Box Office Collection : एखादा चित्रपट हिट ठरला की फ्लॉप याचं संपूर्ण गणित बॉक्स ऑफिस कलेक्शनवर अवलंबून असतं. गेल्या काही वर्षांत भारतीय सिनेमाचा हजार कोटींच्या क्लबमध्ये देखील समावेश झाला आहे. जेव्हा एखादा नवीन चित्रपट प्रदर्शित होतो तेव्हा त्या चित्रपटाचं एकूण बॉक्स ऑफिस कलेक्शन किती आहे? चित्रपट बनवण्यासाठी आलेला मूळ खर्च किती अशा अनेक गोष्टी बातम्यांमध्ये येत असतात. परंतु, हे चित्रपट प्रदर्शित झाल्यावर प्रत्येक आठवड्याचं बॉक्स ऑफिस कलेक्शन ( Box Office Collection ) नेमकं कसं मोजलं जातं तुम्हाला माहिती आहे का? याबद्दल जाणून घेऊया…

निर्माते

कोणताही चित्रपट बनवताना निर्माता निर्णायक भूमिका बजावतो. संपूर्ण खर्चाची जबाबदारी निर्मात्यावर असते. एखादा निर्माता मूळ चित्रपट बनवण्यासाठी जेवढी रक्कम गुंतवतो… याच रकमेकला चित्रपटाचं बजेट असं म्हटलं जातं. यात कलाकारांचं मानधन, क्रू मेंबर्सचा खर्च, जेवण, राहण्याची सोय, तंत्रज्ञानासाठी लागणारा खर्च या सगळ्या गोष्टींचा समावेश असतो. याशिवाय निर्मितीनंतर चित्रपटाच्या प्रमोशनवर केला जाणारा खर्च देखील यात समाविष्ट असतो. एकंदर थोडक्यात सांगायचं झालं, तर निर्मात्याने गुंतवलेल्या रकमेला चित्रपटाचं मूळ बजेट असं म्हटलं जातं.

Laila Majnu Re-Release box office collection
तृप्ती डिमरीचा सुपरफ्लॉप चित्रपट सहा वर्षांनी पुन्हा प्रदर्शित, दोन दिवसांत कमावले…
12th september rashi bhavishya राशी, राशिभविष्य, आजचे राशिभविष्य, राशीवृत्त देणार
१२ सप्टेंबर पंचांग: ‘आयुष्मान योग’ सिंह, कर्कसह ‘या’ राशींचे नशीब पालटणार? बक्कळ धनलाभ तर रखडलेली कामे पूर्ण होणार; वाचा तुमचे भविष्य
Sarvajanik Ganesh Mandal Banner Goes Viral on Mahaprasad Will Be Given Only To Members netizens reacts
सार्वजनिक मंडळाचा ‘तो’ बॅनर पाहून लोक भडकले; PHOTO पाहून सांगा अशा मंडळांचं काय करायचं?
Vedaa Vs Khel Khel Mein box office collection
Vedaa Vs Khel Khel Mein: जॉन अब्राहमचा ‘वेदा’ की अक्षय कुमारचा ‘खेल खेल में’, कोणत्या सिनेमाने मारली बाजी? जाणून घ्या
Vinesh Phogat net worth
Vinesh Phogat : रौप्यपदकाच्या प्रतिक्षेत असणाऱ्या विनेश फोगटची एकूण संपत्ती किती आहे माहितेय का? जाणून घ्या
Thalapathy Vijay GOAT Box Office Collection
थलपती विजयच्या ‘GOAT’ने पहिल्याच दिवशी केली जबरदस्त कमाई, ‘इतके’ कोटी कमावले
Bollywood Movies
‘स्त्री २’, ‘खेल खेल में’ की ‘वेदा’, कोणत्या चित्रपटाने अ‍ॅडव्हाॅन्स बुकिंगमध्ये मारली बाजी? जाणून घ्या
Manu Bhaker's Father Statement on His Daughter and Neeraj Chopra Marriage Rumors
Manu Bhaker Neeraj Chopra: मनू भाकेर-नीरज चोप्राची सोयरीक जुळली? मनूच्या वडिलांनी केले मोठे वक्तव्य; म्हणाले, “नीरजला आम्ही…”

हेही वाचा : दोन मध्यांतर असलेला पहिला भारतीय सिनेमा! ६० वर्षांपूर्वी जगभरात कमावलेले ८ कोटी, सहा वर्षांनी दुसरा चित्रपट आला पण…

वितरक

चित्रपटाचा वितरक हा निर्माता आणि थिएटर मालक यांच्यातला दुवा असतो. निर्माते चित्रपट बनवून पूर्ण झाल्यावर वितरकांना विकतात. काही वेळा निर्माते चित्रपटाचे हक्क त्रयस्थ व्यक्तींमार्फत वितरकांना विकतात. यामध्ये नफा किंवा तोटा त्रयस्थ पक्षाच्या वाट्याला येतो.

