scorecardresearch

Daily Usage of AC: उन्हाळ्यात सतत AC लावल्याने वीजबील वाढते का? दररोजच्या वापरामुळे किती वीज खर्च होते?

सध्या सर्वत्र उन्हाळ्याचे दिवस सुरु झाल्यासारखे वातावरण आहे.

tips for ac fast cooling
एअर कंडिशनर – संग्रहित छायाचित्र / फायनान्शिअल एक्सप्रेस

सध्या देशभरात तीव्र उन्हाळा जाणवू लागला आहे. सध्या सर्वत्र उन्हाळ्याचे दिवस सुरु झाल्यासारखे वातावरण आहे. सकाळी १० च्या नंतर रस्त्यावर चालताना सुद्धा उन्हाच्या झळा लोकांना बसत आहेत. मात्र अजून खरा उन्हाळा चालू होयचा आहे असे म्हणायला हरकत नाही. एप्रिल आणि मे महिन्यात जाणवणारे ऊन फेब्रुवारी महिन्याच्या शेवटी जाणवत आहे. मात्र या उन्हाळ्याच्या त्रासापासून वाचण्यासाठी अनेक नागरिक घरामध्ये AC , Cooler अशी साधने बसवतात. ज्यापासून तुम्हाला गार वारा मिळतो आणि कडक उन्हापासून दिलासा मिळतो.

भारतात बरेच लोकं AC चा वापर करतात. कडाक्याच्या उन्हाळ्यात आराम मिळण्यासाठी आपण एसीचा वापर करतो. त्यामुळे आपल्या महिन्याच्या वीजबिलामध्ये देखील भर पडते. म्हणजेच नेहमीपेक्षा आपले लाईट बिल जास्त प्रमाणात येते. एअर कंडिशनर विजेचा किती वापर करतो आणि त्याच्या वापरामुळे महिन्याच्या वीजबिलावर काय परिणाम होतो ते जाणून घेऊयात.

हेही वाचा : खास उन्हाळ्याच्या तोंडावर Xiaomi ने लॉन्च केला गोल्ड प्लेटेड AC, होणार तब्बल ‘इतकी’ वीजेची बचत

तुमच्या घरातील, ऑफिसमधील एसी किती वीज वापरतो हे ते एसीचे युनिट्सचे प्रकार , त्याची क्षमता आणि सेट केलेले तापमान यासह अनेक गोष्टींवर अबलंबून असते. सर्वसाधारणपणे एसी प्रत्येक तासाला १,००० ते २,५०० वॅट इतक्या विजेचा वापर करतात. उदाहरणार्थ , ५ स्टार रेटिंग असलेला १.५ टनाचा स्प्लिट एसी सुमारे १,५०० वॅट्स इतकी वीज प्रत्येक तासाला वापरतो. याचा अर्थ असा की झर तुम्ही दिवसातले आठ तास एसीचा वापर करत असाल तर तो दररोज १२ युनिट्स विजेचा वापर करतो. तर दुसरे उदाहरण बघायचे झाल्यास १ टन क्षमतेचा विंडो एसी सुमारे ९०० वॅट्स इतकी वीज प्रत्येक तासाला वापरतो. म्हणजेच आठ तास एसी वापरला तर तो एकूण ७ युनिट इतकी वीज वापरेल.

तुमचे वीजबिल वाढवण्यासाठी एअर कंडिशनर कारणीभूत ठरू शकतो. खास करून उन्हाळ्याच्या दिवसांमध्ये एसीचा वापर हा मोठ्या प्रमाणात होतो. त्याचा तुमच्या वीजबिलावर होणार परिणाम हा एसीच्या एंक गोष्टींवर अवलंबून असतो. जर तुमच्याकडे ५ स्टार रेटिंग असलेला १.५ टनाचा स्प्लिट एसी आहे आणि तुम्ही तो ८ तासांसाठी वापरत आहात.तर तुमचा एसी प्रत्येक महिन्याला ३६० युनिट्स इतकी वीज वापरेल. जर का तुमच्या भागामध्ये विजेचा दर हा ७ रुपये एक युनिट असा असेल तर तुमचे महिन्याचे वीजबिल हे २,५२० तुमच्या एसीच्या वापरामुळे वाढणार आहे.

मराठीतील सर्व FYI ( Do-you-know ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

First published on: 09-03-2023 at 15:23 IST