scorecardresearch

३० हत्तींच्या वजनाचा देवमासा ‘या’ गोष्टींनी ठरतो निसर्गाचा चमत्कार! गणपतीपुळ्यात देवमाशाच्या बाळाचा मृत्यू का झाला?

Blue Whale At Ganpatipule Video: देवमाशाला जमिनीवर राहणे का शक्य होत नाही व गणपतीपुळे येथे अडकलेलं पिल्लू या सगळ्याला अपवाद कसं ठरलं याविषयी आपण जाणून घेऊया..

Blue Whale at Ganpatipule Goes Back In The Sea Watch Video Unknown Facts About Blue Whales Weight how long They Live On land
देवमाशाचे वजन किती? (फोटो: लोकसत्ता ग्राफिक्स टीम)

Blue Whale at Ganpatipule: रत्नागिरी जिल्ह्यातील गणपतीपुळे समुद्रात व्हेल माशाचं पिल्लू वाहून आलं होतं. ओहोटी असल्याने हे पिल्लू किनाऱ्यावर आलं आणि मग स्वतःचं शरीर न पेलवल्याने वाळूत रुतून बसल्याची माहिती समोर येत आहे. मस्त्यविभागाकडून त्याला पुन्हा समुद्रात नेण्याचा प्रयत्न सुरू होता मात्र ४० तासांनंतर आता ही मोहीम संपुष्टात आली असून देवमाशाच्या बाळाचा दुर्दैवी अंत झाला आहे. पाण्याविना सहसा जगू न शकणारा हा जीव इतके तास आपल्या घरी परतण्याची वाट पाहू शकला यातही नागरिकांचे मोठे योगदान आहे, अनेकांनी दोन दिवसांपासून महाकाय प्राण्यावर बादलीतून पाणी ओतून त्याला थंड ठेवण्यासाठी प्रयत्न केले होते. या घटनेवरून देवमाशाची वैशिष्ट्य विशेषतः ते किती वेळ जमिनीवर राहू शकतात हा प्रश्न अनेकांना पडला आहे. देवमाशाला जमिनीवर राहणे का शक्य होत नाही व गणपतीपुळे येथे अडकलेलं पिल्लू या सगळ्याला अपवाद कसं ठरलं याविषयी आपण जाणून घेऊया..

देवमासा ऑक्सिजन घेण्यासाठी बाहेर न येता समुद्रात किती वेळ राहतो?

देवमाशाचे विविध प्रकार आहेत व सर्वच देवमासे हे महाकाय आहेत. पण त्या सगळ्यांमध्ये ब्लू व्हेल म्हणेजच निळा देवमासा हा पृथ्वीवरील सर्वात मोठा प्राणी असल्याची नोंद आहे. देवमासा समुद्रात २००० मीटर पर्यंत खाली राहतो आणि सुमारे २ तास पूर्णपणे पाण्याखाली राहू शकतात. मानवाच्या तुलनेत हे प्रमाण कित्येक पट अधिक आहे कारण आपण केवळ दोन मिनिटे पाण्याखाली राहू शकतो. त्यांच्या शरीरात ऑक्सिजन साठवणारे प्रथिने, मायोग्लोबिनचे प्रमाण जास्त आहे असा वैज्ञानिकांचा अंदाज आहे, पण याविषयी ठोस पुरावे नाहीत.

Drama OK ahe ekdam
नाटय़रंग : करोनाची लोकनाटय़ीय त्रेधातिरपीट ‘ओक्के हाय एकदम!’
Akshara Mangalsutra
‘तुला शिकवीन चांगलाच धडा’मध्ये रंगणार राजेशाही विवाह सोहळा, अक्षराने घातलेल्या मंगळसूत्राच्या डिझाईनने वेधलं लक्ष
kitchen tips in marathi pudina potli in rice keep insects away kitchen jugaad video viral
Kitchen Jugaad: झोपण्याआधी फक्त एकदा तांदळामध्ये ही ‘पोटली’ ठेवा, सकाळी डोळ्यांवर विश्वास बसणार नाही
Anand Dighe Life Ganpati Decoration at mumbai thane
VIDEO: बाळासाहेबांचा ढाण्या वाघ; आनंद दिघेंच्या आठवणींना देखाव्यातून उजाळा, एकनाथ शिंदेंनीही…

