इंग्लंडमध्ये सुरु असणाऱ्या भारत विरुद्ध इंग्लंड कसोटी मालिकेमध्ये सोमवारी भारताने ऐतिहासिक विजय मिळवला. ५० वर्षांच्या प्रदीर्घ प्रतीक्षेनंतर सोमवारी ओव्हलवर भारतीय संघाने विजयी पताका फडकावला. भारतीय संघ सपाट खेळपट्टीवर चांगली गोलंदाजी करु शकणार नाही असा अंदाज व्यक्त केला जात होता. मात्र भारतीय गोलंदाजांनी हा अंदाज चुकीचा ठरवत इंग्लंडच्या संघाला ऑल आऊट करण्याचा पराक्रम केला. यामध्ये सर्वच भारतीय गोलंदाजांनी भन्नाट गोलंदाजी केली असली तरी जसप्रीत बुमराने लंच ब्रेकनंतर केलेल्या भन्नाट गोलंदाजीमुळे सामन्याचं पारडं भारताच्या बाजूने झुकण्यास सुरुवात झाली. पण बुमरासमोर जगभरातील फलंदाज फारसे प्रभावी का ठरत नाही याचं गुपित माजी गोलंदाज आणि चेन्नई सुपर किंग्स संघाचा गोलंदाज प्रशिक्षक असणाऱ्या लक्ष्मीपती बालाजीने द इंडियन एक्सप्रेसशी बोलताना सांगितलंय. ओव्हलच्या सामन्यात बुमराने टाकलेल्या दोन खास चेंडूंबद्दल बालाजीने सविस्तर माहिती दिली.

नक्की पाहा हे फोटो >> आईच्या भीतीपोटी लागलेल्या सवयीमुळे बुमरा आज झालाय ‘यॉर्कर किंग’

प्रश्न > जसप्रीत बुमराने ज्या पद्धतीने ऑली पोपला त्रिफळचित केलं त्याबद्दल तुमचं काय मत आहे?

उत्तर > ज्यांनी ज्यांनी सामना पाहिलाय त्यांना बुमराने केलेल्या गोलंदाजीमधील वैशिष्ट्य लक्षात आलंय की नाही हे मी ठामपणे सांगू शकत नाही. पण त्यांना ते कळालं असावं अशी माझी अपेक्षा आहे. बुमराने गोलंदाजीचा जो स्पेल टाकला त्यामध्ये तो सामान्यपद्धतीने टाकले जाणार रिव्हर्स स्वींग टाकत नव्हता. तसं असतं तर सर्वच चेंडूंना चांगली गती त्याने दिली असते. मात्र खेळपट्टीची स्थिती आणि इंग्लंडचा संघ ज्या पद्धतीने मैदानात जम बसवण्याचा प्रयत्न करत होता त्या काळात बुमराने उत्तम गोलंदाजी केली. त्याने अशा परिस्थितीमध्ये जे चेंडू टाकलेत ते पाहून मला फारच आश्चर्य वाटलं. बचावात्मक फलंदाजी करण्याच्या दृष्टीकोनातून मैदानात आलेल्या दोन वेगवेगळ्या फलंजादांना दोन उत्तम चेंडू टाकून एकाच पद्धतीने बाद करणं ही फारच सुंदर कामगिरी बुमराने केलीय. परिस्थिती आणि विकेट्सची गरज पाहता हा कामगिरीचं महत्व अधिक ठरलं. तुमच्याकडे कौशल्य असणं हा एक भाग आहे पण परिस्थितीचा अंदाज घेऊन ते योग्यवेळी वापरणं हा दुसरा फार महत्वाचा भाग आहे. नशिबाने बुमराकडे दोन्ही उत्तम आहे. त्याहूनही विशेष म्हणजे सामन्याच्या पाचव्या दिवशी आपला फिटनेस संभाळत अशी कामगिरी करणं हे फारच कौतुकास्पद आहे. मला या मालिकेतील त्याच्या पहिल्या सत्रातील गोलंदाजी आणि चौथ्या कसोटीमधील शेवटच्या सत्रातील गोलंदाजीमध्ये एनर्जी लेव्हलच्या दृष्टीने काहीच फरक जाणवला नाही.

नक्की पाहा >> एक विजय अन् पाच विक्रम… विराट ‘सर्वश्रेष्ठ’ कर्णधार; रिकी पाँण्टींगला मागे टाकत केला ‘हा’ विश्वविक्रम

प्रश्न > बुमरा टाकतो ते रिव्हर्स स्विंग होणारे चेंडू हे इतर गोलंदाजांपेक्षा वेगळे कसे ठरतात?

