भारताला ड्रोनविरोधी यंत्रणा उभारण्याची किती गरज आहे याची चर्चा रविवारी दहशतवाद्यांनी जम्मूच्या हवाई दल तळावर केलेल्या ड्रोन्स हल्ल्यानंतरच पुन्हा सुरु झाली आहे. भारताच्या आंतरराष्ट्रीय सीमेपासून १४ किलोमीटरवर असणाऱ्या भारतीय हवाई दलाच्या तळावर ड्रोन्सच्या मदतीने स्फोटके टाकून हा हल्ला करण्यात आला. त्यानंतर रातनुचाक—कालुचाक लष्करी भागात सोमवारी दोन ड्रोन्सवर लष्कराच्या जवानांनी सतर्कता दाखवत गोळीबार केला आणि ती परतवून लावली. रविवारी सकाळी झालेल्या हल्ल्यानंतर रविवारी रात्री ११.४५ वाजता पुन्हा एक ड्रोन हद्द ओलांडून आले होते. त्यानंतर दुसरे ड्रोन पहाटे २.४० वाजता आले होते, अशी माहिती अधिकाऱ्यांनी दिली. तेथे उपस्थित सैनिकांनी गोळीबार करताच ही दोन्ही ड्रोन माघारी गेली. रविवारापासून बुधवारपर्यंत सलग चार दिवसांपासून म्हणजेच २७ जून २०२१ पासून ३० जून २०२१ पर्यंत सलग चार दिवस या भागांमध्ये ड्रोन्सचा वावर दिसून आला आहे.

सुरक्षा अधिकाऱ्यांनी द इंडियन एक्सप्रेसला दिलेल्या माहितीनुसार, “सध्याच्या घडीला ड्रोन्सवर गोळीबार करुन ती पाडणे हा एकमेव पर्याय आहे. मात्र हे करताना स्निपर रायफल आणि तिची क्षमता असणाऱ्या कक्षेमध्ये ड्रोन असणं तसेच ते रात्रीच्या वेळी दिसणं यासारख्या कठीण गोष्टी सुरक्षा दलांना कराव्या लागतात.” पण हे ड्रोन्स यापूर्वी कधी आणि कुठे अशाप्रकारे हल्ल्यासाठी वापरण्यात आलेत?, ड्रोन हल्ल्यापासून वाचण्यासाठी काही यंत्रणा आहे का?, असेल तर ती कसं काम करते?, त्यासाठी खर्च किती येतो आणि काही भारतीय पर्याय उपलब्ध आहेत का यासंदर्भातील माहिती देणारा हा विशेष लेख…

wildlife lovers, Tigers, forest, cages,
‘वाघ जंगलात नको, पिंजऱ्यात हवेत का?’ वन्यजीवप्रेमींचा सवाल; प्रकरण काय? जाणून घ्या…
trees, Eastern Expressway,
पूर्व द्रुतगती मार्गावरील ५० झाडांवर विषप्रयोग, पालिका अधिकाऱ्यांच्या तक्रारीनंतर अज्ञात व्यक्तीविरोधात गुन्हा दाखल
Bombay high court, verdict, Compensation, acid attack victims
अ‍ॅसिड हल्ल्यातील जुन्या पीडितांना नवीन योजनेचा लाभ मिळणार
CRPF killed 1 terrorist in Pulwama
काश्मीरच्या पुलवामामध्ये मोठी चकमक, CRPF च्या जवानांकडून एका दहशतवाद्याला कंठस्नान

यापूर्वी कधी वापर झाला?

जम्मूमध्ये झालेला हल्ला हा भारतामध्ये ड्रोनचा वापर करुन दहशतवाद्यांनी केलेला पहिलाच हल्ला ठरला आहे. मागील काही काळामध्ये उच्च तंत्रज्ञान वापरुन करण्यात आलेला हा सर्वात आधुनिक पद्धतीचा हल्ला आहे. यापूर्वी २०१९ साली येमेनमधील हौथी बंडखोरांनी सौदी अरेबियामधील दोन महत्वाच्या तेल साठ्यांवर ड्रोनच्या मदतीने बॉम्ब हल्ले केले होते.

