Remove Non-Consensual Explicit Deepfake Content From Search Results : सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणावर फेक अकाउंट्स व प्रोफाईल्स रोज तयार होत असतात आणि या गोष्टींचे शिकार सामान्य जनतेपासून ते अनेक कलाकारही होत असतात. मग यामध्ये डीपफेक व्हिडीओ, नग्न (न्यूड) फोटो आदींचा समावेश असतो. काही वेळेस चॅटिंगच्या माध्यमातून सुरू झालेली मैत्री प्रेमात बदलते आणि मग प्रेम, आकर्षण यांसारख्या भावनांमध्ये नंतर नग्न (न्यूड) फोटोंची अदलाबदल होते; तर कधी पैशांसाठी किशोरवयीन मुलांना ब्लॅकमेलसुद्धा केले जाते. या प्रकरणामुळे काही जण आत्महत्या करायला मागे पुढे पाहत नाहीत. पण, आता तुम्हाला चिंता करण्याची गरज नाही. कारण यावर गूगल कंपनीने उपाय शोधून काढला आहे.

या महिन्याच्या सुरुवातीला गूगलने जाहीर केले की, कंपनी संमती न दर्शवलेल्या डीपफेकवर (Deepfake) कारवाई करत आहे आणि गूगल सर्चमधून हे फोटोज काढून टाकणे शक्य होणार आहे. कारण आता तुम्ही गूगल सर्चमधून डीपफेक काढून टाकण्यासाठी गूगलकडे विनंती (रिक्वेस्ट ) करू शकता. तर तुमची नग्न प्रतिमा किंवा व्हिडीओ गूगल सर्च किंवा वेबपेजवर दिसत असल्यास, सर्च इंजिनमधून ते काढून टाकण्याचा सर्वात सोपा मार्ग म्हणजे वेब फॉर्म भरणे आहे.

Bestune Xiaoma Mini EV
Bestune Xiaoma Small EV बाजारात घालणार धुमाकूळ! एकदा चार्ज केल्यानंतर १२०० किमीपर्यंत धावते, किंमत फक्त….
aarya jadhao reacts on bigg boss marathi show is scripted
Bigg Boss हा शो स्क्रिप्टेड असतो का? घराबाहेर गेलेल्या आर्याने सांगितलं सत्य, म्हणाली…
PresVu Eye Drop Drug regulator suspends licence
PresVu Eye Drop : चष्म्याचा नंबर घालवण्याचा दावा करणाऱ्या आय ड्रॉपच्या विक्रीचा परवाना दोनच दिवसांत निलंबित; कारण काय
share trading app investment fraud
पिंपरी: शेअर ट्रेडिंग अ‍ॅपमधील गुंतवणुकीच्या बहाण्याने गंडा घालणारी टोळी अटकेत; चार कोटींचे व्यवहार
In his police complaint, the man said the woman threatened to defame him in October last year by telling his friends and family about their relationship (File Photo)
Mumbai Crime : “१० लाख रुपये दे नाहीतर बलात्काराच्या खोट्या प्रकरणात..”, मुंबईत महिलेची एक्स बॉयफ्रेंडला धमकी
Gold Silver Price
Gold-Silver Price: ग्राहकांच्या चेहऱ्यावर आनंद! दरवाढीनंतर सोन्याचे भाव झालेत कमी, १० ग्रॅमची किंमत जाणून घ्या
man steals jewellery and mother-in-law sells it both arrested
पिंपरी : जावई चोरायचा दागिने आणि सासू करायची विक्री; ‘असे’ फुटले बिंग
Tata Curvv Ev Waiting Periods Extended From 14 Days To 56 Days After Launch Tata Curvv EV
Tata Curvv EV: ही नवीन इलेक्ट्रिक कार खरेदी करण्यासाठी तुटून पडले ग्राहक; लाँचिंगनंतर वेटिंग पीरियड पोहचला चक्क ५६ दिवसांवर

संमती न दर्शवलेले डीपफेक व्हिडीओ, फोटो काढून टाकण्यासाठी गूगलला कसे सांगावे, त्याच्या स्टेप्स पुढीलप्रमाणे :

१. https://support.google.com/websearch/contact/content_removal_form या लिंकवर क्लिक करून वेब फॉर्म उघडा.

२. खाली दिलेल्या पर्यायांपैकी, “Content contains nudity or sexual material” हा पर्याय निवडा.

३. जर तुम्ही भारतात रहात असल्यास, गूगल तुमच्यासमोर एक फॉर्म दाखवेल, ज्यामध्ये https://support.google.com/legal/contact/lr_idmec?sjid=5279593483170582200-AP या लिंकचा वापर करून प्रवेश केला जाऊ शकतो.

हेही वाचा…वाढदिवसाला तुम्ही आनंदी असता की दुःखी? ‘या’ दोन्ही गोष्टींचा ‘Birthday Blues’शी काय संबंध ? ‘बर्थडे ब्लूज’ म्हणजे नेमकं काय, जाणून घ्या…

४. नंतर ड्रॉप-डाउन मेनूमध्ये जाऊन गूगल सर्चवर क्लिक करा आणि “Nudity of graphic sexual content” नावाचा पर्याय निवडा.

५. खाली स्क्रोल करा आणि तुमचं नाव, ईमेल आणि पत्त्यासह तुमची काही वैयक्तिक माहिती भरावी लागेल आणि तुम्ही कोणाच्या वतीने कारवाई करत आहात हे सुद्धा तुम्हाला स्पष्ट करावे लागेल.

६. युजर्सनी ज्या URL वर डीपफेक व्हिडीओ, फोटो पाहिला त्याचा उल्लेख करणे, स्क्रीनशॉट पोस्ट करणे आणि ते का काढायचे आहे, याचे कारण नमूद करणेदेखील आवश्यक आहे.

७. एकदा का तुम्ही सर्व माहिती व्यवस्थित फॉर्ममध्ये भरली की सबमिट बटणावर क्लिक करा. नंतर तुम्ही दिलेली माहिती सत्य आहे की नाही हे गूगल शोधण्यास सुरुवात करेल. त्यानंतर ती गूगल सर्चधून काढून टाकली जाईल.

तसेच सर्व युजर्सनी ही गोष्ट लक्षात ठेवावी की, फॉर्ममध्ये तुम्हाला तुमची डिजिटल स्वाक्षरी करणे गरजेचे असेल; जी तुमच्या प्रत्यक्ष स्वाक्षरीइतकीच वैध असते. म्हणून तुम्ही सर्व माहिती खरी आणि योग्यरित्या नमूद केल्याची खात्री करा आणि सबमिट बटण दाबण्यापूर्वी माहितीची पडताळणी करा.