7 Affordable Cities in India to Live : नोकरीसाठी किंवा शिक्षणासाठी किंवा फिरायला जाण्यासाठी जेव्हा आपण घरातून बाहेर पडतो तेव्हा आपण आपल्याला सोयीस्कर, कमी खर्चात चांगले राहता येईल ,खाता येईल असे ठिकाण शोधतो. पण तुम्हाला माहीत आहे का आपल्या देशात राहण्यासाठी सर्वात जास्त परवडणारी शहरे कोणती आहे? आज आपण अशाच ७ शहरांविषयी जाणून घेणार आहोत.

तिरुवनंतपुरम (Thiruvananthapuram)

केरळ राज्याची राज्याची राजधानी असलेले तिरुवनंतपुरम एक चांगले पर्यटन स्थळ आहे. ‘तिरू-अनंत- पुरम’म्हणजे अनंताचे शहर असा त्याचा अर्थ होतो. कमी भाडे, उत्कृष्ट सार्वजानिक वाहतूक आणि समुद्रकिनाऱ्यालगत पसरलेल्या सुंदर समुद्रकिनाऱ्यांसाठी हे शहर अधिक प्रसिद्ध आहे.

जयपूर (Jaipur)

राजस्थान राज्याची राजधानी आणि गुलाबी शहर म्हणून जगभर ओळखले जाणारे जयपूर एक महत्त्वाचे पर्यटन स्थळ आहे. या शहरात सर्वच गोष्टी परवडणाऱ्या किमतीत मिळतात. भाडे असो किंवा जेवणाचे दर येथे खूप कमी आहे.

कोईम्बतूर (Coimbatore)

तामिळनाडू राज्यातील चेन्नईनंतर दुसरे मोठे शहर जर कोणते असेल तर के कोईम्बतूर आहे. वस्त्रोद्योगासाठी हे शहर अधिक प्रसिद्ध आहे. येथील राहण्याची सुविधा, जेवण अत्यंत स्वस्त दरात उपलब्ध आहे. आरोग्यसेवा सुद्धा उपलब्ध आहे. विशेष म्हणजे येथे आता नोकरीच्या संधी वाढत आहे.

इन्दौर (Indore)

मध्यप्रदेशची व्यावसायिक राजधानी म्हणून इन्दौर शहर ओळखले जाते. स्वच्छ व विकसनशील शहर म्हणून या शहराची एक वेगळी ओळख आहे. येथे परवडणारी रिअल इस्टेट, विद्यार्थ्यांना परवडणारे पर्याय आणि प्रवास खर्च स्वस्त आहे.

कोलकाता (Kolkata)

भारतातील सर्वात स्वस्त शहरांपैकी एक म्हणजे कोलकाता. संस्कृतीने समृद्ध असलेले हे शहर राहण्या खाण्याची अतिशय सोयीस्कर आहे. कमी दरात भाडे, वाहतूकीचा खर्च आणि जेवण येथे सहज मिळते.

चंदीगड(Chandigarh)

भारतातील सर्वात स्वच्छ शहरांपैकी एक शहर म्हणजे चंदीगड. येथील राहण्याचा खाण्याचा खर्च कमी आहे आणि कमी खर्चात येथे उच्च दराच्या सोयी सुविधा उपलब्ध आहे.

नागपूर (Nagpur)

देशाच्या मध्यभागी असलेले शहर म्हणजे नागपूर. नागपूरमध्ये परवडणारे अपार्टमेंट, कमीत कमी किमतीत जेवणाची व्यवस्था, मेट्रो कनेक्टिव्हिटी इतर सुविधा आहे. त्यामुळे राहण्यासाठी नागपूर हा एक चांगला पर्याय ठरू शकते.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.