Air Conditioner : मार्च महिना सुरु झाल्यापासून वातावरणामध्ये बदल झाल्याचे लक्षात येत आहे. गेल्या काही दिवसामध्ये उन्हाच्या झळा बसायला सुरुवात झाली आहे. बदलत्या वातावरणामुळे आत्तापासूनच उकडायला लागलं आहे. उन्हापासून स्वत:चे रक्षण करण्यासाठी लोक नानाविध प्रकारचे उपाय करत असतात. काहीजण गार पाण्याने अंघोळ घेतात. तर काही लोक थंड कोल्डडिंक्सची मदत घेतात. वाढत्या उष्णतेपासून बचाव करण्याचा सर्वात कॉमन उपाय म्हणजे एअर कंडिशनर. सध्या बहुंताश घरांमध्ये एसी असतो. उन्हाळा सुरु झाला की लोक याचा जास्त वापर करायला लागतात. एसी हे विद्युत उपकरण फारसे महाग नसले, तरी त्याची खरेदी करताना काही बेसिक गोष्टीची माहिती असणे आवश्यक असते. यातील एक महत्त्वपूर्ण गोष्ट म्हणजे टन. एसीशी संबंधित हा शब्द तुम्ही एकदा तरी ऐकला असेल. एखादी खोली थंड करण्यासाठी लागणाऱ्या एसीच्या क्षमतेला टन असे म्हटले जाते. जास्त टन असलेला एसी जास्त क्षमतेने खोली किंवा हॉल गार करु शकतो असे म्हटले जाते. जर तुमच्याकडे १ टन क्षमता असणारा एसी असेल, तर १ टन बर्फामुळे निर्माण होणारा गारवा तुमच्या घरात/ खोलीत जाणवेल. किती टनचा एसी खरेदी करणे योग्य असते? खोलीचा आकार १५० चौरस फुट असल्यास १ टन क्षमता असलेला एसी लावून घ्यावा.खोली १५०-२५० चौरस फुट आकाराची असेल, तर १.५ टन क्षमता असलेला एसी खरेदी करावा.२५० ते ४०० चौरस फुट आकाराच्या खोलीत २ टन क्षमता असलेला एसी लावणे फायदेशीर असते.४०० ते ६०० चौरस फुट आकार असलेल्या खोलीमध्ये ३ टनचा एसी असावा.तसेच ६०० ते ८०० चौरस फुट आकाराच्या जागेमध्ये ४ टन क्षमतेचा एसी लावणे योग्य ठरते. आणखी वाचा - Air Conditioner Difference: नवीन AC खरेदी करताय? जाणून घ्या इन्व्हर्टर एसी आणि नॉन इन्व्हर्टर एसीमधील फरक याव्यतिरिक्त एसी खरेदी करताना इन्सुलेशन, एसी आणि घराच्या छप्परामधीस अंतर, खिडकी या घटकांचाही विचार करावा. हे उपकरण विकत घेताना अनुभवी व्यक्तींची मदत घेणे योग्य ठरते.