Aditi Rao Hydari Gajgamini Walk: संजय लीला भन्साळी यांच्या हीरामंडी या वेबसीरीजचं कथानक आवडण्याच्या बाबत अनेकांची मतं वेगवेगळी असली तरी एका मतावर सगळे ठाम आहेत ते म्हणजे या सीरीजची भव्यता! गाणी, सेट, कपडे, दागिने यांमधील बारकावे प्रेक्षकांच्या मनाला भुरळ घालत आहेत. मनावर ताबा मिळवणारी आणखी एक गोष्ट म्हणजे बिब्बोजान! आदिती राव हैदरीने या सीरीजमध्ये बिब्बोजान हे पात्र अत्यंत सुंदररित्या साकारलंय. बिब्बोच्या मुजऱ्यातील नजाकत, तिचं सौंदर्य जितकं प्रेक्षणीय आहे तितकीच तिची बहिणीला सावरून घेतानाची धडपड, स्वातंत्र्यासाठी चातुर्याने दाखवलेली हिंमत सुद्धा भारावून टाकणारी आहे. दुहेरी पात्र साकारताना आदितीच्या चेहऱ्यावरील खोडकर, मोहक भाव जेव्हा बेधडकपणामध्ये बदलतो तेव्हा ती खरोखरच प्रेक्षकांसाठी एक पर्वणी ठरते.

बिब्बोजानच्या वाट्याला या सीरीजमध्ये दोन सुंदर गाणी आली आहेत. एक म्हणजे ‘सैय्या हटो जाओ’ व दुसरं म्हणजे ‘फूल गेंदवा ना मारो’. यातील पहिल्या गाण्यात आदितीला मुजरा पाहायला आलेल्या नवाब अलीला भुरळ पाडायची असते व ते करताना मोहक हावभाव व मादक नृत्याची सांगड घालत आदिती स्क्रीनवर कमाल करून जाते. या गाण्यातील एका लहान क्लिप सध्या ऑनलाईन प्रचंड चर्चेत आहे. बिब्बो जेव्हा कामुकरित्या पाठमोरी चालत जाते तेव्हा नवाब अलीसह प्रेक्षकही घायाळ होतात. व्हायरल व्हिडीओमध्ये या चालत जाण्याला ‘गजगामिनी चाल’ म्हटलं जातं आहे. हा दावा योग्य आहे का याविषयी जाणून घेण्यासाठी आम्ही कथ्थक विषयातील तज्ज्ञांचा सल्ला घेतला आहे. त्यांचं नेमकं म्हणणं काय, चला पाहूया..

when Tanvi Azmi married Baba Azmi
“एका महाराष्ट्रीय ब्राह्मण मुलीने मुस्लीम पुरुषाशी लग्न…”, अभिनेत्री तन्वी आझमींचं वक्तव्य; म्हणाल्या, “बंडखोरी…”
UP 10th Standard Topper Girl Prachi Nigam Facial Hair Controversy
अगं प्राची, दहावी बोर्डात पहिली आलीस पण चेहऱ्यावरचे केस काढता आले नाही? नक्की लाज कुणी सोडलीये?
unique wedding card Marriage Card viral on social media
अरे बापरे! लग्नपत्रिका वाचूनच घाबरले पाहुणे; लग्नाला जायचं की नाही? VIRAL लग्नपत्रिका पाहून पोट धरुन हसाल
eknath shinde bags checking
नाशिकला उतरताच मुख्यमंत्री शिंदेंच्या बॅगांची हेलिपॅडवरच तपासणी, निवडणूक आयोगाला काय काय आढळलं?
arvind kejriwal
“ही तर यंत्रणेला लगावलेली चपराक”, सर्वोच्च न्यायालयात केजरीवालांच्या भाषणांचा संदर्भ देत ईडीने काय म्हटलं?
Jason Shah Anusha Dandekar break up
“ती मला समजू शकली नाही”, ‘हीरामंडी’ फेम अभिनेत्याने सांगितलं मराठी अभिनेत्रीशी ब्रेकअपचं कारण; म्हणाला…
Woman Strips At Petrol Pump video viral
पेट्रोल पंपावर तरुणीचे लज्जास्पद कृत्य; कर्मचाऱ्यासमोर पँट काढली अन्…; Video व्हायरल
Pm Narendra modi Speech in Nashik
“मोदींनी भाषणात अल्पसंख्याकांचा मुद्दा काढताच, शेतकरी ओरडला कांद्यावर बोला..”, पुढे नेमकं काय घडलं?

