6 Airbag in A Car: रस्त्यांवर वाहने अधिक सुरक्षित करण्यासाठी रस्ते वाहतूक मंत्रालय नवीन नियम लागू करण्याच्या तयारीत आहे. मंत्रालयाच्या म्हणण्यानुसार, ८ प्रवासी बसू शकतील अशा कारमध्ये किमान ६ एअरबॅग देअसणे बंधनकारक असेल. हा नियम यावर्षी ऑक्टोबर २०२२ पासून लागू होणार आहे. रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्रालयाने (MoRTH) आपल्या निवेदनात म्हटले आहे की, प्रवाशांच्या सुरक्षेला चालना देण्यासाठी, केंद्रीय मोटर वाहन नियम (CMVR), १९८९ मध्ये सुधारणा करून सेफ्टी फीचर्स वाढवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

१४ जानेवारी रोजी जारी करण्यात आलेल्या मसुद्याच्या अधिसूचनेनुसार, M1 वर्गाच्या वाहनांसाठी हा निर्णय घेण्यात आला आहे. ५-८ सीट असलेल्या कार या श्रेणीत समाविष्ट आहेत. मंत्रालयाच्या नव्या निर्णयानुसार आता या गाड्यांमध्ये ६ एअरबॅग आवश्यक असणार आहेत. १ ऑक्टोबर २०२२ पासून उत्पादित केलेल्या कारमध्ये दोन बाजूंच्या एअरबॅग्ज आणि दोन बाजूचे पडदे/ट्यूब एअरबॅग्ज आणि प्रत्येकी एक एअरबॅग आउटबोर्ड सीटिंग पोझिशन्ससाठी प्रदान केली जाईल.

(हे ही वाचा: मारुती सुझुकीची वाहने महागली, ४.३% टक्क्यांपर्यंत वाढल्या किमती)

नव्या निर्णयामुळे आव्हाने वाढणार?

कारमध्ये सहा एअरबॅग अनिवार्य केल्यास सेफ्टी रेटिंग सुधारेल पण कारच्या किमती वाढू शकतात. एंट्री-लेव्हल कारमध्ये, फ्रंट एअरबॅगची किंमत ५-१० हजार रुपयांपर्यंत जाते आणि जर साइड आणि कर्टन एअरबॅग्ज दिल्या तर किंमत वाढते. म्हणजे जर ६ एअरबॅग अनिवार्य असतील तर कार खरेदी करण्यासाठी ५० हजार रुपये जास्त खर्च करावे लागतील.

अतिरिक्त एअरबॅग प्रदान केल्यामुळे, कारच्या री-इंजिनिअरिंगमध्ये आणखी एक समस्या उद्भवू शकते कारण सध्याच्या कार सुरक्षिततेच्या या स्तरावर डिझाइन केलेल्या नाहीत. एकदा सहा एअरबॅग्ज आवश्यक झाल्यानंतर, त्यांचे कार्य प्रभावीपणे करण्यासाठी कारच्या बॉडीपासून ते आतील भागात बदल करावे लागतील. त्यामुळेही खर्च वाढण्याची शक्यता आहे.

(हे ही वाचा: लँड रोव्हरची सर्वात आलिशान SUV Range Rover भारतात लॉंच, किंमत वाचून व्हाल हैराण)

आता ‘ही’ आहे परिस्थिती

एअरबॅगच्या सद्यस्थितीबद्दल बोलायचे झाले तर, मारुती सुझुकी, रेनॉल्ट आणि निसानच्या कोणत्याही कारमध्ये दोनपेक्षा जास्त एअरबॅग नाहीत. ज्या कार कंपन्या त्यांच्या वाहनांमध्ये सहा एअरबॅग देत आहेत, त्यातील बहुतांश मॉडेल्स आणि व्हेरियंटची किंमत १० लाख रुपयांपेक्षा जास्त आहे. गेल्या वर्षी पीटीआय या वृत्तसंस्थेला दिलेल्या मुलाखतीत गडकरी म्हणाले होते की, लहान कार, ज्या बहुधा निम्न मध्यमवर्गीय लोक खरेदी करतात, त्यांनाही पुरेशा एअरबॅग्ज पुरवल्या पाहिजेत. त्यांनी आश्चर्य व्यक्त केले की ऑटो कंपन्या आठ एअरबॅग फक्त मोठ्या कारमध्ये देत आहेत, ज्या श्रीमंत लोक खरेदी करतात.

(हे ही वाचा: टाटा मोटर्सची पहिली CNG कार १९ जानेवारीला होणार लॉंच, फक्त पाच हजारामध्ये करा बुकिंग)

२०२० मध्ये ४७ हजारांहून अधिक रस्ते अपघातात झाले मृत्यू

एअरबॅग ही कारमधील एक प्रणाली आहे जी वाहनाचा डॅशबोर्ड आणि ड्रायव्हर (प्रवासी) दरम्यान अपघाताच्या वेळी गंभीर जखमांपासून संरक्षण करण्यासाठी ढाल म्हणून काम करते. केंद्रीय मंत्री नितीन गडकरी म्हणाले की, नवीन निर्णयामुळे कारच्या सर्व विभागातील प्रवाशांची सुरक्षितता सुनिश्चित होईल, मग त्या कितीही महाग असोत किंवा स्वस्त असोत. गडकरींनी ट्विट केले की केंद्रीय मंत्रालयाने १ जुलै २०१९ पासून ड्रायव्हर एअरबॅग्जची फिटिंग आणि १ जानेवारी २०२२ पासून पुढे बसलेल्या प्रवाशांसाठी एअरबॅग्ज अनिवार्य केल्या आहेत. ताज्या सरकारी आकडेवारीनुसार, २०२० मध्ये द्रुतगती मार्गांसह राष्ट्रीय महामार्गांवर १,१६,४९६ रस्ते अपघातांमध्ये ४७,९८४ लोकांचा मृत्यू झाला.

More Stories onऑटोAuto
मराठीतील सर्व लोकसत्ता विश्लेषण बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: 6 airbags mandatory in all cars find out what this announcement means and its impact on prices ttg
First published on: 16-01-2022 at 16:59 IST