नक्की वाचा >> समजून घ्या : नाक, घशातून स्वॅब घेण्याऐवजी आता स्मार्टफोन स्क्रीनच्या मदतीने शोधणार करोना पॉझिटिव्ह रुग्ण

हल्ले करण्यासाठी ड्रोन्स हे मध्य पूर्व आशियामध्येही मोठ्याप्रमाणात वापरले जातात. खास करुन इराक आणि सिरियामध्ये ड्रोन्स युद्धासाठी वापरले जातात. अमेरिकेकडून या देशांमध्ये काही हत्या घडवून आणण्यासाठी डोन्स वापरले जातात. २०२० मध्ये इराणी जनरल कासीम सुलेमानीला इराकमध्ये अमेरिकेने घडवून आणलेल्या ड्रोन हल्ल्यात ठार करण्यात आलेलं. इराणमधील दुसऱ्या सर्वात शक्तीशाली व्यक्तीचा अमेरिकेने तंत्रज्ञानाच्या मदतीने खात्मा केलेला. २०१८ मध्ये व्हेनेझुएलाचे राष्ट्राध्यक्ष निकोलस मॅड्रो यांनाही आपल्यावर प्राणघातक हल्ला करण्यात आला होता. एका यंत्राच्या माध्यमातून स्फोटकांच्या मदतीने करण्यात आलेल्या या हल्ल्यातून आपण बचावल्याचा दावा त्यांनी केलेला.

ड्रोन हल्ल्यापासून वाचण्यासाठी काही यंत्रणा आहे का?

मागील काही वर्षांपासून अनेक खासगी कंपन्या ड्रोन हल्ल्यांपासून बचाव करण्याची सेवा पुरवतात. मानवविरहित हवाई वहाने म्हणजेच अनमॅन एरियल व्हेईक्स ज्याला युएव्हीजच्या (किंवा साध्या भाषेत ड्रोन असं म्हणतात त्या ड्रोन्सच्या) माध्यमातून होणारे हल्ले रोखणारी सुविधा काही खासगी कंपन्या पुरवातात. खास करुन इस्रायल, अमेरिका आणि चीनमधील काही कंपन्यांनी ड्रोनविरोधी तंत्रज्ञान तयार केलं आहे. सध्या उपलब्ध असणाऱ्या रडार, फ्रिक्वेन्सी जॅमर, ऑप्टिक आणि थर्मल सेन्सरसारख्या गोष्टींच्या मदतीने या ड्रोनविरोधी यंत्रणा तयार करण्यात आल्यात.

ड्रोनमुळे निर्माण होणारा धोका कोणत्या पद्धतीचा आहे त्यावर या यंत्रणा कशा काम करतात हे निश्चित केलं जातं. ड्रोन्स निकामी करायचे आहेत की पाडायचे आहे हे सुद्धा परिस्थितीनुसार ठरवता येतं. काही यंत्रणा केवळ आकाशाकडे लक्ष ठेव ठराविक हद्दीत ड्रोन्सने घुसखोरी केल्यावर त्याची माहिती देतं. तर काही यंत्रणा थेट ते ड्रोन्स पाडतात. या दुसऱ्या प्रकारच्या यंत्रणांमध्ये स्वयंचलित हत्यारांचाही समावेश असतो.

नक्की वाचा >> समजून घ्या : लस घेतल्यानंतर नक्की किती दिवसांनी करोना संसर्गाचा धोका कमी होतो

सध्या कोणत्या यंत्रणा अस्तित्वात आहेत?

इस्त्रायलमधील आर्यन डोम मिसाइल सिस्टीम यंत्रणा ही फ्रान्समधील राफेल या कंपनीने बनवली आहे. याच कंपनीने ड्रोन डोम नावाची यंत्रणाही तयार केली आहे. ज्याप्रमाणे आर्यन डोम क्षेपणास्त्र हेरुन त्यांना जमीनीवर पडण्याआधीच निकामी करतो त्याचप्रमाणे ड्रोन डोम यंत्रणा ड्रोन्सला हवेतच नष्ट करते. स्टॅटीस्टीक रडार्स, रेडिओ फ्रिक्वेन्सी सेन्सर्स आणि कॅमेराच्या मदतीने ३६० अंशांमधील माहिती ड्रोन डोमच्या माध्यमातून मिळवता येते. तसेच हे ड्रोन डोम नियंत्रणाकडून ड्रोनला पाठवण्यात येणारे संदेश आडवण्याचंही काम करु शकतो. त्यामुळे ड्रोन आपोआप निकामी होतं. या ड्रोन डोममधून हाय पॉवर लेझर बिन्सच्या सहाय्याने ड्रोन्स पाडले जातात. त्यामुळे निशाणा चुकण्याची शक्यता फारच कमी म्हणजेच अगदी नाही समान असते.

