Ayushman Bharat Pradhan Mantri Jan Arogya Yojana : आयुष्मान भारत पीएम जन आरोग्य योजनेत (AB PM-JAY) आता ७० वर्षे वयोगटातील वृद्धांचा समावेश करण्यात आला आहे. उत्पन्नस्तरावरील निर्बंध काढून टाकून, वाढता वैद्यकीय खर्च लक्षात घेऊन, वृद्धांच्या आरोग्यासंबंधित गरजा पूर्ण करण्यासाठी, ज्येष्ठ नागरिकांना अत्यंत आवश्यक आरोग्य विमा कवच प्रदान करणे हे या योजनेचे उद्दिष्ट आहे. तर या योजनेअंतर्गत ज्येष्ठांना दर वर्षी पाच लाख रुपयांपर्यंतचे अतिरिक्त टॉप-अप कव्हर मिळेल. आयुष्य जगण्यासाठी संघर्ष करणाऱ्या प्रत्येकासाठी ही सोन्याची संधी आहे असे म्हणायला हरकत नाही.

पूर्वी, आयुष्मान भारत पीएम जन आरोग्य योजना (Ayushman Bharat health insurance) प्रामुख्याने ४० टक्के लोकसंख्येला कव्हर करत आर्थिकदृष्ट्या वंचित लोकांना सेवा देणार आहे. या निर्णयाचा देशातील ४.५ कोटी कुटुंबांमधील ६ कोटी ज्येष्ठ नागरिकांना फायदा होणार आहे. तसेच या योजनेत ७० आणि त्याहून अधिक वयाच्या प्रत्येक लाभार्थीला नवीन हेल्थ कार्ड (नवीन व स्वतंत्र आयुष्मान कार्ड) मिळेल; ज्यामुळे आरोग्यसेवा फायद्यांचा त्यांना लाभ घेता येईल.

What is narco test Explained Marathi
What is Narco Test: नार्को टेस्ट कशी घेतली जाते? या टेस्टमुळे आरोपी खरं बोलतो?
4th October Rashi Bhavishya in marathi
४ ऑक्टोबर पंचांग: मेष, वृषभसह ‘या’ राशींवर देवी…
Port Blair Who is Archibald Blair
Port Blair : ‘या’ इंग्रजाच्या नावावरून ईस्ट इंडिया कंपनीने अंदमानच्या राजधानीला पोर्ट ब्लेअर नाव दिलेलं, मोदी सरकारने केलं नामांतर
What Sharad Pawar Said About Ladki Bahin Yojana
Sharad Pawar : “लाडकी बहीण योजनेमुळे महायुतीचं राज्य पुन्हा येईल, अशी स्थिती…”; शरद पवारांचं वक्तव्य चर्चेत
china biggest dam in the world
चीनमधील ‘या’ अवाढव्य धरणामुळे पृथ्वीचा वेग मंदावला? धरणाचा नेमका परिणाम काय होतोय?
Who is Jaydeep Apte in Marathi
Jaydeep Apte : जयदीप आपटेला पोलिसांनी हाक मारली, रडत गयावया करु लागला आणि म्हणाला; “मला…”
LokPoll Survey Results in Maharashtra
LokPoll Survey: महाराष्ट्रात लोकसभेची पुनरावृत्ती होणार; मविआला १४१ ते १५४ जागा, तर महायुतीला…
Eid-e-Milad 2024 holiday
Eid-e-Milad holiday: मुंबईत १६ सप्टेंबरची ईद-ए-मिलादची सुट्टी रद्द; महाराष्ट्र सरकारकडून नवी तारीख जाहीर, जाणून घ्या कारण

तसेच एकाच कुटुंबातील अनेक ज्येष्ठ नागरिक या योजनेसाठी पात्र असल्यास, पाच लाख रुपये त्यांच्यामध्ये विभागले जातील. प्रसारण मंत्री अश्विनी वैष्णव यांनी स्पष्ट केल्याप्रमाणे हे पाऊल अत्यावश्यक आहे, कारण भारतात विभक्त कुटुंब संरचना आहे; जेथे वृद्ध व्यक्तींवर आर्थिक भार आहे, त्यामुळे ही योजना त्यांच्यासाठी उपयोगी ठरेल.

हेही वाचा…Pune : कसबा पेठेतील ‘या‘ मंदिराबद्दल तुम्हाला माहिती आहे का? जाणून घ्या प्रसिद्ध मंदिराची रंजक गोष्ट

केंद्र सरकारच्या आरोग्य योजना (CGHS), माजी सैनिक अंशदायी आरोग्य योजना (ECHS) किंवा आयुष्मान केंद्रीय सशस्त्र पोलिस दल (CAPF) यांसारख्या सार्वजनिक आरोग्य विमा योजनांमध्ये आधीच नावनोंदणी केलेल्या ज्येष्ठ नागरिकांना एकच योजना निवडावी लागेल. पण, ज्यांचे खाजगी विमा आहे किंवा कर्मचारी राज्य विमा योजनेंतर्गत आहे ते कोणत्याही संघर्षाशिवाय या नवीन कव्हरेजची निवड करू शकतात.

या विस्तारित कव्हरेजची सुरुवातीची किंमत ३,४३७ कोटी आहे, ज्यामध्ये राज्ये ४० टक्के खर्च कव्हर करतात. डोंगराळ आणि ईशान्येकडील राज्यांसाठी, केंद्र ९० टक्के खर्च उचलेल. वैष्णव यांच्या म्हणण्यानुसार मागणी जसजशी वाढेल, तसतसे व्याप्ती वाढवण्यावर भर दिला जाईल.

आयुष्मान भारत पीएम जन आरोग्य योजनेच्या महत्त्वाच्या गोष्टी पुढीलप्रमाणे (Ayushman Bharat health insurance) :

योजनेसाठी पात्रता काय असणार : कौटुंबिक आधारावर लागू असलेल्या या योजनेअंतर्गत ७० आणि त्याहून अधिक वयाचे सर्व ज्येष्ठ नागरिक पाच लाख रुपयांच्या मोफत आरोग्य विमा कवच योजनेसाठी पात्र आहेत.

कुटुंबातील सदस्य : आयुष्मान भारत योजनेंतर्गत (Ayushman Bharat health insurance) आधीच समाविष्ट केलेल्या ज्येष्ठ नागरिकांना त्यांच्या आरोग्य विम्याच्या अतिरिक्त पाच लाख रुपये टॉप-अप कव्हर म्हणून देण्यात येईल. पण या रकमेचा उपयोग फक्त जेष्ठ नागरिक करू शकतात. पण, त्यांच्या कुटुंबातील इतर सदस्य त्याचा लाभ घेऊ शकत नाहीत.

खाजगी आरोग्य विमा : खाजगी आरोग्य विमा पॉलिसी असलेले ज्येष्ठ नागरिकदेखील त्यांच्या विद्यमान कव्हरेजला धक्का न लागू देता या योजनेचा लाभ घेऊ शकतात.

इतर सार्वजनिक आरोग्य योजना : सीजीएचएस, ईसीएचएस किंवा आयुष्मान CAPF द्वारे संरक्षित ज्येष्ठ नागरिकांनी त्यांचा सध्याचा सार्वजनिक विमा किंवा नवीन आयुष्मान भारत आरोग्य योजना (Ayushman Bharat health insurance) यातील एकच पर्याय निवडणे बंधनकारक असणार आहे.

नवीन आरोग्य कार्ड : सर्व पात्र ज्येष्ठ नागरिकांना योजनेचे लाभ मिळवण्यासाठी एक वेगळे (आयुष्यमान कार्ड) कार्ड दिले जाईल.