scorecardresearch

नोटांवर लिहल्याने त्या निरूपयोगी होतात का? जाणून घ्या काय आहे RBI चा नियम

Writing On Banknotes: नोटांवर लिहलेले असेल तर त्या निरूपयोगी होतात का? याबाबत काय नियम आहे जाणून घ्या

नोटांवर लिहल्याने त्या निरूपयोगी होतात का? जाणून घ्या काय आहे RBI चा नियम
(फोटो: लोकसत्ता ग्राफिक्स टीम)

Writing On Banknotes: आपण अनेकवेळा अशा नोटा पाहतो ज्यावर काहीतरी लिहलेले असते. एखादा कोड, फोन नंबर किंवा अगदी थोडक्यात पत्ताही नोटांवर लिहलेला असतो. अशा नोटा कोणी आपल्याला दिल्या तर आपण त्या नाकारतो किंवा चुकून आपल्याकडे तशी नोट आली असेल तर आता हे पैसे वाया जाणार कारण ही नोट निरूपयोगी आहे असे आपल्याला वाटते. काही दिवसांपुर्वी सोशल मिडीयावर याबाबत एक मेसेज व्हायरल झाला होता. ज्यामध्ये नोटांवर काहीही लिहल्यास त्या निरूपयोगी ठरतात, पण हा मेसेज चुकीचा (फेक) होता.

आरबीआयने अशा फेक मेसेजेसवर विश्वास ठेऊ नये, ते फॉरवर्ड करू नये असे आवाहन केले आहे. आरबीआयनुसार अशा लिहलेल्या नोटा निरूपयोगी किंवा अमान्य ठरत नाहीत. पण नागरिकांनी असे नोटांवर लिहणे टाळावे, कारण त्यामुळे नोटा लगेच खराब होतात असे आरबीआयकडुन सांगण्यात आले आहे. याबाबत आरबीआयचा नियम काय आहे जाणून घ्या.

आणखी वाचा: पिवळ्या रंगाच्या बोर्डवर का लिहिले जाते रेल्वे स्टेशनचे नाव? जाणून घ्या यामागचे कारण

आरबीआयचा नियम
१९९९ मध्ये आरबीआयने क्लीन नोट पॉलिसी जाहीर केली, तेव्हापासून नोट आणि नाण्यांचां पुरवठा वाढवण्यासाठी अनेक प्रयत्न करण्यात आले. लोकांना नोटांवर लिहू नका असे आवाहन करण्यात आले आणि बँकांना कोणत्याही अडथळ्याशिवाय नोट बदलून देण्याच्या सूचना देण्यात आल्या. रिजर्व बँकेच्या निर्देशानुसार बँकांनी खराब झालेल्या, फाटलेल्या नोटांऐवजी चांगल्या नोटा बदलून द्याव्या.

कोणत्या नोट बदलल्या जात नाहीत
ज्या नोट जळालेल्या असतात किंवा एकमेकांना घट्ट चिकटलेल्या असतात, ज्या वेगळ्या करताना पुर्णपणे फाटू शकतात. अशा नोटा बदलल्या जात नाहीत.

आणखी वाचा- SBI WhatsApp Banking: बँक बॅलन्स, मिनी स्टेटमेंट, पेन्शन स्लिप व्हॉटसअ‍ॅपवर मिळवा; जाणून घ्या सोप्या स्टेप्स

नोट बदलताना या गोष्टी लक्षात ठेवा
एखादी नोट जर बदलायची असेल तर त्यावर ती नोट जारी करणाऱ्या अधिकाऱ्याचे नाव, हमी, वचन देण्यात आल्याचा मजकूर, स्वाक्षरी, अशोक स्तंभाचे प्रतिक/ महात्मा गांधींचे चित्र, वॉटरमार्क या गोष्टी असणे बंधनकारक आहे. या नोटा सार्वजनिक क्षेत्रातील बँकेत, कोणत्याही खाजगी क्षेत्रातील बँकेच्या करन्सी चेस्ट शाखेत किंवा आरबीआयच्या कोणत्याही जारी करण्यात आलेल्या कार्यालयातील काउंटरवर बदलल्या जाऊ शकतात.

मराठीतील सर्व FYI ( Do-you-know ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

First published on: 11-01-2023 at 13:16 IST

संबंधित बातम्या