कोविडमुळे ओटीटीवर चित्रपट आणि वेब सीरिज पाहायची लोकांना सवय झालेली असली तरी आजही चित्रपटगृहांत जाऊन त्या कलाकृतीचा आनंद घेणं हा एक वेगळाच अनुभव असतो. सहकुटुंब किंवा मित्रपरिवारासह त्या हाऊसफुल्ल अंधाऱ्या हॉलमध्ये बसून पडद्यावरील नाट्य बघण्याची मजा काही औरच असते.

आधी सिंगल स्क्रीन्समध्ये चित्रपट बघायला गेल्यावर आतमध्ये उभा असलेला माणूस हातातील टॉर्चने सीट नंबर बघून त्याच टॉर्चच्या प्रकाशात आपल्याला आपली सीट दाखवून द्यायचा आणि मग त्या अंधारात चाचपडत आपण आपल्या जागेपर्यंत पोहोचायचो. हळूहळू मल्टीप्लेक्सचा उदय झाला आणि हे मग सगळेच बदल घडत गेले. आज याच मल्टीप्लेक्समधील सर्वात मोठी चेन म्हणजे पीव्हीआर सिनेमा.

Watch waiter’s priceless reaction to sketch artist's sweet surprise
न मिळालेल्या कौतुकाची पोचपावती! कलाकारानं हॉटेलच्या बिलवर रेखाटलं वेटरचं सुरेख चित्र; चेहऱ्यावर उमटलं सुंदर हास्य, Video Viral
South Superstar Allu Arjun Pushpa 2 The Rule makers spent 60 crore on Gangamma Thalli jatara scene
अल्लू अर्जुनच्या ‘पुष्पा २: द रुल’ चित्रपटातील ‘या’ सीनसाठी खर्च केले ६० कोटी रुपये! एक-दोन नव्हे तर ‘इतके’ दिवस लागले शूटिंगसाठी
The Kerala Story screening in church
‘लव्ह जिहाद’चं कारण देत विद्यार्थ्यांना दाखवला ‘द केरला स्टोरी’ चित्रपट; केरळच्या चर्चमधला प्रकार!
vfx oscar winner tim mcgovern
व्यक्तिवेध : टिम मॅकगव्हर्न

आणखी वाचा : बऱ्याच जणांचे वाढदिवस १ जूनला का असतात ? ‘सरकारी वाढदिवस’ म्हणजे काय ?

आज पीव्हीआरने देशातील कानाकोपऱ्यात त्यांची मल्टीप्लेक्स सुरू केली आहेत. प्रेक्षकांना चित्रपट पाहण्याचा एक भव्य अनुभव पीव्हीआर द्यायचा प्रयत्न करतं. याच पीव्हीआर चित्रपटगृहांबद्दलची एक अशी गोष्ट आम्ही तुम्हाला सांगणार आहोत, ज्याकडे तुमचं आजवर कधीच लक्ष गेलं नसेल. पीव्हीआरमध्ये बसायच्या ज्या आडव्या रांगा असतात त्यांना A,B,C अशी अनुक्रमाने नावं दिलेली असतात, पण तुम्हाला ठाऊक आहे का की केवळ पीव्हीआरमध्येच या रांगांमध्ये ‘I’ आणि ‘O’ रांग पाहायला मिळत नाही.

kurlaPVR
कुर्ला पीव्हीआर
PVR1
जुहू पीव्हीआर
PVR3
PVR3

यामागील नेमकं कारण तुम्हाला ठाऊक नसेल किंवा आजवर तुमचं याकडे लक्षही गेलं नसेल, पण यामागे एक ठोस कारण आहे. याचं अगदी सोप्पं कारण आहे. ‘I’ हे अक्षर पटकन लोकांना ‘1’ या आकड्यासारखं वाटतं आणि अगदी त्याप्रमाणेच ‘O’ हे अक्षर आणि ‘0’ हा आकडा यातही बऱ्याच लोकांचा गोंधळ उडतो. प्रेक्षकांचा उडणारा हाच गोंधळ दूर करण्यासाठी आणि त्यांना चित्रपटगृहात शिरल्यावर आपली सीट शोधताना कोणतीही गैरसोय होऊ नये यासाठी जाणून बुजून पीव्हीआरच्या सगळ्याच चित्रपटगृहांत ‘I’ आणि ‘O’ या दोन रांगा वगळण्यात आल्या आहेत.