भारतात भेट देण्यासारखी अनेक पर्यटन स्थळे आहेत. लोक भारतातील प्रसिध्द ठिकाण, जसे की, ताजमहाल, त्र्यंबकेश्वर शिव मंदिर, लाल किल्ला यांसारख्या अनेक ठिकाणी भेट देतात. परंतु, भारतात अशीही ठिकाणे आहेत, ज्या ठिकाणांचे त्यांचे त्यांचे खास वैशिष्ट्य आहे. या ठिकाणांविषयी आणि तेथील अनोख्या आश्चर्यांविषयी अनेकांना माहीत नाही. त्याविषयीच जाणून घेऊयात.
राजस्थान येथील करणी माता मंदिर
राजस्थानातील देशनोके येथे करणी मातेचे प्रसिद्ध मंदिर आहे. या मंदिरात उंदरांची पूजा केली जाते. या मंदिरात २०,००० हून अधिक उंदीर आहेत, ज्यांना कब्बा म्हणून ओळखले जाते. या उंदरांना करणी मातेचा अवतार मानले जात असल्याने त्यांची पूजा केली जाते. या मंदिरात दररोज शेकडो भाविक या उंदरांची पूजा करण्यासाठी आणि त्यांना खायला घालण्यासाठी येतात. मंदिरातील पांढऱ्या उंदरांना शुभ मानले जाते परंतु ते फार क्वचित आढळतात. या मंदिरात उंदरावर पाय देणे पाप मानले जाते.
अहमदाबाद येथील स्मशानातील रेस्टॉरंट

गुजरातमधील अहमदाबादच्या लाल दरवाजा भागात असणारे स्थित हे रेस्टॉरंट एका स्मशानभूमीवर बांधले आहे. या रेस्टॉरंटमध्ये दफन करण्यात आलेल्या कबरींच्या आजूबाजूलाच टेबल आणि खुर्च्या आहेत. लकी रेस्टॉरंट मध्ये येणारे लोक कबरींच्या बाजूला बसूनच चहा, कॉफी तसेच इतर खाद्यापदार्थांचा आस्वाद घेतात. अनेकांचे असे सांगणे आहे की, हे रेस्टॉरंट नावाप्रमाणे लकी आहे. महत्वाचे काम असेल तर येथे आल्यावर त्या कामात यश मिळते, असे अनेक ग्राहक सांगतात.

जोधपूर येथील ओम बन्ना मंदिर

ओम सिंग नावाचे एक व्यक्ती बाईकवरून घरी जात असताना तत्यांचा अपघात झाला आणि या अपघतात त्यांचा मृत्यू झाला. अपघातानंतर त्यांची दुचाकी पोलीस स्टेशनमध्ये नेण्यात आली, परंतु ही दुचाकी स्टेशनमधून गायब झाली आणि दुर्घटनास्थळी सापडली. त्यानंतर पुन्हा बाइक पोलीस स्टेशनमध्ये नेण्यात आली आणि पुन्हा ही बुलेट त्याच ठिकाणी परत आली. असे अनेकदा झाल्यानंतर पोलिसांनी दुचाकीला साखळीने बांधून ठेवले, मात्र दुसऱ्या दिवशी ती पुन्हा अपघाताच्या ठिकाणी सापडली. त्यानंतर, बाईक कायमची अपघाताच्या ठिकाणी ठेवण्यात आली आणि तिथे या बाईकचे मंदिर झाले.

तामिळनाडू येथील बटरबॉल

तामिळनाडूतील महाबलीपुरम येथे कृष्णाचा बटरबॉल म्हणून ओळखला जाणारा २५० टन वजनाचा दगड आहे. हा दगड ५ मीटर रुंदीचा आणि २० मीटर उंचीचा आहे. हा दगड आश्चर्यकारक स्थितीत आहे. हा दगड झुकलेल्या स्थितीत असलेल्या कोणत्याही क्षणी कोसळू शकतो, असे भासते. मात्र, गेली कित्येक दशके तो स्थिर आहे.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

कोलकाता येथील बोटॅनिकल गार्डन

कोलकाता येथील बोटॅनिकल गार्डनर येथे एक वडाचे झाड आहे. हे झाड दूरवरून घनदाट जंगलासारखे दिसते पण प्रत्यक्षात ते एकच झाड आहे. या झाडाला सुमारे ३,६०० मुळे आहेत संपूर्ण क्षेत्रात पसरलेली आहेत. त्यामुळे जंगलाचा आभास होतो. हे झाड प्रत्यक्षात जगातील सर्वात रुंद झाड आहे.