24 February 2020

News Flash

आपल्या रक्ताचा रंग लालच का असतो?

रक्ताचा रंग लालच का असतो या मागील कारण तुम्हाला ठाऊक आहे का?

why blood is red

प्रश्न: आपल्या रक्ताचा रंग लालच का असतो?

उत्तर : रक्तात असणाऱ्या हिमोग्लोबिन या प्रथिनामुळे आपल्या रक्ताचा रंग लाल होतो. हिमोग्लोबिनमध्ये ‘हीम’ हा लाल रंगाचा घटक असतो. हिममध्ये असणारे लोह हे ऑक्सिजनबरोबर क्रिया करून शरीरात सर्वत्र ऑक्सिजन पोहोचविण्याचे काम करतो. लोहात लाल रंग परावíतत करू शकण्याची क्षमता असते. तसे बघता एखादी वस्तू आपल्याला विशिष्ट रंगाची का दिसते? प्रकाशकिरण त्या वस्तूवर पडल्यावर काही किरणे ती वस्तू परावर्तित करते तर काही शोषून घेते. जो रंग ती (विशिष्ट रंगाची तरंगलांबी (वेव्हलेंथ ) असणारे किरण) वस्तू परावर्तित करते त्या रंगाची ती वस्तू आपल्याला दिसते. ऑक्सिजनबरोबर असणारा हिमोग्लोबिनचा रेणू निळा व हिरवा रंग शोषून घेतो व लाल रंगाला परावर्तित करतो म्हणून आपल्याला रक्त तांबडय़ा रंगाचे दिसते.

– डॉ. मनीषा कर्पे (मराठी विज्ञान परिषद, अंबरनाथ विभाग)

First Published on February 4, 2020 4:48 pm

Web Title: why blood is red scsg 91
Next Stories
1 थंडीच्या दिवसांमध्ये त्वचा कोरडी का पडते?
2 हिवाळ्यामध्येच झाडाची पाने का गळून पडतात, तुम्हाला ठाऊक आहे का?
3 Coronavirus: जागतिक आरोग्य आणीबाणी म्हणजे काय?
Just Now!
X