scorecardresearch

तुम्हाला टुथपेस्ट ट्युबच्या खाली असलेल्या ‘या’ रंगाचा अर्थ माहित आहे का? नसेल तर एकदा जाणून घ्याच

तुम्ही टूथपेस्टच्या ट्यूबकडे कधी लक्ष दिले आहे का? जर होय, तर तुम्ही टूथपेस्टच्या मागील बाजूस बनवलेला रंगाचा कोड देखील पाहिला असेल. पण तुम्हाला या रंगाचा नक्की अर्थ माहित आहे का?

तुम्हाला टुथपेस्ट ट्युबच्या खाली असलेल्या ‘या’ रंगाचा अर्थ माहित आहे का? नसेल तर एकदा जाणून घ्याच
photo: social media

दररोज सकाळी उठल्यानंतर आपण सर्वात आधी ब्रश करतो. ब्रश करतेवेळी तुम्ही वेगवेगळ्या टुथपेस्टचा वापर करत असाल. पण तुम्ही कधी टुथपेस्टकडे नीट लक्ष दिले असेल तर तुम्हाला दिसेल की टूथपेस्टच्या खालच्या बाजूला कलर बार दिलेला असेल. वेगवेगळ्या टूथपेस्टच्या ट्युबवर वेगवेगळ्या रंगाचा कलर कोड असतो. या रंगाचे कोड नक्की का दिले जातात याचा विचार तुम्ही कधी केलाय का? या रंगांचा नक्की अर्थ काय आहे? जाणून घ्या..

सोशल मीडियावर, तुम्ही अनेक साइट्सना हा दावा करताना पाहिले असेल की टुथपेस्टच्या मागे बनवलेल्या या लाल, हिरव्या, काळ्या आणि निळ्या रंगांचा अर्थ टूथपेस्टमध्ये वापरल्या जाणाऱ्या सामग्रीशी संबंधित आहे. सोशल मीडियावर असे सांगितले जाते की, पेस्टवरील हिरव्या चिन्हाचा अर्थ असा आहे की टुथपेस्ट पूर्णपणे नैसर्गिक आहे. निळ्या रंगाचा अर्थ असा आहे की यात नैसर्गिक घटक आणि औषधांचे मिश्रण आहे. लाल रंगाचा अर्थ म्हणजे त्यात नैसर्गिक घटक आणि रासायनिक घटक आहेत आणि ब्लॅक मार्क म्हणजे त्यात सर्व रासायनिक घटक असतात. पण या दाव्यात किती तथ्य आहे?

नेमका खरा अर्थ काय?

ओरल हेल्थ केअर कंपनी कोलगेटने आपल्या वेबसाइटवर हा दावा नाकारला आहे आणि या बार कोडचा खरा अर्थ स्पष्ट केला आहे. कोलगेटने सांगितले की, टूथपेस्टवर बनवलेल्या या रंगीबेरंगी पट्ट्यांचा त्यात असणाऱ्या घटकांशी काहीही संबंध नाही आहे. कोलगेटचे म्हणणे आहे की या कलर कोडचे कारण टूथपेस्टच्या ट्यूब बनवण्याच्या पद्धतीशी संबंधित आहे.

( हे ही वाचा: संध्याकाळ होताच तुमच्या डोक्यावर डास का फिरू लागतात? यामागील ‘हे’ गंभीर कारण ऐकून तुम्हीही थक्क व्हाल)

कोलगेटच्या म्हणण्यानुसार, टूथपेस्टचा रंग ट्यूब बनवणाऱ्या मशीनमध्ये बसवलेल्या लाईट सेन्सरला सूचित करतो की ट्यूब कोणत्या प्रकारची आणि कोणत्या आकाराची बनवायची आहे. त्याच वेळी, ट्यूबला कुठून कापून सीलबंद करायचे आहे.

मराठीतील सर्व FYI ( Do-you-know ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

First published on: 27-12-2022 at 14:11 IST

संबंधित बातम्या