मद्यपान आपल्या आरोग्यासाठी चांगले नाही, तरीसुद्धा काही लोकं मद्यपान करतात. भारतासह अनेक देशांत मद्यपान करणे ही एक साधारण गोष्ट आहे. पण तुम्हाला माहिती आहे का, जगाच्या पाठीवर एक असं ठिकाण आहे जिथे दारूचे सेवन हा एक गुन्हा आहे. आज आपण एका अशा देशाविषयी जाणून घेणार आहोत. या ठिकाणी दारूचे सेवन केल्यानंतर फाशीची शिक्षा दिली जाते. जाणून घ्या या देशाविषयी… भारताचा शेजारी देश इराणमध्ये दारूचे सेवनच नाही; विक्री, उत्पादन करणे कायद्याने गुन्हा आहे. जर या ठिकाणी कुणाला दारूचे सेवन करताना किंवा दारू विक्री करताना अथवा दारू बरोबर घेऊन फिरताना पाहिले तर इथे कठोर शिक्षा होऊ शकते. जर एक व्यक्ती वारंवार दारूशी संबंधित गुन्ह्यात आढळून आला, तर त्याला फाशीची शिक्षासुद्धा होऊ शकते. हेही वाचा :महिलांसाठी नव्हे, पुरुषांसाठी बनवले होते सर्वात आधी सॅनिटरी पॅड! मुलं कसे आणि कुठे वापरायचे? हा नियम फक्त तेथील रहिवासी लोकांना लागू होत नाही, तर पर्यटकांनासुद्धा लागू आहे. जर तुम्ही इराणला फिरायला जायचा विचार करत असाल, तर तुम्हाला याविषयी माहिती असणे गरजेचे आहे. विशेष म्हणजे या देशात नाइट क्लब, बार किंवा दारूची दुकाने नाहीत. हा देश दारूमुक्त आहे. मीडिया रिपोर्टनुसार इराणमध्ये जरी दारुबंदी आहे, तरी काही इराणी तरुण दारूचे सेवन करतात. यासाठी इराणमध्ये अवैधप्रकारे दारू बनवली जाते आणि या दारूची तस्करी केली जाते. या विषारी दारूमुळे इराणमध्ये अनेक तरुणांचा मृत्यू होत असल्याचे समोर आले आहे.