अमावस्येला हिंदू धर्मात विशेष महत्त्व आहे. अमावस्या प्रत्येक महिन्याच्या कृष्ण पक्षाच्या शेवटच्या तारखेला येते. यावर्षी हा दिवस ९ जुलै २०२१ रोजी आहे. धार्मिक महत्त्वानुसार आषाढ महिन्याची अमावस्या तारीख खूप फायदेशीर आहे. या अमावस्येला हलाहारी आणि आषाढी अमावस्या म्हणूनही ओळखले जाते. उत्तर भारतीय हिंदु कॅलेंडरनुसार ही आषाढ अमावस्या आहे. तर महाराष्ट्र, गुजरात, आंध्रप्रदेश आणि कर्नाटकातल्या अमावस्यांत पंचांगमांच्या मते ही अमावस्या म्हणजे ज्येष्ठ अमावस्या आहे. हिंदू मान्यतेनुसार, या दिवशी पितृ किंवा मृत पूर्वज पृथ्वीला भेट देतात. लोकांनी त्यांची पूजा करावी. त्यांच्या कुंडलीनुसार ग्रह दोष, पितृ दोष आणि शनि दोषांपासून मुक्त करते. तसेच मृत कुटूंबाच्या सदस्यांना शांती मिळते म्हणून या दिवशी उपवास ठेवणे शुभ मानले जाते.

आषाढ अमावस्येचा शुभ मुहूर्त

यावेळी आषाढ महिना २५ जून रोजी कृष्ण पक्षाच्या प्रतिपदाच्या तारखेपासून सुरू झाला. यावेळी अमावस्या तिथीनुसार ९ जुलै २०२१ रोजी सकाळी ०५. १६ पासून १० जुलै रोजी सकाळी ०६.४६ वाजेपर्यंत असेल. महाराष्ट्र, गुजरात, आंध्रप्रदेश आणि कर्नाटकातील जेष्ठ अमावस्येचा शुभ मुहूर्त ९ जुलै २०२१ रोजी दुपारी ०१.५७ पासून सुरु होऊन १० जून संध्याकाळी ०४.२२ वाजेपर्यंत असेल.

Loksabha Election 2024 Last 72 hours most crucial during elections
मतदानापूर्वीचे ३ दिवस का महत्त्वाचे असतात? काय असते प्रक्रिया?
Shukra Gochar 2024
Shukra Gochar 2024 : पौर्णिमेच्या दिवशी शुक्र गोचर पालटणार नशीब, ‘या’ राशींच्या लोकांना मिळणार बक्कळ पैसा
kanyadan, valid marriage,
वैध लग्नाकरता कन्यादान नाही, तर सप्तपदी महत्त्वाची !
wife
पत्नीने तक्रार दाखल करणे क्रुरता नाही…

आषाढ अमावस्या पूजा विधी

१.सकाळी लवकर उठून आंघोळ करुन स्वच्छ कपडे घाला
२. भगवान सूर्याला अर्घ्य द्यावे आणि नंतर विधीवत पितरांचे तर्पण करा.
३. पूर्वजांसाठी प्रार्थना करा आणि ब्राह्मणांना भोजन द्या.
४. गरजू लोकांना अन्नदान करा.
५.हिंदूंच्या श्रद्धेनुसार, पंच महा भूताच्या देवताला प्रार्थना करा, म्हणजे पाच वायु – वायु, पाणी, अग्नी, आकाश आणि पृथ्वी.

आषाढ अमावस्येचे महत्व

गरुड पुराणानुसार जे आषाढ अमावस्या व्रत करतात, पूजा करतात आणि दान करतात त्यांना सर्व प्रकारच्या दोष व पापांपासून मुक्त केले जाते. या दिवशी आपल्या पूर्वजांच्या नावाने दान करणे शुभ मानले जाते. या दिवशी उपवास ठेवल्याने मृत पूर्वजांच्या आत्म्यास शांती मिळते असे मानले जाते.

आषाढ अमावस्येला हे आवर्जून करा

या दिवशी सकाळी आंघोळ केल्यावर पिंपळाच्या झाडाला पाणी द्या. आणि संध्याकाळी दिवा लावा. पूर्वजांच्या आत्म्याच्या शांतीसाठी व्रत ठेवा आणि गरिबांना दान आणि दक्षिणा द्या.

शेतकऱ्यांसाठी महत्त्वाचा दिवस

हा महिना शेतकऱ्यांसाठी खूप महत्वाचा आहे. या अमावस्येच्या दिवशी शेतकरी नांगर आणि शेतात वापरल्या जाणाऱ्या वस्तूंची पूजा करतात. या दिवशी शेतकरी हिरव्या पिकांसाठी प्रार्थना करतात.