समुद्रात खोल पाण्यात दोन तास देवमासा राहू शकत असला तरी जमिनीवर त्यांची जगण्याची शक्यता खूपच कमी असते. त्यातही समजा त्यांना शरीर थंड ठेवण्यासाठी एखादा पर्याय उपलब्ध असेल, म्हणजे त्यांच्या अंगावर थंड पाणी ओतण्यात आले, उन्हापासून लांब ठेवले गेले तर ते अधिक काही तास जगू शकतात. अन्यथा उष्णतेमुळे त्यांना जमिनीवर असताना स्वतःचे शरीर सांभाळता येत नाही.

देवमासा जमिनीवर का राहू शकत नाही?

देवमासा जमिनीवर का राहू शकत नाही याविषयी बीडीएमएलआरचे अधिकारी डॅन जार्विस यांनी CNN ला सांगितले होते की, देवमासा जमीनीवर फक्त सहा तास जगू शकतो, कारण पाण्याच्या बाहेर असताना त्यांना स्वतःचे वजन पेलवत नाही. पाण्यात हे महाकाय मासे मूलतः वजनही असतात त्यामुळे त्यांच्या हाडांना/स्नायूंना त्यांचे वजन उचलून धरण्याची सवयच नसते. पाण्याबाहेर आल्यावर त्यांना हे वजन झेपत नाही. त्यांच्या स्वतःच्या वजनामुळे त्यांच्या शरीरावर भार येऊन रक्ताभिसरण बंद होऊ शकते आणि शरीरात विषारी द्रव्ये तयार होतात जी घातक ठरू शकतात, परिणामी त्यांचा मृत्यू होऊ शकतो.

देवमाशाचे वजन किती?

आपण आतापर्यंत देवमाशाच्या वजनाविषयी वाचलं पण मुळात देवमाशाचं वजन किती असू शकतं हे तुम्हाला माहितेय का? देवमाशाचे सरासरी वजन २ लाख ते ३ लाख पौंड (९०,००० ते १,३६,००० किलोग्रॅम) असू शकते काहींचे वजन ४४१,००० पौंड (२ लाख किलोग्रॅम) सुद्धा असू शकते. तुलनेने सांगायचे झाल्यास, प्रौढ आफ्रिकन हत्तीचे वजन ६ टनांपर्यंत असते, त्यामुळे एका निळ्या देवमाशाचे वजन हे ३० किंवा अधिक हत्ती इतके असू शकते.

देवमाशाचे पिल्लू जगातील सर्वात मोठे नवजात बाळ

दरम्यान, गणपतीपुळेच्या समुद्र किनाऱ्यावर अडकलेला देवमासा हा एक ते दीड वर्षांचा असल्याचे सांगितले जात होते. लहान वयाच्या देवमाशांविषयी सुद्धा अभ्यासक सांगतात की. ब्लू व्हेलचे बाळ हे पृथ्वीवरील सर्वात मोठे व जन्माच्या वेळी ते पूर्ण वाढ झालेल्या प्राण्यांसारखे दिसणारे एकमेव आहे. हे बाळ सुमारे ४ हजार किलो वजनाचे असू शकते व त्यांची लांबी २६ फूट (८ मीटर) असू शकतात. ते दररोज २०० पौंड (९० किलो) वाढवतात.

Latest Comment
View All Comments
Post Comment

मराठीतील सर्व FYI बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: Blue whale at ganpatipule goes back in the sea watch video unknown facts about blue whales weight how long they live on land svs

First published on: 15-11-2023 at 11:37 IST

संबंधित बातम्या

मराठी कथा ×