नक्की पाहा >> Video: पॅलेस्टाइनने डागली हजारो रॉकेट; मात्र इस्रायलच्या ‘आयर्न डोम’ने ती जमिनीवर पडण्याआधीच केली नष्ट

कंपनीच्या एका जाहिरातीमध्ये ही ड्रोन डोम यंत्रणा रहिवाशी भागांमध्येही वापरता येऊ शकते असा दावा करण्यात आला आहे. “जोपर्यंत लेझर बीमचा निशाणा हा लक्ष्यावर १०० टक्के लक्ष्यकेंद्रीत करुन वापरला जात नाही तोपर्यंत या लेझर बीम दिसत नाहीत,” असा दावा कंपनीने केलाय. इतर सर्व कंपन्यांप्रमाणेच राफेलने हे तंत्रज्ञान सर्व प्रकारच्या हवामानामध्ये आणि रात्रीही वापरता येण्यासाठी सक्षम असल्याचा दावा केलाय.

अमेरिकेतील फोर्टीम टेक्नोलॉजी सुद्धा असेच तंत्रज्ञान वापरते. या कंपनीने तयार केलेल्या यंत्रणेला ड्रोन हंटर असं नाव देण्यात आलं आहे. हल्ला करण्यासाठी आलेल्या ड्रोन्सला पकडण्यासाठी याचा वापर केला जातो. या ड्रोन हंटरमध्ये नेटगन नावाची यंत्रणा बसवण्यात आलीय. कोळ्याच्या जाळ्याप्रमाणे या बंदुकीमधून ड्रोनच्या दिशेने वेगाने जाळं फेकलं जातं आणि त्याच्या मदतीने ड्रोन पाडलं जातं.

नक्की वाचा >> समजून घ्या : करोना विषाणूची उत्पत्ती नक्की कुठे झाली?

याशिवाय ऑस्ट्रेलियातील ड्रोनशिल्ड या कंपनीची यंत्रणा ड्रोन गन्सची सुविधा देते. म्हणजेच कंपनीच्या ड्रोनगन टॅक्टीकल आणि ड्रोनगट एमकेथ्री या तंत्रज्ञानाच्या मदतीने हल्लेखोर ड्रोनच्या सिग्नलमध्ये अडथळा आणून त्यांच्या माध्यमातून नियंत्रला जाणारा व्हिडीओ फीड बंद पाडते तसेच या यंत्रणेच्या माध्यमातून सिग्नल ब्लॉकिंगच्या मदतीने ड्रोनला तातडीने जमीनीवर उतरण्यासही भाग पाडलं जातं.

खर्च किती?

ड्रोन्स शोधून ते निकामी करणाऱ्या कोणत्याही कंपन्यांनी त्यांच्या यंत्रणांची आणि सेवांची किंमत अधिकृत वेबसाईटवर दिलेली नाही. अनेकदा या कंपन्यांना दिल्या जाणाऱ्या ऑर्डर या कस्टमाइज असतात. गरजेप्रमाणे त्यामध्ये बदल करुन दिला जातो. किती ठिकाणांचं संरक्षण करायचं आहे, काय यंत्रणा लागेल यावर या सेवा काही शे डॉलर्सपासून हजारो डॉलर्सपर्यंतचे शुल्क आकारुन पुरवल्या जातात.

२०२० साली चीनमधील डीजेआय या ड्रोनसंदर्भात काम करणाऱ्या कंपनीने त्यांच्या प्रसिद्धी पत्रकामध्ये विरोधक कंपन्या किती रुपयांना सेवा पुरवतात यासंदर्भातील माहिती दिलेली. ड्रोन डिटेन्शन सिस्टीम ही तीन लाख ४० हजार अमेरिकन डॉलर्सची असून त्याच्या व्यवस्थापनासाठी वर्षाकाठी ४४ हजार अमेरिकन डॉलर्स खर्च केले जातात, असं डीजेआयने म्हटलं होतं.

