सन २०२० चे शांततेचे नोबेल पारितोषिक संयुक्त राष्ट्रांच्या वर्ल्ड फूड प्रोग्राम (डब्ल्यूएफपी) या संस्थेला देण्यात आले आहे. जगभरामध्ये तवाणपूर्ण आणि युद्धजन्य परिस्थिती असणाऱ्या प्रदेशांमध्ये अन्न पुरवठा करण्याचे आणि तेथे शांततेसाठी काम करणाऱ्या डब्ल्यूएफपीच्या नावाची घोषणा नॉर्वेतील ऑस्लो येथील समिती केली आहे. १९०१ पासून शांततेचे नोबेल पारितोषिक देण्यास सुरूवात झाली व ते नॉर्वे संसदेने नेमलेल्या समितीच्या निवडीनुसार दिले जात आहे. मात्र नोबेलचे इतर सर्व पुरस्कार हे स्वीडनच्या राजधानीत प्रदान केले जात असले तरी शांततेचे नोबेल पारितोषिक नॉर्वेची ऑस्लो येथील समिती का देते असा प्रश्न अनेकांना पडतो. मात्र असं का असावं याबद्दल दोन प्रमुख कारण सांगितली जातात.
नक्की वाचा >> Nobel Peace Prize 2020 : कोणीही उपाशी झोपू नये म्हणून संघर्ष करणाऱ्यांचा सर्वोच्च सन्मान
१९०१ पासून शांततेचे नोबेल पारितोषिक देण्यास सुरूवात झाली व ते नॉर्वे संसदेने नेमलेल्या समितीच्या निवडीनुसार दिले जात आहे; पण हे सगळे आल्फ्रेड नोबेल यांनी व्यक्त केलेल्या इच्छेनुसार होत आहे. त्यांनी शांततेचे नोबेल पारितोषिक स्वीडिश समितीकडून का दिले जात नाही हे मात्र स्पष्टपणे कधीच सांगितलेले नाही. तरीही काही तर्काधिष्ठित कारणे त्यात काढली जातात. नॉर्वेचा राष्ट्रभक्त व ख्यातनाम लेखक बिजोर्नस्टेम जोर्नसन याच्या मते आंतरराष्ट्रीय शांतता चळवळीला असा पुरस्कार देण्यास मान्यता देणारे नॉर्वेचे विधिमंडळ हे पहिले होते. काहींच्या मते नोबेल पारितोषिक वितरणाचे काम नोबेल यांनी स्वीडिश व नॉर्वेच्या संस्थांना वाटून दिले, कारण शांततेचे पारितोषिक हे राजकीय वादात अडकू शकते व ते राजकारणाचे साधन म्हणून वापरले जाऊ शकते. त्यामुळे शांततेसाठी या पुरस्काराचा वापर होण्याऐवजी राजकारणासाठी होईल. नोबेल यांनी त्यांच्या इच्छापत्रात म्हटले आहे की, पारितोषिक दिले जाताना उमेदवाराचे राष्ट्रीयत्व बघितले जाऊ नये, मग ती व्यक्ती स्कँडेनेव्हियन असो किंवा नसो.
विसाव्या शतकात आठ स्कॅंडेनिव्हियनांना शांततेचे पारितोषिक मिळाले; त्यातील पाच स्वीडिश होते व दोन नॉर्वेचे होते. नामांकन व निवड प्रक्रियेत नॉर्वेची नोबेल समिती १९०४ मध्ये स्थापन झाली, तेव्हापासून सचिवाच्या मदतीने काम बघू लागली. ही व्यक्ती संस्थेची संचालकही असे. १९०१ पासून नॉर्वेच्या नोबेल समितीवरही टीका झाली आहे. यंदा हा पुरस्कार संयुक्त राष्ट्रांच्या वर्ल्ड फूड प्रोग्रामला (डब्ल्यूएफपी) मिळाला आहे.
काय आहे वर्ल्ड फूड प्रोग्राम (डब्ल्यूएफपी)
वर्ल्ड फूड प्रोग्राम (डब्ल्यूएफपी) ही संस्था म्हणजे संयुक्त राष्ट्र संघांची उपसंस्था आहे. जगभरामधील भूकेसंदर्भातील समस्या आणि अन्नसुरक्षेच्या क्षेत्रामध्ये या संस्थेचे मागील जवळजवळ ६० वर्षांपासून अधिक काळ काम सुरु आहे. दर वर्षी डब्ल्यूएफपी ही संस्था ८३ देशांमधील ९१ लाख ४० हजार गरजू व्यक्तींना अन्य पदार्थ पुरवते. या संस्थेची स्थापना १९६३ साली झाली आहे. या संस्थेचे मुख्यालय इटलीमधील रोम शहरात आहे. या संस्थेच्या जगभरातील ८० हून अधिक देशांमध्ये शाखा आहेत.
लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.
First Published on October 9, 2020 3:33 pm