तो गोलंदाजी करताना चेंडू बॅक स्पिन करतो. चेंडू हातातून सोडताना तो जी पद्धत वापरतो त्यामुळे तो चेंडू विकेट वाचवून खेळणाऱ्या फलंदाजासाठी अधिक घातक ठरतो. तो समोर कुठे गोलंदाजी करायची आहे यावर लक्ष देऊन चेंडू आपल्या हातातून सोडतो. राउंड-आर्म रिव्हर्स स्विंग गोलंदाजी करणाऱ्यांचा चेंडू हवेमुळे फार अल्प प्रमाणात नियोजित मार्गापेक्षा भटकण्याची शक्यता असते. मात्र बुमराबद्दल असं होतं नाही. तो चेंडू पकडतानाच असा पकडतो की सुरुवातीला चेंडू स्विंग न होता काही पल्ला गेल्यानंतर तो स्विंग होतो आणि फलंदाज गोंधळतो. तो वेगाने आणि फूल लेंथ म्हणजेच अगदी पायात चेंडू टाकत असला तरी तो ज्या पद्धतीने चेंडू पकडतो आणि सोडतो त्यामुळे तो अधिक घातक होतो.

नक्की वाचा >> “लंच ब्रेकनंतर बुमरा माझ्याकडे आला आणि म्हणाला…”; सामन्याला कलाटणी देणाऱ्या त्या क्षणाबद्दल विराटचा खुलासा

प्रश्न > बॅक स्पिन म्हणजे नेमकं काय?

उत्तर > बुमराने चेंडू तो पकडतो तशापद्धतीने पकडला नाही तर चेंडू इतर गोलंदाजांप्रमाणे हवेकडून होणाऱ्या विरोधामुळे काही प्रमाणात मार्ग भटकतो. अगदी थोडक्यात सांगायचं तर सध्या बुमराचा चेंडू जेवढा प्रभावी असतो तो तेवढ्या प्रभावीपणे पडणार नाही. बुमराच्या चेंडू पकडण्याच्या विशिष्ट शैलीमुळे चेंडू हवेतून जाताना त्याचा हवेचा विरोध तुलनेने कमी प्रमाणात होतो आणि त्यामुळेच चेंडू फेकल्या फेकल्या लगेच स्विंग न होता काहीवेळाने स्विंग होते. या बॅक स्पिनमुळेच चेंडू हवेतून अधिक वेगाने जातो. त्यामुळेच चेंडू फार वेगाने फलंदाजांच्या पायांजवळून स्टम्पकडे जातो. अगदी उत्तम फलंदाज असला तरी चेंडूच्या मार्गात बॅट घालून तो ब्लॉक करण्याचा रिअॅक्शन टाइम हा फार कमी असतो. हवेमध्ये चेंडू डगमगत नसल्याने तो स्थिर राहतो आणि अगदी शेवटच्या क्षणी तो स्विंग होतो. हे सारं काही फार वेगाने होतं. अर्थात इतक्या वेगाने हे झाल्याने ओव्हलमध्ये बुमराकडून बोल्ड झालेल्या जॉनी बेअरस्टो आणि ऑली पोपला हे कळेपर्यंत त्यांची विकेट गेली असणार.

नक्की वाचा >> Ind vs Eng : सेहवागने पंतप्रधान मोदींचा फोटो पोस्ट करत इंग्लंडला केलं ट्रोल, म्हणाला…

प्रश्न > बुमरा फार स्टम्प टू स्टम्प गोलंदाजी करतो. त्यामुळे फलंदाजाला अधिक अडचणी येत असतील का?

उत्तर > होय. फलंदाज त्याच्यासमोर फलंदाजी करताना कोणत्या गोष्टी करत नाहीत यावरुनच त्याच्या रिव्हर्स स्विंग चेंडूचा अंदाज बांधता येईल. अनेक रिव्हर्स स्विंग टाकणाऱ्या गोलंदाजांसमोर खेळताना फलंदाज त्यांच्या पुढील पाय चेंडूच्या मार्गाच्या विपरित दिशेला काढून चेंडू टोलवतात. मात्र बुमराच्या बाबतीत हे शक्य होत नाही. कारण तो थेट स्टम्पमध्ये चेंडू टाकतो. बुमराचा बॅक स्पिन आणि चेंडू हातातून सोडण्याची पद्धत यामुळे चेंडू स्टम्पच्या सरळ रेषेत राहतो. अनेक गोलंदाज हे चेंडू पडल्यावर स्पीलच्या दिशेने जाईल अशी गोलंदाजी करतात. त्यामुळे फलंदाजाला चेंडू कुठे जाऊ शकतो याचा अंदाज बांधता येतो. पण बुमरा स्टम्प टू स्टम्प गोलंदाजी करत असल्याने तिच्याविरुद्ध खेळणाऱ्याला हा विचार करण्याचा स्कोपच नसतो. त्यांना चेंडू एक तर आडवावा लागतो किंवा टोलवण्याचा प्रयत्न करावा लागतो. मात्र बुमराचे चेंडू पडल्यानंतर उशीराने वळतात म्हणून अनेक फलंदाज गोंधलतात. बुमराप्रमाणेच रबाडा, जोफ्रा आर्चरही हा बॅक स्पिन फार छान वापरतात. मात्र बुमरा ज्यापद्धतीने हात पूर्णपणे उंचावून गोलंदाजी करतो त्यामुळे त्याला खेळणं फार कठीण जातं.