वितरक व थिएटर मालकांमध्ये चित्रपटाच्या स्क्रीनिंगसाठी करार करण्यात येतो. भारतात दोन प्रकारची सिनेमागृह आहेत. पहिला प्रकार आहे सिंगल स्क्रीन आणि दुसरा प्रकार मल्टीप्लेक्स चेन हा आहे. चित्रपटाच्या स्क्रीनिंगमधून होणारा नफा किती असेल यामार्फत हे करार केले जातात. चित्रपटांच्या कलेक्शनचं संकलन सुरुवातीला थिएटर मालकांकडेच केलं जातं. यापैकी राज्य सरकारकडे विशिष्ट करमणूक कर जमा करावा लागतो. या कराची टक्केवारी प्रत्येक राज्यात वेगवेगळी असू शकते. करमणूक कर भरल्यानंतर उर्वरित कलेक्शनमधील ( Box Office Collection ) रकमेचा काही भाग आधीच झालेल्या करारानुसार वितरकाला परत केला जातो.

बॉक्स ऑफिसची कमाई कशी मोजतात?

थिएटर मालकांकडून साप्ताहिक आधारावर वितरकांना परतावा दिला जातो. उदाहरणार्थ, मल्टिप्लेक्समध्ये चित्रपट प्रदर्शित झाल्यास पहिल्या आठवड्यात एकूण कलेक्शनपैकी ५० टक्के, दुसऱ्या आठवड्यात ४२ टक्के, तिसऱ्या आठवड्यात ३७ टक्के आणि चौथ्या आठवड्यात ३० टक्के कलेक्शनची रक्कम चित्रपटाच्या वितरकाला दिली जाते. याशिवाय सिंगल स्क्रीनवर सिनेमा प्रदर्शित झाल्यास वितरकाला दर आठवड्यापासून चित्रपट चालेपर्यंत एकूण कमाईच्या ७० ते ९० टक्के रक्कम मिळते. अशाप्रकारे वितरकाचा नफा किंवा तोटा = चित्रपट थिएटर मालकांना विकण्याचा खर्च = यातून वितरकाला मिळणारा हिस्सा. या आधारावर बॉक्स ऑफिस कलेक्शन ( Box Office Collection ) ठरवलं जातं.

हेही वाचा : जुन्या भारतीय चित्रपटांच्या पोस्टरवर ‘ईस्टमन कलर’ का लिहायचे? याचा नेमका अर्थ काय? जाणून घ्या…

मल्टिप्लेक्स बॉक्स ऑफिस कलेक्शन ( Box Office Collection )

उदाहरणार्थ, एका मल्टिप्लेक्समध्ये एका तिकिटाची सरासरी किंमत २५० रुपये आहे. यात एकूण १०० लोकांनी चित्रपट पाहिला आणि संपूर्ण आठवड्यात चित्रपटाचे १०० शो आयोजित केले गेले. अशाप्रकारे चित्रपटाचे एकूण एका आठवड्याचे कलेक्शन २५०x१००x१०० = २५,००,००० रुपये होते. आता यातून ३० टक्के दराने करमणूक कर वजा केल्यावर एकूण १७,५०,००० रुपये शिल्लक राहतात. करारानुसार, या कमाईतील ५० टक्के रक्कम पहिल्या आठवड्यात वितरकाकडे जाईल. दुसऱ्या आठवड्यात ४२ टक्के अशाप्रकारे चित्रपट चालू असेपर्यंत करारानुसार वितरकाला पैसे मिळत जातात.

हेही वाचा : अमिताभ बच्चन व अभिषेक बच्चन या बापलेकाच्या जोडीचं नाव आहे ‘गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रिकॉर्ड’मध्ये, जाणून घ्या यामागचं कारण

सिंगल स्क्रीन बॉक्स ऑफिस कलेक्शन ( Box Office Collection )

उदाहरणार्थ, सिंगल स्क्रीनवर तिकिटाची किंमत १५० रुपये आहे. संपूर्ण आठवड्यात १०० शो दाखवले जातात आणि प्रत्येक शोमध्ये १०० लोक चित्रपट पाहतात. यानुसार, संपूर्ण आठवड्यासाठी सिनेमा हॉलचे एकूण कलेक्शन १५०x१००x१०० = १५,००,००० रुपये असेल. आता यातून ३० टक्के दराने करमणूक कर वजा केल्यावर एकूण कमाई १०,५०,००० रुपये होईल. आता करारानुसार, कमाईच्या ८० टक्के रक्कम वितरकाकडे जायची असेल, तर त्याला एका आठवड्यात एकूण ८,४०,००० रुपये मिळतील. वितरकाला चित्रपट चालेल तसा पुढील आठवड्यांमध्ये त्याचा वाटा दिला जातो.