Indian Currency: पैशाचे महत्त्व अनन्यसाधारण आहे कारण पैशाशिवाय संसाराचे काही पाडगा हालत नाही. बाजारातून कोणतीही वस्तू घ्यायची असेल तर रुपये मोजावे लागतात. आजच्या युगात चलन म्हणून नाणी आणि नोटा वापरल्या जातात. नोटाबंदी झाली आणि ५००, १००० च्या जुन्या नोटा बंद झाल्या अन् नवीन नोटा चलनात आल्या. नवीन नोटांचा आकार, रंग, छपाई सर्व काही बदलले आहे, परंतु एक गोष्ट आहे जी बदलली नाही, ती म्हणजे नोटावर लिहिलेली ओळ. 'मैं धारक को…रुपये अदा करने का वचन देता हूँ', १० ते २००० रुपयांच्या नोटांवरही हेच वाक्य लिहिलेलं आहे. पण तुम्हाला या वाक्याचे महत्त्व समजले का? याचा अर्थ काय आणि ते लिहिले नाही तर काय होईल, याचा कधी विचार केला आहे का, चला तर मग या वाक्यामागचं अर्थ आपण समजून घेऊया… नोटांवर असणाऱ्या 'या' रेषांचा अर्थ माहितेय? तुमच्या लक्षात आले असेल, तर १००, २००, ५०० आणि २००० रुपयांच्या नोटांवर बाजूला तिरकस रेषा दिसतात. या ओळींना 'ब्लीड मार्क्स' (Bleed Marks) म्हणतात. वास्तविक, या अंध, दिव्यांग व्यक्तींसाठी बनवलेल्या आहेत. ज्यांना दिसत नाही, असे लोक नोटेवर केलेल्या या ओळींना स्पर्श करून त्या नोटेची किंमत किती आहे, हे ओळखू शकतात. म्हणूनच या तिरकस रेषा १००, २००, ५०० आणि २००० च्या नोटांवर वेगवेगळ्या छापण्यात येतात. (हे ही वाचा : सोनं खरेदी करताय? भारतातील ‘या’ शहरांमध्ये मिळतं सर्वात स्वस्त सोनं, नाव ऐकून हैराण व्हाल!) १ रुपयाच्या नोटेवर कोणाची स्वाक्षरी असते? भारतात १ रुपयांपासून २००० रुपयांपर्यंतच्या नोटा चलनात आहेत. या सर्व नोटांच्या मूल्यासाठी आरबीआय गव्हर्नर जबाबदार आहेत. एक रुपयाची नोट वगळता इतर सर्व नोटांवर RBI गव्हर्नरची सही असते. तर एक रुपयाच्या नोटेवर भारताच्या वित्त सचिवांची स्वाक्षरी असते. प्रत्येक नोटेवर "मैं धारक को…रुपये अदा करने का वचन देता हूँ", ही ओळ का असते? भारतातील सर्व नोटा छापण्याची आणि वितरित करण्याची जबाबदारी भारतीय रिझर्व्ह बँकेची (RBI) आहे. रिझर्व्ह बँक धारकाला (म्हणजे नोट धारकाला) विश्वास देण्यासाठी हे शब्द नोटेवर लिहिते. म्हणजे तुमच्याकडे असलेल्या नोटेचं मूल्य जितकं आहे, त्याच मूल्याचं सोनं (Gold) आरबीआयकडे राखीव ठेवलं जातं. म्हणजेच, त्या मूल्याच्या नोटेसाठी धारक जबाबदार आहे, याची हमी दिली जाते.