scorecardresearch

Premium

‘हा’ व्हायरस अँड्रॉइडसाठी ठरतोय धोकादायक ! केंद्रीय यंत्रणांनी दिलाय धोक्याचा इशारा !

‘Daam’ व्हायरस काय आहे आणि त्यापासून आपला फोन कसा सुरक्षित ठेवता येईल जाणून घेऊया…

Daam_virus_Loksatta
Daam व्हायरस अँड्रॉइडसाठी धोकादायक ठरत आहे. (ग्राफिक्स : प्राजक्ता राणे, लोकसत्ता ग्राफिक्स टीम)

तंत्रज्ञान जेवढे प्रगत होत आहे, तेवढेच ते धोकादायक ठरत आहे. नॅशनल सायबर सिक्युरिटी एजन्सीने जारी केलेल्या मार्गदर्शक तत्त्वांमध्ये ‘Daam’ या नवीन आलेल्या व्हायरसपासून ॲण्ड्रॉइडला धोका असल्याचे सांगितले आहेत. तेव्हा ‘Daam’ व्हायरस काय आहे आणि त्यापासून आपला फोन कसा सुरक्षित ठेवता येईल, जाणून घेऊया…

Daam virus : फिशिंग, हॅकिंग आणि अन्य ऑनलाइन हल्ल्यांपासून सायबर क्षेत्राची सुरक्षा करणारी केंद्रीय शाखा इंडियन कॉम्प्युटर इमर्जन्सी रिस्पॉन्स टीमने (CERT-In) ‘Daam’ व्हायरसबद्दल अधिक माहिती दिली.

thackeray group organizes hou de charcha event in kalyan dombivali
कल्याण-डोंबिवलीत ‘होऊ द्या चर्चां’च्या चौक सभा; शिवसेना ‘उबाठा’तर्फे आयोजन
Rishi Sunak and Akshata Murthy
ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक यांच्या पत्नी अक्षता मूर्ती यांचा G20 मधून परतताच मोठा निर्णय, ऐकून बसेल आश्चर्याचा धक्का
The employee boarded the truck to collect the toll from the truck driver
ट्रक चालकाकडून टोलचे पैसे घेण्यासाठी कर्मचारी चढला चालत्या ट्रकवर; Video पाहून हसू आवरणार नाही…
aditya thackeray letter to bmc commissioner demand to disposed accumulated waste in city
मुंबईत साचलेल्या कचऱ्याच्या ढिगांची विल्हेवाट लावावी; आदित्य ठाकरे यांचे मुंबई महानगरपालिका आयुक्तांना पत्र

‘Daam’ व्हायरसपासून असणारा धोका

व्हायरस स्कॅनिंग, सिक्युरिटी, ॲण्टीव्हायरस सिस्टीम अशा व्हायरसरोधक कार्यप्रणाली या ‘Daam’ व्हायरसला रोखू शकत नाहीत. हा व्हायरस सर्व परवानग्या आणि ॲण्टीव्हायरस प्रणाली सहज पार करतो. त्यानंतर तुमच्या फोनचा कॅमेरा, कॉल्स, कॉल लॉग, सर्च हिस्ट्री, बुकमार्क्स या प्रकारची वैयक्तिक माहिती हॅक करतो. तुमच्या ॲण्ड्रॉइड फोनमधील कॉन्टॅक्ट्स आणि कॅमेरादेखील हा व्हायरस हॅक करतो. यासोबत मोबाइलमधील पासवर्ड बदलणे, स्क्रीनशॉट घेणे, एसएमएस रीड करणे, फाइल्स अपलोड आणि डाऊनलोड करून C2 सर्व्हरला पाठवणे, असेही या व्हायरसमुळे घडू शकते.
‘Daam’ व्हायरस तुमच्या मोबाइलमधील डेटा आणि फाइल्स ओळखण्यासाठी मालवेअर अ‍ॅडव्हान्स इन्क्रिप्शन सिस्टीमचा वापर करतो. या इनक्रिप्टेड फाइल्सना ‘.enc’ असे पुढे लिहिलेले दिसते. या फाइल्सव्यतिरिक्त इतर सर्व डेटा हा व्हायरस डिलीट करून टाकतो. यासोबतच ‘readme_now.txt’ नावाची एक नोट हा मालवेअर तुमच्या फोनमध्ये ठेवतो. या व्हायरसमुळे तुमच्या मोबाइलमधील डेटा चोरी होतो.

हेही वाचा : विश्लेषण : काँग्रेस की भाजपा! लिंगायत समाजाची मतं नेमकी कोणाला? कर्नाटकच्या राजकारणात १७ टक्के मतदारांचे महत्त्व काय?

व्हायरसपासून काळजी कशी घ्याल ?

इंडियन कॉम्प्युटर इमर्जन्सी रिस्पॉन्स टीम (CERT-IN) ने ‘Daam’ पासून फोन सुरक्षित राखण्यासाठी काही मार्गदर्शक सूचना केल्या आहेत.
गूगल किंवा अधिकृत ॲप्स स्टोअरमधून ॲप्स डाऊनलोड करा. तसेच आपल्याला हव्या असणाऱ्या ॲपची पूर्ण माहिती डाउनलोड करण्याआधी वाचून घ्या. तसेच रिव्ह्यू बघून घ्या. त्या ॲपला आवश्यक तेवढ्याच परवानग्या (allow) द्या. ॲण्ड्रॉइडचे अधिकृत अपडेट्स जेव्हा येतील तेव्हा फोन अपडेट करून घ्या. विश्वास नसलेल्या वेबसाइट्स ओपन करू नका. तसेच अनावश्यक लिंक्स ओपन करून बघू नका. परदेशातून येणारे अनोळखी कॉल, मेसेज तसेच संशयास्पद मोबाइल नंबर वाटल्यास त्यांच्यापासून लांब राहा. सुरक्षित असणाऱ्या यूआरएलवर क्लिक करा. कोणत्याही ॲपची सुरक्षितता तपासून घ्या. वेबसाइट्सवरील सर्वच ‘कुकीज’ स्वीकारू नका. माहीत नसलेल्या पैसे किंवा बक्षिसांच्या ऑफर स्वीकारू नका.

हेही वाचा : विश्लेषण : रविवारनंतर सोमवारच का येतो ? आठवड्याची रचना कोणी केली ?

अनोळखी क्रमांकापासून सावध राहा

बँक किंवा अन्य कंपन्यांचे शॉर्टफॉर्म्स वापरून अनोळखी क्रमांकावरून मेसेज येऊ शकतात. ते काही लिंकही मेसेजमध्ये देतात. माहीत नसलेल्या किंवा http नसलेल्या लिंक ओपन करू नका. bitly किंवा tinyurl अशी लघू स्वरूपातील लिंक ओपन करू नका. यामुळे व्हायरस तुमच्या फोनमध्ये शिरू शकतो.

तुमचा फोन अधिकृत अपडेट नोटिफिकेशन आल्यावर अपडेट करा आणि फोन सुरक्षित ठेवा.

Latest Comment
View All Comments
Post Comment

मराठीतील सर्व FYI बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: Daam virus is becoming dangerous for android central agencies have given warning of danger vvk

संबंधित बातम्या

तुम्ही या बातम्या वाचल्या आहेत का? ×