भारतातील वेगाने वाढणारी वाहतूक आणि द्रुतगती मार्गावरील वाहनांचा वेग यामुळे होणाऱ्या अपघातांचे प्रमाण दिवसेंदिवस वाढत आहे. या अपघातांमध्ये मृत्यू होणाऱ्यांचे प्रमाण दिवसेंदिवस वाढत आहे. या अपघातांपासून बचाव करण्यासाठी काही नियमांबद्दल जाणून घेणे आवश्यक आहे, ज्यामुळे आपण स्वतःचा आणि इतरांचा अपघातापासून बचाव करू शकतो. बदलत्या जीवनशैलीमुळे लोकांचे जीवन धावपळीचे बनले आहे. त्यामुळे कार उत्पादन कंपन्यांनी देखील लोकांच्या सुरक्षिततेची काळजी घेऊन कार बनवताना अनेक सेफ्टी फीचर्स बनवतात. ही फीचर्स अपघात होण्यापूर्वी ड्रायव्हरला सावध करतात. ज्यामुळे महामार्गावरील अपघात होण्यास काही प्रमाणात आळा बसतो.

सध्या जगभरातील अनेक देशांमध्ये एका नियमाचे पालन केलं जातं ज्यामुळे महामार्गावरुन प्रवास करताना त्यांचा अपघातापासून बचाव होऊ शकतो. खरं तर हा नियम कायदेशीर नाही, मात्र त्याचे पालन केल्यास मोठ्या प्रमाणात अपघात टाळता येऊ शकतात, असं जागतिक स्तरावर मानलं गेलं आहे. जगातील अनेक देशांमध्ये याबाबत जनजागृती करण्यात येत आहे. मात्र, भारतामध्ये या नियमाबाबत जास्त जागरुकता नाही. या नियमामुळे वाहनचालकांनी महामार्गावरून वेगाने वाहन चालवले तरी अपघात टाळता येऊ शकतात. तर तो नियम कोणता आहे ते जाणून घेऊया.

nagpur, New Underpass, Road Under Railway line, Manas Chowk, Causes Issues, Large Vehicles, Traffic Congestion,
मानस चौकातील भुयारी मार्गामुळे नागपूरकरांना भोवळ! बोगदा संपताच सिग्नल असल्याने वाहतूक कोंडी
3 year old girl fall to death into a pothole on highway near titwala
टिटवाळ्याजवळ महामार्गाच्या खड्ड्यात पडून बालिकेचा मृत्यू
Jamtara Train accident
झारखंडच्या जामतारा स्थानकाजवळ मोठी दुर्घटना, रेल्वेची १२ प्रवाशांना धडक, दोन जणांचा मृत्यू
Ajni Chowk
नागपूर : पाच रस्ते, मेट्रोस्थानकामुळे अजनी चौक ‘अपघातप्रवण’! नीरीच्या नियोजित जागेवर मेट्रो स्थानक न बांधल्याचा फटका

३ सेकंदाचा नियम –

हेही वाचा- तुमच्या कारमध्ये असणाऱ्या ‘WD-40’ नावाच्या बाटलीचा अर्थ माहीत आहे का? जाणून आश्चर्यचकित व्हाल!

जगभरातील अनेक देशांमधील लोक ३ सेकंदाचा नियम पाळतात. या नियमामध्ये जेव्हा तुम्ही महामार्गावरून प्रवास करता तेव्हा तुमच्या वाहनामध्ये आणि समोरच्या वाहनामध्ये ३ सेकंदाचे अंतर ठेवणं आवश्यक असंत. हे अंतर ठेवल्यामुळे तुमचा अपघातापासून बचाव होऊ शकतो.

३ सेकंदाचा वेळ का?-

महामार्गावर तुम्ही वेगाने वाहन चालवत असताना ३ सेकंदाचा नियम पाळत असताल आणि याच वेळी तुमच्या समोरील वाहन चालकाने अचानक ब्रेक लावला तरी तुमचे वाहन त्या समोरच्या वाहनाला धडकण्यास किमान ३ सेकंदाचा वेळ लागेल. त्यामुळे समोरील वाहनाला धडकण्याआधी तुम्ही तुमचे वाहन बाजूला घेऊ शकता.

या नियमातील अंतर वेगानुसार बदलते –

या नियमामध्ये अंतर वेगानुसार बदलते म्हणजेच, जर तुम्ही १०० किमी प्रतितास वेगाने वाहन चालवत असाल तर तुमच्या आणि समोरच्या वाहनामध्ये किमान ६० मीटर अंतर असणे आवश्यक आहे. तसेच जर तुम्ही ५० किमी प्रतितास वेगाने वाहन चालवत असाल तर दोन्ही वाहनामध्ये ३० मीटर अंतर असणं आवश्यक आहे. शिवाय महामार्गावरील बहुतांशी अपघात समोरून किंवा मागून येणाऱ्या वाहनांमुळे होतात. त्यामुळे प्रत्येक वाहनचालकाने हा नियम वापरल्यास अपघाताला आळा बसू शकतो. शिवाय या नियमामुळे एखाद्या वाहनाने अचानक ब्रेक लावला तर तुमचे वाहन थांबवण्यासाठी तुमच्याकडे ३ सेकंदाता वेळ असतो. जो तुमचा अपघातापासून बचाव करु शकतो.

मोठ्या वाहनांसाठी नियमात बदल-

हेही वाचा- एक्स्पायरी डेटनंतर औषधांचे विष बनते? आज एक्सपायर झालेले औषध उद्या खाऊ शकतो का? जाणून घ्या

जर तुमच्याकडे SUV कार असेल, तर तुमचे अंतर ३ सेकंदाऐवजी ४ सेकंद असावे. दुसरीकडे, मोठे ट्रक आणि लोडिंग वाहनांसाठी हे अंतर ६ सेकंदांपर्यंत असावे ज्यामुळे आपत्कालीन परिस्थितीत अपघात टाळता येईल.

महामार्गावर किती वाहनांचा वेग किती असावा –

जेव्हा तुम्ही हायवे किंवा एक्स्प्रेस वेवर वाहन चालवता, तेव्हा वाहनाचा वेग ८० ते १०० किमी प्रतितास वेग असावा. या वेगात तुम्ही कारवर सहज नियंत्रण ठेवू शकता आणि या स्पीडमध्ये कार चांगले मायलेजही देते.

टिप – भारतात या ३ सेकंदांच्या नियमांबद्दल पुरेशी जागरूकता नाही. हा नियम प्रत्येक वाहनचालकाने पाळल्यास महामार्गावरील अपघात कमी होऊ शकतात. परंतु बंपर-टू-बंपर ट्रॅफिक असलेल्या रस्त्यावर या नियमाचे पालन केले जाऊ शकत नाही.