६ ऑगस्ट हिरोशिमा दिवस: जेव्हा एका क्षणात सगळचं नष्ट झालं

स्फोटांमुळे शहरातील बहुतांश पायाभूत सुविधा पुसून टाकल्या गेल्या होत्या. दोन बॉम्बस्फोटांमुळे झालेल्या मृत्यूंची वास्तविक संख्या कधीच कळू शकली नाही.

August 6 Hiroshima Day
६ ऑगस्ट हिरोशिमा दिवस (फोटो: रॉयटर्स)

६ ऑगस्ट १९४५ रोजी एका अमेरिकन बी-२९ बॉम्बरने जपानच्या हिरोशिमावर अणुबॉम्ब टाकला. बॉम्बस्फोटामुळे जवळजवळ ८०,००० लोक त्वरित ठार झाले आणि किरणोत्सर्गामुळे हजारो लोकांचा मृत्यू झाला. अणुबॉम्ब वापरण्याची ही पहिलीच वेळ होती. तीन दिवसांनंतर, दुसऱ्या बी-२९ ने नागासाकीवर दुसरा अणुबॉम्ब टाकला. यामुळे आणखी ४०,००० लोकांचा बळी गेला. या दोन बॉम्बस्फोटांनी जपानला १५ ऑगस्ट रोजी दुसऱ्या महायुद्धादरम्यान बिनशर्त आत्मसमर्पण करत असल्याची घोषणा करण्यास भाग पाडले.जपानने ६ ऑगस्ट रोजी हिरोशिमा दिन साजरा केला. सम्राट हिरोहितो यांनी “एक नवीन आणि सर्वात क्रूर बॉम्ब” म्हणून वर्णन केलेल्या विध्वंसक शक्तीबद्दल जागरूकता निर्माण केली. हा दिवस आणखी जागतिक युद्ध आणि विनाश टाळण्यासाठी ‘शांत राजकारणा’ची गरज आहे  याची जगाला आठवण करून देतो.

६ ऑगस्ट १९४५ रोजी काय झाले?

६ ऑगस्टच्या सकाळी, ‘एनोला गे’ बी-२९  बॉम्बरने ‘लिटल बॉय’ नावाचा हिरोशिमावर १२-१५ किलोटन टीएनटीच्या बलाने अणुबॉम्ब टाकला. या स्फोटाने शहराचा पाच चौरस मैल भाग लगेच नष्ट केला. विमानाने स्थानिक वेळेनुसार सकाळी ८.१५ वाजता पॅराशूटद्वारे बॉम्ब टाकला आणि त्याचा शहरापासून २,००० फूटावर स्फोट झाला. ही ती वेळ होती जेव्हा बहुतेक औद्योगिक कामगार काम करण्यासाठी निघाले होते मुले शाळेत जात होती.

नागासाकीवर बॉम्बस्फोट

बॉम्बस्फोटामुळे झालेल्या विध्वंसानंतरही जपानने शरणागती पत्करली नाही. ९ ऑगस्ट रोजी अमेरिकेने कोकुरा शहराच्या प्राथमिक लक्ष्यासाठी आणखी एक बी-२९ , बॉक्सकार पाठवले. तथापि, कोकुरावर असलेल्या दाट ढगांनी पायलट मेजर चार्ल्स स्वीनी यांना बॉम्ब टाकण्यापासून रोखले. म्हणून दुसरा निशाणा डोंगरांमध्ये वसलेल्या नागासाकीवर बसला. त्याने सकाळी ११.०२ वाजता ‘फॅट मॅन’ टाकला. हा प्लूटोनियम बॉम्ब हिरोशिमामध्ये वापरलेल्या बॉम्बपेक्षा अधिक शक्तिशाली होता. त्यातून २२ किलोटनचा स्फोट झाला.

जपानची शरणागती

नागासाकी बॉम्बस्फोटानंतर सहा दिवसांनी १५ ऑगस्ट रोजी सम्राट हिरोहितोने जपानच्या आत्मसमर्पणाची घोषणा एका रेडिओ प्रसारणात केली. २ सप्टेंबर रोजी टोक्यो खाडीवर अँकर केलेल्या अमेरिकन युद्धनौका मिसौरीवर शरण येण्याचा औपचारिक करार झाला. कारण दोन शहरातील बहुतांश पायाभूत सुविधा पुसून टाकल्या गेल्या होत्या. दोन बॉम्बस्फोटांमुळे झालेल्या मृत्यूंची वास्तविक संख्या कधीच कळू शकली नाही.

Loksatta Telegram लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

मराठीतील सर्व FYI बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App. ताज्या बातम्या (latest News) फेसबुक , ट्विटरवरही वाचता येतील.

Web Title: August 6 hiroshima day know the history of the day ttg

Next Story
जाणून घ्या Reliance Jio चे बेस्ट प्रीपेड प्लॅन, दररोज 3GB पर्यंत डेटा