scorecardresearch

प्लास्टिकच्या स्टूलवर का असते छिद्र? जाणून घ्या त्यामागचे महत्वाचे कारण

Plastic stool: जगभरात कुठेही बनवलेल्या प्लास्टिकच्या स्टूलच्या मध्यभागी एक मोठे छिद्र जाणीवपूर्वक ठेवले जाते

प्लास्टिकच्या स्टूलवर का असते छिद्र? जाणून घ्या त्यामागचे महत्वाचे कारण
आपण वापरत असलेल्या प्लास्टिकच्या स्टूलवर छिद्र का असते? यामागचे कारण जाणून घेऊया. (Photo : Pixabay)

आपल्या आसपास अनेक अशा वस्तू असतात ज्या आपण रोज पाहतो परंतु त्या तशाच का आहेत? याबाबत आपल्या मनामध्ये अनेक प्रश्न निर्माण होत असतात. शिवाय त्या प्रश्नांचे समाधानकारक उत्तर आपणाला मिळतं नाही. त्यामुळे त्या गोष्टींबद्दल असणारं कुतुहल काही केल्या कमी होत नाही. त्यामध्ये आपण रोज वापरत असणाऱ्या मोबाईल फोनपासून ते शर्टचे बटन, पॅंटच्या खिशांबाबत हे असंच का? अशा अनेक शंका आपल्या मनात निर्माण होत असतात.

हेही वाचा- अडचणीत असताना शेअर करता येईल Location, अँड्रॉइड युजर्स ‘असे’ वापरा हे फीचर

अशीच एक वस्तू जी आपल्या प्रत्येकाच्या घरात हमखास दिसते ती म्हणजे प्लास्टिकचा स्टूल. याच स्टूलबाबत आम्ही तुम्हाला अनोखी माहिती सांगणार आहोत. ती म्हणजे तुम्ही वापरत असलेल्या प्लास्टिकच्या स्टूलवर छिद्र का असते? तुम्ही जर बारकाईने निरीक्षण केलं असेल तर तुमच्या लक्षात आले असेल की, प्रत्येक प्लास्टिकच्या स्टूलच्या मध्यभागी एक छिद्र असते. यामागे काही वैज्ञानिक कारणं आहेत ती जाणून घेऊयात.

वैज्ञानिक कारण –

हेही वाचा- WhatsApp Pay मधून कोणाकोणाला केले पेमेंट? संपूर्ण माहिती मिळवा, फॉलो करा ‘या’ स्टेप्स

मिडिया रिपोर्ट्सनुसार, प्लास्टिकच्या वस्तू बनवणारे सर्व कारखाने उत्पादनासाठी विज्ञानाचे सामान्य नियम पाळतात. मग तो कारखाना जगाच्या कोणत्याही कोपऱ्यात असला तरी त्यांनी बनवलेल्या प्लास्टिकच्या स्टूलच्या मध्यभागी एक मोठे छिद्र जाणीवपूर्वक ठेवले जाते. त्यामागचे कारण म्हणजे, घर, ऑफिस किंवा दुकानातील जागेच्या कमतरतेमुळे प्लॅस्टिकचे स्टूल अनेकदा एकमेकांच्या वर ठेवावे लागतात. या स्टूलमध्ये जर छिद्र नसेल तर ते एकमेकांना चिकटून राहण्याची शक्यता असते. शिवाय हवेचा दाब आणि व्हॅक्यूममुळे, त्यांना वेगळं करणं खूप अवघड होऊ शकतं. मात्र, या स्टूलला असणाऱ्या छिद्रामुळे ते एकमेकांपासून दुर करणं सहज शक्य होतं म्हणूनच विज्ञानाच्या नियमानुसार स्टूलमध्ये छिद्र ठेवलं जातं.

हेही वाचा- Reuse old smartphone : जुन्या फोनला बनवू शकता CCTV, आणखी कोणत्या कामासाठी वापरू शकता? जाणून घ्या

इतर कारणेही जाणून घ्या –

जसं वैज्ञानिक कारणं जाणून घेतलं त्याप्रमाणे इतर काही कारणांसाठीही स्टूलमध्ये छिद्र ठेवलं जातं. जेव्हा एखादी जास्त वजनाची व्यक्ती स्टूलवर उभी राहते आणि तरीही तो स्टूल न तुटण्यामागेही या छिद्राची महत्त्वाची भूमिका असते. शिवाय प्रत्येक स्टूलमध्ये हे छिद्र ठेवल्यामुळे कंपनीचे काही प्रमाणात मटेरियल म्हणजेच प्लास्टिकची देखील बतच होते. अशी अनेक कारणं स्टूलमध्ये छिद्र ठेवण्यामागे असतात. ही सर्व माहिती इंटरनेटच्या आधारे तुम्हाला दिली आहे. ज्याचा उद्देश तुम्हाला काही गोष्टींबद्दल असणाऱ्या शंकेचं निरसण व्हावं हा आहे. मात्र, आम्ही दिलेलं कारणं हेच अंतिम असल्याचा दावा आम्ही करत नाही.

मराठीतील सर्व FYI ( Do-you-know ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

First published on: 21-12-2022 at 12:01 IST

संबंधित बातम्या