scorecardresearch

Driving License: मस्तच! आता ड्रायव्हिंग टेस्टशिवाय फक्त ७ दिवसात मिळेल लायसन्स; फॉलो करा ‘ही’ सोपी प्रक्रिया

आता मिळवा ७ दिवसात ड्रायव्हिंग लायसन्स

Driving License: मस्तच! आता ड्रायव्हिंग टेस्टशिवाय फक्त ७ दिवसात मिळेल लायसन्स; फॉलो करा ‘ही’ सोपी प्रक्रिया
विना ड्रायव्हिंग टेस्ट फक्त सात दिवसात काढा लायसन्स.(Pic Credit – pexels.com)

तुम्हाला ड्राईव्हिग लायसन्स (Driving License) काढायचं आहे? पण ते काढण्यास वेळ नाही किंवा अनेकदा तुम्ही ड्रायविंग टेस्ट (Driving Test) देवून देखील ती पास होणं शक्य होत नाही आहे. पण आम्ही तुम्हाला विना कुठली ड्राईव्हिंग टेस्ट देता देता फक्त सात दिवसात चालक परवाना कसा मिळवाल, या संबंधित काही टिप्स देणार आहोत. येथे तुम्ही घरबसल्या ऑनलाईन ड्रायव्हिंग लायसन्ससाठी अर्ज करू शकता.

गिअर गाडीसाठी ड्रायव्हिंग लायसन्स अनिर्वाय

ड्रायव्हिंग लायसन्स बनवण्याच्या नियमांमध्ये बदल होत असतात. मोटार वाहन कायद्यानुसार (Motor Vehicles Act) १६-१८ वयात ड्रायव्हिंग लायसन्स ठेवू शकता. मात्र, हे लायसन्स लर्निंग (Learning Licence) असतं. हे लर्निंग लायसन्स असेल तर तुम्ही विदाउट गियर (Without Gear) गाडी चालवू शकता. गिअर गाडीसाठी ड्रायव्हिंग लायसन्स अनिर्वाय असतं. यासाठी हे ड्रायव्हिंग लायसन्स काढण्यासाठी तुम्हाला कुठेही जाण्याची गरज नाही. तुम्ही यासाठी काही मिनिटांत घर बसल्या आरामात ऑनलाइन अर्ज करू शकता.

(आणखी वाचा : Second Hand Car Market: सेकेंड हँड कार खरेदी करताय? मार्केटमध्ये ‘या’ गाड्यांना सर्वाधिक मागणी; फीचर्स आणि मायलेजच्या बाबतीत दमदार )

एकदा तुम्ही चाचणी उत्तीर्ण केल्यावर तुम्हाला ड्रायव्हिंग लायसन्स सहज मिळू शकते. परंतु परवाना मिळवण्यासाठी तुमचे वय १८ वर्षांपेक्षा जास्त असणं आवश्यक आहे. तुमच्या घराचा पत्ता आणि वयाचा पुरावा दिल्यानंतर तुम्हाला ड्रायव्हिंग लायसन्स सहज मिळेल. आता घर बसल्या ऑनलाईन लायसन्स कसं मिळवायचं हे जाणून घेऊयात.

या’ स्टेप्स फॉलो करा
– ड्रायव्हिंग लायसन्ससाठी अर्ज करण्यासाठी अधिकृत वेबसाइटला भेट द्यावी लागेल.

-यासाठी तुम्हाला https://sarathi.parivahan.gov.in/sarathiservice/stateSelection.do. या लिंकवर क्लिक करावे लागेल.

-येथे तुम्हाला ड्रायव्हिंग लायसन्ससाठी अप्लाय करण्याचा ऑप्शन दिसेल. यावर क्लिक करावे लागेल.

– तुम्हाला सर्व कागदपत्रे द्यावी लागतील, त्यानंतर आरटीओ त्यांची पडताळणी करेल.

– कागदपत्रांची पूर्तता केल्यानंतर, तुम्हाला सात दिवसांच्या आत ड्रायव्हिंग लायसन्स मिळेल.

– दरम्यान, टेस्ट न देता तुम्ही फक्त शिकाऊ वाहन चालविण्याचे लायसन्स मिळवू शकता.

मराठीतील सर्व FYI ( Do-you-know ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

First published on: 28-11-2022 at 13:10 IST

संबंधित बातम्या