर्वाधिक उत्पादन प्रेशर कुकरचे होत असे. त्या वेळी ११ कंपन्या प्रेशर कुकरचे उत्पादन करत होत्या.

प्रेशर कुकरला खरे महत्त्व आले दुसऱ्या महायुद्धाच्या काळात. युद्धात लढणाऱ्या सैनिकांना अन्नपदार्थाची कमतरता भासू नये यासाठी ‘व्हिक्टरी गार्डन’ ही चळवळ उभारण्यात आली. सामान्य जनतेकडून सनिकांसाठी भाज्या, फळे आणि अन्य अन्नपदार्थ पुरवले जाई. हे अन्नपदार्थ साठवून ठेवण्यासाठी प्रेशर कुकरचा मोठय़ा प्रमाणात उपयोग केला गेला. १९४२ मध्ये प्रेशर कुकरची विक्री होती केवळ ६६,०००. मात्र ‘व्हिक्टरी गार्डन’ चळवळीमुळे ही विक्री पाचपटीने वाढली. १९४३ मध्ये ३,१५,००० प्रेशर कुकर विकले गेले. महायुद्ध संपल्यानंतर प्रेशर कुकरचे महत्त्व वाढले आणि ५० पेक्षा अधिक कंपन्यांनी त्याचे उत्पादन सुरू केले. सत्तरच्या दशकानंतर प्रेशर कुकरचा वापर वाढू लागला आणि घरोघरी या ‘पाक उपकरणा’ची शीळ वाजू लागली.

sandeep.nalawade@expressindia.com