24 February 2020

News Flash

थंडीच्या दिवसांमध्ये त्वचा कोरडी का पडते?

थंडीमध्येच त्वचेला कोरडेपणा का येतो जाणून घ्या

त्वचा कोरडी का पडते?

प्रश्न:
थंडीत त्वचा कोरडी का पडते?

उत्तर:

आपली त्वचा हे एक संरक्षणात्मक कवच आहे. या कवचाचे अंत:त्वचा (डर्मिस) आणि बाह्यत्वचा (इपीडर्मिस) असे दोन भाग आहेत. बाह्यत्वचेमध्ये पेशींचे एकावर एक असे अनेक थर असतात. हे थर जिवाणू-विषाणू व इतर रोग संक्रमणासाठी सुरक्षाकवच म्हणून काम करतात. सर्वात आतील थर नियमितपणे नव्याने तयार होतो, बाहेरील थर मृत होतो. अंत:त्वचेमध्ये मेदाम्लांचा थर असतो, या थरात तैलग्रंथी [सेबॅशियस ग्लॅन्ड] आणि घर्म ग्रंथी [ स्वेट ग्लॅन्ड] असतात. तैलग्रंथीमध्ये सिबम स्रवले जाते, हे सिबम केसांच्या बीजकोषाला तेल पुरवते. या केसाच्या बीजकोषातून केसाची निर्मिती होते, केस आणि तेल/सिबम ग्रंथीच्या नलिकेतून त्वचेवर येतात. त्यामुळे त्वचा मऊ  राहते. घर्मग्रंथीमध्ये घाम स्रवला जातो, घामामध्ये युरिया,अमिनो आम्ले, पाणी, उष्णता असते, त्यामुळे शरीरातील  तापमान व क्षार नियमनाचे काम सुरळीतपणे सुरू असते.

थंडीमध्ये त्वचेतील सर्वात बाहेरील पेशींचा थर मृत होतो आणि झडून जातो, त्वचेला रखरखीतपणा येतो, यास आपण त्वचा फुटली असे म्हणतो. तसेच वातावरणातील तापमान व हवेतील आद्र्रता कमी झाल्यामुळे त्वचेमधून ओलसरपणा बाहेर टाकला जातो, तैलग्रंथींचे कार्य मंदावते आणि त्वचेला कोरडेपणा येतो.

– डॉ. मनीषा कर्पे (मराठी विज्ञान परिषद, अंबरनाथ विभाग)

First Published on February 3, 2020 1:31 pm

Web Title: why skin gets dry in winter scsg 91
Next Stories
1 हिवाळ्यामध्येच झाडाची पाने का गळून पडतात, तुम्हाला ठाऊक आहे का?
2 Coronavirus: जागतिक आरोग्य आणीबाणी म्हणजे काय?
3 टूथब्रशच्या जन्माची कथा आणि इतिहास ठाऊक आहे का?
Just Now!
X