जागतिकीकरणाच्या काळात सर्वच देश आणि सर्वच देशांमधल्या व्यवस्था परस्परावलंबी झाल्या आहेत. त्यामुळे जागतिक मंदीच्या काळाच सर्वच देशांना त्याचा फटका बसला. त्यामुळे इतर देशांमध्ये, विशेषत: आपल्या शेजारी देशांमध्ये घडणाऱ्या आर्थिक, सामाजिक, राजकीय घटनांचा आपल्यावर कमी-जास्त परिणाम होतच असतो. चीनच्या रीअल इस्टेट क्षेत्रामध्ये सध्या एक मोठं संकट उभं राहू लागलं असून त्यामुळे चीनच्या अर्थव्यवस्थेला मोठा फटका बसण्याची शक्यता आहेच, मात्र, त्यासोबतच जागितक अर्थव्यवस्थेला देखील त्याचा काहीसा फटका बसू शकतो, असं जाणकारांचं मत आहे.

काय घडतंय चीनमध्ये?

एव्हरग्रँड (Evergrand) ही चीनच्या रीअल इस्टेट क्षेत्रातली बलाढ्य कंपनी. या कंपनीचे संचालक झँग युआनलिन यांचा समावेश थेट फोर्ब्जच्या श्रीमंत लोकांच्या यादीत करण्यात आला होता. मात्र, याच झँग युआनलिन यांनी मंगळवारी बाजारात आपल्या संपत्तीपैकी १ बिलियन डॉलर्सपेक्षा जास्त नुकसान सहन केलं. त्यांची संपत्ती १.३ बिलियन डॉलर्सवरून २५०.७ मिलियन डॉलर्सपर्यंत खाली आली. कारण हाँगकाँगच्या बाजारपेठेत त्यांच्या शेअर्सच्या किंमतींमध्ये तब्बल ८७ टक्के घट झाली. आणि हे सगळं घडलं एव्हरग्रँडला २४६ बिलियन डॉलर्स इतकी कर्जाची रक्कम चुकवण्याच्या शेवटच्या तारखेच्या महिनाभर आधी!

India economy grew by 8.4 percent
Good News : भारताच्या अर्थव्यवस्थेची तिसऱ्या तिमाहीत ८.४ टक्क्यांनी वाढ
boat
पालघर: कृत्रिम भित्तिका समुद्रात सोडणारी बोट सातपाटीच्या खडकावर अडकली
quarantine ship in mauritus
मॉरिशसमध्ये अख्खे जहाजच केले क्वारंटाईन; ३,००० हून अधिक लोक अडकले समुद्रात; नेमके प्रकरण काय?
Index Sensex falls to 73 thousand level print eco news
नफावसुलीमुळे ‘सेन्सेक्स’ ३५२ अंश माघारी

एव्हरग्रँडची नेमकी समस्या काय?

एव्हरग्रँडवर सध्या सुमारे ३०० बिलियन डॉलर्सचं कर्ज आहे. पुढील महिन्यात म्हणजेच १८ ऑक्टोबरपर्यंत त्यांना हे कर्ज चुकवायचं आहे. पण त्यांच्या संपत्तीमध्ये दिवसेंदिवस घट होत असल्यामुळे त्यांचे गुंतवणूकदार हवालदिल झाले आहेत. इतके, की त्यांनी मंगळवारी मोठ्या प्रमाणावर एव्हरग्रँडच्या शेअर्सची घटत्या दरांमध्ये विक्री सुरू केली. हे प्रमाण इतकं वाढलं, की शेवटी एव्हरग्रँडला शेअर्स विक्री बंद करावी लागली. एव्हरग्रँडच्या कार्यालयांबाहेर गुंतवणूकदारांनी निषेध करायला सुरुवात केली आहे. त्यामुळे एव्हरग्रँड आता आर्थिक दिवाळखोरीच्या उंबरठ्यावर असल्याची जोरदार चर्चा आंतरराष्ट्रीय अर्थविश्लेषकांमध्ये रंगू लागली आहे.

चीनच्या अर्थव्यवस्थेला धोका काय?

चीनच्या राष्ट्रीय उत्पन्नामध्ये अर्थात जीडीपीमध्ये तिथल्या रीअल इस्टेट क्षेत्राचा सुमारे २५ टक्क्याहून जास्त हिस्सा आहे. त्याच रीअल इस्टेट क्षेत्रातली एव्हरग्रँड ही सर्वात बलाढ्य आणि सर्वाधिक हिस्सा असलेली कंपनी आहे. त्यामुळे एव्हरग्रँड दिवाळखोरीत निघाली, तर त्याचा प्रत्यक्ष फटका चीनच्या रीअल इस्टेट क्षेत्राला बसेल आणि अप्रत्यक्ष फटका चीनच्या राष्ट्रीय उत्पन्नाला बसेल.

जागतिक बाजारपेठेवर परिणाम?

चीनमधील बलाढ्य रीअल इस्टेट कंपनी एव्हरग्रँड दिवाळखोरीच्या उंबरठ्यावर असताना त्याचे पडसाद जागतिक बाजारपेठेत देखील दिसू लागले आहेत. आशियाई बाजारात शेअर्सची सातत्याने विक्री होत असताना आणि चीन सरकारच्या एव्हरग्रँडविषयीच्या सावध धोरणामुळे आशियाई बाजारपेठेत मोठ्या प्रमाणात भितीच्या वातावरणात शेअर्सची विक्री होऊ लागली आहे. त्यामुळे बाजारातील शेअर्सचे भाव मोठ्या प्रमाणावर खाली येऊ लागले आहेत. वॉल स्ट्रीटवर डो जोन्स इंडस्ट्रिय एव्हरेज ६०० अंकांनी खाली आला आहे, तर नॅसडॅक २ टक्क्यंनी घटला आहे. एस अँड पी ५०० मध्ये ७२ अंकांची घट देखील नोंद झाली आहे.

चीन सरकारचं धोरण काय?

दरम्यान, देशात २ लाख लोकांना रोजगार देणाऱ्या कंपनीमध्ये आर्थिक संकट ओढवलेलं असताना चीनचं सरकार मात्र अद्याप या गोंधळात पाऊल उचलण्यास तयार नाहीये. चीनी सरकारने जरी यात हस्तक्षेप केला, तरी फक्त अर्थव्यवस्थेवरचं आर्थिक अरिष्ट त्यांना टाळता येऊ शकेल, मात्र एव्हरग्रँडमुळे क्रेडिट व्यवस्थेला बसणारा फटका अर्थव्यवस्थेवर दूरगामी परिणाम करणारा ठरेल, असं या क्षेत्रातील जाणकार सांगतात.