कथ्थक नृत्यांगना मंजरी चतुर्वेदी यांनी इंडियन एक्सस्प्रेसशी बोलताना विचारले की, “आदिती राव हैदरी हिने नृत्यात दाखवलेली चाल ही ‘गजगामिनी’ म्हणून संबोधण्याआधी कोणत्याही शास्त्रीय नृत्य तज्ज्ञांकडुन पुनरावलोकन करून घेण्यात आले होते का? नृत्यकलेला लाभलेली ऐतिहासिक परंपरा लक्षात घेता असे दावे व्हायरल करण्याआधी प्रचंड सावधिगिरी बाळगणे गरजेचे आहे.”

‘गज गामिनी/गत’ म्हणजे काय?

कथ्थक उस्ताद पं. बिरजू महाराज यांची नात शिंजिनी कुलकर्णी यांनी इंडियन एक्सस्प्रेसला सांगितले की, ‘गज गत’ म्हणजे हत्तीसारखे झुलत चालणे. या चालीचे अनुसरण करताना केवळ नितंब नाही तर संपूर्ण शरीर झुलणे/डुलणे आवश्यक असते. विशेषतः धड हे हत्तीच्या चालीप्रमाणे डुलायला हवे. जेव्हा मी हीरामंडी सीरीज पाहिली, तेव्हा मला ‘मुघल ए आझम’मधील ‘मोहे पनघट पे’ गाण्यातील मधुबाला यांच्या स्टेपची आठवण आली. यामध्ये मधुबाला जेव्हा दिलीप कुमार यांच्यापासून दूर जात असते तेव्हा याच पद्धतीने चालते. या आयकॉनिक स्टेपचे नृत्यदिग्दर्शन माझे आजोबा पं. लच्छू महाराज यांनी केले होते.

मी नम्रपणे सांगू इच्छिते की, संजय लीला भन्साळी यांनी याच गाण्यातील स्टेपनुसार प्रेरणा घेतली असु शकते पण त्यामुळे हीरामंडी मधील ती स्टेप ‘गजगत’ प्रकारात मोडते असे मात्र मला वाटत नाही.

यालाच जोडून चतुर्वेदी यांनी पुढे सांगितले की, “बहुतांश बॉलीवूड नृत्यांप्रमाणे हीरामंडीमधील वॉक एक कामुक बॉलीवूड वॉक आहे. खरं तर देवदासमध्ये माधुरी दीक्षितसाठी असाच वॉक वापरण्यात आला होता.

गज की चाल म्हणजे काय?

दुसरीकडे, पद्मश्री पुरस्कार विजेत्या शोवना नारायण यांनी ‘गज की चाल’ ही अभिनय दर्पणमध्ये नमूद केलेल्या १० श्रेणींपैकी एक असल्याचे सांगितले. शोवना सांगतात की, “कथ्थकच्या ‘नाव की गत’ (नौका चालवणे) मध्येही हत्तीच्या चालीचे प्रतिबिंब दिसते. कामुक नृत्याच्या प्रसिद्ध स्टेप्समध्ये नितंबाचे झुलणे, डुलणे याला महत्त्व आहे. अनेक कवींनी या मोहक, कामुक स्टेपचे कौतुक करणाऱ्या कविता लिहिल्या आहेत.”

रिचा चढ्ढाच्या नृत्याविषयी तज्ज्ञांचं मत

दरम्यान, शिंजिनी यांनी पुढे रिचा चढ्ढाच्या ‘मासूम दिल है मेरा’ या गाण्यातील सादरीकरणाविषयी सुद्धा आपले मत दिले. त्या म्हणतात की , “रिचाच्या गाण्यात सर्वाधिक हस्तक होते, कारण तिने गाण्यात काही तुकड्या केल्या होत्या. ही गाणी माझ्या जवळच्या आणि प्रतिभावान सहकाऱ्यांनी सादर केली आहेत जे उत्तम नर्तक आहेत. पण हे लक्षात घेतले पाहिजे की एखाद्या चित्रपटातील गाण्याचे नृत्यदिग्दर्शन करताना ते अचूकता शोधत नाहीत.”

हीरामंडी का पाहू नये?

शिंजिनी सांगतात, “ती एक प्रशिक्षित कथ्थक नृत्यांगना नाही आणि तिला एका आठवड्याच्या कालावधीत गाणे सादर करायचे होते हे लक्षात घेता तिला जितकं शक्य झालं तितकं तिने केलं असं म्हणता येईल. पण यावरून हा प्रकार कथ्थक म्हणून ओळखला जाईल का? हे गाणं कथ्थक नृत्याची व्याख्या सांगू शकेल का? एकूणच तवायफांनी मूळ आयुष्यात कथ्थक केलं होतं का? केलं असेल तर ते या सीरीजमध्ये अचूकतेने दाखवलेलं आहे का? याविषयी मला शंका आहे. तवायफ म्हणजे काय किंवा कथ्थकचा इतिहास काय हे खरोखर समजून घ्यायचे असेल तर त्यासाठी हीरामंडी पाहण्याचा सल्ला मी देणार नाही.