शार्क टँक इंडियाच्या पहिल्या सीझनमधून नवउद्योजक अशनीर ग्रोवर (Ashneer Grover) घराघरात परिचित झाला. दुसऱ्या सीझनमध्ये अशनीर ग्रोवरची कमतरता अनेकांना भासत आहे. तसेच Doglapan या पुस्तकामुळे अशनीर लोकप्रिय झाला. Doglapan या शब्दावरुन त्याचे अनेक मीम्सही अधून मधून व्हायरल होत असतात. इतरांना भांडवल उपलब्ध करुन देणाऱ्या अशनीरचा पगार किती होता माहितीये का? नुकत्याच भारत पे (BharatPe) या कंपनीच्या रेग्युलेटरी फायलिंगच्या माध्यमातून अशनीरच्या पगाराबाबत माहिती उघड झाली आहे. मनीकंट्रोल या संकेतस्थळाने याबाबत वृत्त दिले आहे. BharatPe चा सहसंस्थापक असलेल्या अशनीर ग्रोवरला २०२२ साली पगाराच्या स्वरुपात १.६९ कोटी देण्यात आले आहेत. त्याची पत्नी आणि या कंपनीची माजी कर्मचारी माधुरी जैन ग्रोवरलाही गल्लेलठ्ठ पगार होता. माधुरी यांना पगाराच्या स्वरुपात ६३ लाख रुपये देण्यात आले आहेत.

अशीनर पेक्षाही सीईओंना जास्त पगार

BharatPe कंपनीने सांगितले की, माजी सीईओ सुहैल समीर यांना आर्थिक वर्ष २०२२ साठी २.१ कोटींचा पगार दिलेला आहे. कंपनीचे चेअरमन आणि एसबीआयचे माजी अध्यक्ष रजनीश कुमार यांना पगाराच्या स्वरुपात २१.४ लाख रुपये देण्यात आले आहेत. सीईओ सुहैल समीर यांनी याच वर्षी जानेवारीच्या सुरुवातीला आपल्या पदाचा राजीनामा दिला होता. यावेळी कंपनीचे इतर अधिकारी, संचालक, सहसंस्थापक यांना २९.८ लाखांचे वितरण मानधनाच्या स्वरुपात झालेले आहे. तर BharatPeचे बोर्ड सदस्य केवल हांडा यांना ३६ लाख रुपये पगार देण्यात आला आहे.

the new york times book review
बुकमार्क : ग्रंथ परिचयाच्या विश्वात..
This fan’s reaction after seeing Shubman Gill at hotel is viral Relatable much
“दिल मे बजी घंटी…टंग टंग टंग!” शुभमन गिलला समोर पाहताच चाहतीच्या काळजाचा चुकला ठोका! Viral Video एकदा बघाच
world's oldest and first curry was made with brinjal
वांग्याची भाजी… तब्बल चार हजार वर्षे जुनी, ‘इथे’ सापडला पुरावा, संशोधकांचे शिक्कामोर्तब!
Newspaper hack
Kitchen Hack : फ्रिजमध्ये ठेवा रद्दी वृत्तपत्र अन् पाहा काय होईल कमाल, Viral Video येथे बघा

शेअरमधून होणारा नफा वेगळा

कंपनीचे सहसंस्थापक, वरिष्ठ अधिकारी यांना लाखो रुपये पगार मिळत आहेच. शिवाय कंपनीच्या शेअरपासून मिळणारा नफा वेगळाच आहे. त्याची गणती पगारात केलेली नाही. कंपनीने वर्ष २०२२ मध्ये समभाग धारकांना ७० कोटी रुपये दिले आहेत. जे मागच्या वर्षीच्या तुलनेत २१८ टक्के अधिक आहेत.

अशनीर ग्रोवर आणि BharatPe मध्ये वाद

अशनीर ग्रोवर यांनी जानेवारी महिन्याच्या सुरुवातील BharatPe वर गंभीर आरोप केले होते. कंपनीच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांना कामाच्या बदल्यात दिल्या जाणाऱ्या ३१५ कोटींच्या शेअर्सच्या (ESOPs) विरोधात ग्रोवर यांनी आवाज उचलला होता. त्यांनी सर्वच बोर्डाच्या सदस्यांना पत्र लिहून हे शेअर्स चार लोकांना दिल्याचे नमूद केले होते. यापैकी BharatPe चे अध्यक्ष रजनीश कुमार, संस्थापक शाश्वत नकरानी आणि माजी सीईओ सुहैल समीर आणि वकील सुमीत सिंह यांच्याकडे हे कोट्यवधीचे शेअर्स गेल्याचा आरोप त्यांनी पत्राच्या माध्यमातून केला होता.

‘BharatPe’ ने अशनीर ग्रोवर कडून मागितले ८८ कोटी

‘BharatPe’ च्या वर्ष २०२२ च्या आर्थिक विवरण पत्रावर लेखापरीक्षकाने प्रतिक्रिया देताना चिंता व्यक्त केली. आंतरराष्ट्रीय बाजारावरील नियंत्रणावरुन त्यांनी नाराजी व्यक्त केली. चुकीचे बिले सादर केल्यामुळे करनिर्धारण अधिकाऱ्यांनी कंपनीला दंडही ठोठावला आहे. मागच्या वर्षी अशाच प्रकारच्या एका खटल्यात कंपनीने अशनीर ग्रोवर आणि त्यांच्या कुटुंबाला दोषी धरत त्यांच्याकडून ८८ कोटींची नुकसान भरपाई मागितली होती. वर्ष २०२२ मध्ये कंपनीचा ऑपरेशन विभागाचा महसूल हा २८२ कोटींवरुन वाढत ४५७ कोटींवर पोहोचला होता. तसेच तोट्यात देखील ३.५ टक्क्यांची वाढ झाली. तर पगार देण्यासाठीची तरतूद ११६ टक्क्यांनी वाढून ११० कोटींवर पोहोचली आहे.