नक्की वाचा >> Explained : २८.३९ लाख कोटी… करोना कालावधीमध्ये भारतीयांकडे नोटबंदीपेक्षाही अधिक कॅश, जाणून घ्या कारणं

भारतीय पर्याय आहे का?

भारतीय बनावटीचा काही पर्याय आहे का असा प्रश्न विचारल्यास त्याचं उत्तर हो असं आहे. डिफेन्स रिसर्च अॅण्ड डेव्हलपमेंट ऑर्गनायझेशन म्हणजेच डीआरडीओने ‘अँण्टी ड्रोन सिस्टीम’ तयार केली आहे. या वर्षापासून या सिस्टीमचा वापर केला जाणार असल्याचं मार्च माहिन्यामध्ये संरक्षण मंत्रालायाने जारी केलेल्या पत्रकात म्हटलं होतं. ही सिस्टीम नक्की कशी आहे याची माहिती देण्यात आलेली नसली तरी अमेरिकन राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी २०२० मध्ये भारताला भेट दिली होती तेव्हा या यंत्रणेचा वापर करण्यात आलेला. पीटीआयने दिलेल्या माहितीनुसार अहमबादमध्ये ट्र्म्प यांनी केलेल्या २२ किमीच्या रोड शोदरम्यान ही यंत्रणा वापरण्यात आलेली.

२०२० सालीच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी स्वांतंत्र्यदिनानिमित्त लाल किल्ल्यावरुन भाषण देताना ही यंत्रणा वापरण्यात आलेली. एएनआयने दिलेल्या वृत्तानुसार अँण्टी ड्रोन सिस्टीम ही तीन किमी परिघामधील ड्रोन्सचा शोध घेऊन ते निकामी करु शकते. तसेच लेझरच्या मदतीने एक ते अडीच किमी दूरवरील ड्रोनचा खात्मा करु शकतं. मार्च महिन्यामध्ये सीएनबीसी- टीव्ही १८ ने दिलेल्या वृत्तानुसार अदानी डिफेन्स सिस्टीम अॅण्ड टेक्नोलॉजी या कंपनीने भारत सरकारला ड्रोनचा शोध घेऊन खात्मा करणाऱ्या यंत्रणाचं प्रात्यक्षिक दाखवलेलं.

नक्की वाचा >> समजून घ्या : Long Covid म्हणजे काय आणि त्यावर कशी मात करता येते?

मोदींनी घेतली बैठक?

जम्मूतील हवाई दलाच्या तळावर करण्यात आलेल्या ड्रोन हल्ल्यांच्या पाश्र्वभूमीवर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मंगळवारी (२९ जून २०२१ रोजी) केंद्रीय गृहमंत्री अमित शहा, संरक्षणमंत्री राजनाथसिंह आणि राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजित दोभाल यांच्यासमवेत तातडीची बैठक घेतली.

देशाच्या सुरक्षेला निर्माण होणा-या धोक्याचा आणि भविष्यातील आव्हानांचा मुकाबला करण्यासाठी त्वरेने व्यापक धोरण तयार करण्यावर या बैठकीत चर्चा झाली, असे बैठकीतील घडामोडींची माहिती असलेल्यांनी येथे सांगितले. नव्याने उभ्या ठाकणा-या आव्हानांचा सामूहिक मुकाबला करण्यासाठी सरकार लवकरच एक धोरण आखणार आहे, विविध मंत्रालये आणि खात्यांमार्फत हे धोरण तयार करण्याचे काम सुरू आहे. त्यामध्ये संरक्षण मंत्रालय आणि तीनही दले महत्त्वाची भूमिका बजावणार आहेत. आता ड्रोनमार्फत हल्ले होत असल्याने या नव्या आव्हानांचा मुकाबला करण्यात ज्या त्रुटी आहेत त्या दूर करण्यावर प्रामुख्याने भर द्यावा आणि त्यासाठी लागणारी सामग्री खरेदी करावी, असे तीनही दलांना सांगण्यात आले आहे. मानवरहित हवाई साधनांद्वारे होणारे हल्ले थोपविण्यासाठी ड्रोनविरोधी यंत्रणा संपादित करण्यावर भर देण्याच्या सूचनाही तीनही दलांना देण्यात आल्या आहेत.