प्राथमिक शिक्षण पूर्ण होईपर्यंत शाळांमध्ये विद्यार्थी पेन्सिल वापरतात. माध्यमिक शिक्षण घेत असताना विद्यार्थी पेन वापरू लागतात. परंतु, शिक्षण पूर्ण होईपर्यंत पेन्सिलचा वापर चालूच असतो. यासह चित्रकलेसाठीदेखील पेन्सिलचा वापर केला जातो. ही पेन्सिल आपण कशी खरेदी करतो? आपण दुकानात जातो आणि दुकानदार देईल ती पेन्सिल घेऊन घरी येतो. परंतु, आपण असं करणं चुकीचं आहे. कारण कदाचित दुकानदाराने आपल्याला चुकीची पेन्सिल दिलेली असू शकते. आता तुम्ही म्हणाल चुकीची पेन्सिल म्हणजे काय? आज आम्ही तुम्हाला त्याचीच माहिती देणार आहोत. कारण पेन्सिलचे अनेक प्रकार आहेत.

आपण एखादी पेन्सिल खरेदी करतो तेव्हा केवळ त्या पेन्सिलची किंमत पाहतो. परंतु, त्या पेन्सिलवरील कोडकडे दुर्लक्ष करतो. पेन्सिलवर HB, 2B, 4B, 2H, 4H, 9H असे कोड असतात. यामधील एच म्हणजे हार्डनेस (पेन्सिलच्या लीडचा कडकपणा) आणि बी म्हणजे ब्लॅकनेस (लीडचा कागदावरील काळा गडदगपणा किंवा ठळकपणा). या कोड्सचा पेन्सिलच्या वापराशी संबंध आहे.

Who will be the Chief Minister Vidhan sabha election 2024
“कोण होणार मुख्यमंत्री?” शिंदे की फणडवीस? कोणाचा पक्ष मारणार बाजी? ज्योतिषतज्ज्ञांनी सांगितली भविष्यवाणी
CM Devendra Fadnavis on LOP
CM Devendra Fadnavis on LOP: विधानसभेत विरोधी पक्षनेतेपद…

पेन्सिलवर दिलेल्या कोडमध्ये एचच्या आधी लिहिला जाणारा अंक जसजसा वाढत जातो तसतसा पेन्सिलच्या लीडचा हार्डनेस वाढत जातो. कमी हार्डनेस असलेल्या पेन्सिल आर्टिस्टिक वर्कसाठी म्हणजेच पेन्सिलच्या लीडवर कोरीव काम करण्यासाठी वापरल्या जातात. तर जास्त हार्डनेसवाल्या पेन्सिल लिहिण्यासाठी वापरल्या जातात. तसेच अधिक ठळक लिहिता यावं म्हणून अधिक ब्लॅकनेस असलेल्या पेन्सिलचा वापर केला जातो.

वर दिलेली माहिती वाचल्यानंतरही कोणती पेन्सिल घ्यायची याबाबत तुमच्या मनात गोंधळ असेल तर तुम्ही तुमच्या रोजच्या कामासाठी, लिहिण्यासाठी एचबी हा कोड लिहिलेली पेन्सिल खरेदी करा. या पेन्सिलला रेग्युलर पेन्सिल असंही म्हणतात. जी कोणत्याही दुकानात, लहान-मोठ्या स्टेशनरीत सहज उपलब्ध असते. या पेन्सिलचा लिहिण्यासाठी आणि चित्रकलेसाठीदेखील वापर केला जातो.

Story img Loader