देशामध्ये करोनाच्या दुसऱ्या लाटेनं थैमान घातलेलं असतानाच ब्लॅक फंगसच्या संसर्गाचे प्रमाणही वाढता दिसत आहे. असं असतानाच आता लहान मुलांना एका वेगळ्याच आजाराचा संसर्ग होत असल्याची धक्कादायक माहिती समोर आलीय. करोना साथीसोबतच लहान मुलांमध्ये आता मल्टी ऑर्गन इफ्लेमेटरी सिंड्रोम इन चिड्रन (Multisystem inflammatory syndrome in children) म्हणजेच एमआयएस-सी नावाच्या आजाराचा प्रादुर्भाव होत असल्याचं दिसून आलं आहे. एमआयएस-सीच्या रुग्णांमध्ये सातत्याने वाढ होत आहे. गुजरामध्ये हा आजार झालेली आतापर्यंत १०० हून अधिक बालकं आढळून आली आहेत.

नक्की वाचा >> समजून घ्या : करोना विषाणूची उत्पत्ती नक्की कुठे झाली?

chaturang article, maintain relationship, good relations, avoid assuming, assuming in relationship, assume, stay away from toxic people, spreading bad thoughts in relationship, husband wife
जिंकावे नि जगावेही : नात्यांमधला नीरक्षीरविवेक!
china people punished for not paying debt
जीवनावश्यक वस्तू खरेदी करणेही कठीण; कर्ज फेडू न शकणाऱ्यांना चीन कशी शिक्षा करत आहे?
Bird Flu Outbreak Signs & Symptoms, Treatment
बर्ड फ्लूचा धोका वाढला! चिकन खाण्याआधी ‘ही’ काळजी घ्याच; डॉक्टरांनी सांगितली आजाराची लक्षणे व उपचार
risk of H5N1 bird flu outbreak Case Was Seen in Hens At Nagpur
कोविडहुन १०० पट जास्त भीषण विषाणू उड्या मारतोय! नागपुरातही आढळलं प्रकरण, तज्ज्ञांचं मत काय?

देशामध्ये या आजाराचं पहिलं प्रकरण एका नवजात बालकाच्या रुपाने समोर आलं. या बाळाचा जन्म झाल्यानंतर १२ तासांमध्येच त्याला हा आजार असल्याचं स्पष्ट झालं. या बाळाची आई गरोदर असतानाच तिला करोनाची लागण झाल्याची माहिती समोर आलीय. उपचारानंतर या महिलेने करोनावर मात केली मात्र त्याचा परिणाम गर्भातील बाळावर झाला. या बाळाला जन्मापासूनच एमआयएस-सीचा त्रास असल्याचं स्पष्ट झालं आहे. या लहान बाळाला श्वास घेण्यास अडचण येत आहे. उपचारासाठी या बाळाला अहमदाबाद येथील सरकारी रुग्णालयामध्ये दाखल करण्यात आलं आहे. यासंदर्भात डॉक्टर बेला शाह यांनी आज तकला दिलेल्या माहितीनुसार या बाळाची करोना अ‍ॅण्टीबॉडी चाचणी करण्यात आली असता जन्मापासूनच या बाळाच्या शरीरामध्ये अ‍ॅण्टीबॉडीज आढळून आल्या. आई गरोदर असतानाच तिला करोनाचा संसर्ग झाल्याने बाळामध्येही अ‍ॅण्टीबॉडीज निर्माण झाल्या. आता बाळा झालेला एमआयएस-सी हा लहान मुलांमध्ये करोनावर मात केल्यानंतर आढळून येणाऱ्या पोस्ट कोव्हिड आजारांपैकी आहे. सध्या या बाळाला कृत्रिम ऑक्सिजन देण्यात येत आहे. याशिवाय याच रुग्णालयामध्ये नऊ वर्षाच्या एका मुलालाही एमआयएस-सीच्या उपचारासाठी दाखल करण्यात आलं आहे.

नक्की वाचा >> Explained: संसर्गाची लाट म्हणजे काय? ती कशी येते? तिसरी लाट टाळता येणं शक्य आहे का?

आधी ताप आला बरा झाला पण…

नऊ वर्षांच्या या मुलाला मागील काही दिवसांपासून रुग्णालयात ऑक्सिजन सपोर्टवर ठेवण्यात आलं आहे. या मुलाला आधी खूप ताप आला होता. उपचारानंतर तो मुलगा बरा झाला मात्र त्यानंतर अचानक त्याला पुन्हा ताप आला. पुन्हा ताप आल्यानंतर डॉक्टरांनी त्याची तपासणी केली असता त्याला एमआयएस-सीचा प्रादुर्भाव झाल्याची माहिती समोर आली. माझ्या मुलाला यापूर्वी प्रकृतीसंदर्भात कोणताच त्रास नव्हता असं या मुलाच्या वडीलांनी सांगितलं आहे.

नक्की वाचा >> ‘साइटोकिन स्टोम’ म्हणजे काय?; तरुण रुग्णांचा मृत्यू होण्यासाठी हाच फॅक्टर कारणीभूत असतो का?

लहान मुलांचे डॉक्टर आणि अहमदाबाद सरकारी रुग्णालयातील सहाय्यक निरिक्षक असणाऱ्या डॉक्टर राकेश जोशींनी दिलेल्या माहितीनुसार, अनेकदा मुलांमध्ये हा आजार असला आणि त्यांना ताप आला तर साध्या औषधोपचाराने मुलं बरी होतात. मात्र रुग्णालयात दाखल करण्यात आलेल्या या मुलाची करोना चाचणी करण्यात आली असता ती सकारात्मक आलीय. म्हणजेच या मुलाच्या शरीरामध्ये आधीपासूनच अ‍ॅण्टीबॉडीज होत्या. त्यामुळे हे प्रकरणही पोस्ट कोव्हिडमध्येच मोडतं.

नक्की वाचा >> समजून घ्या : Long Covid म्हणजे काय आणि त्यावर कशी मात करता येते?

आतापर्यंत आढळून आली सात लक्षणं

डॉक्टरांनी दिलेल्या माहितीनुसार एमआयएस-सीची सात लक्षणं आतापर्यंत समोर आलीय. ती खालील प्रमाणे

> थंडी वाजणे
> ताप येणे
> शरीरावर काळसर डाग दिसणे
> डोळे लाल होणे
> पोटदुखी
> श्वास घेण्यास त्रास होणे
> चेहरा किंवा ओठ निळे पडणे

नक्की वाचा >> Explained : २८.३९ लाख कोटी… करोना कालावधीमध्ये भारतीयांकडे नोटबंदीपेक्षाही अधिक कॅश, जाणून घ्या कारणं

काय काळजी घ्यावी?

एमआयएस-सी असणाऱ्या मुलांना मल्टीपल ऑर्गन फेल्युअरचा धोका अधिक असतो. असं झाल्यास मुलांचा मृत्यूही होऊ शकतो. डॉक्टरांनी दिलेल्या सल्ल्यानुसार प्रामुख्याने हा आजार करोना होऊन गेलेल्या मुलांमध्ये दिसून येत असल्याने मुलांना करोनाचा संसर्ग होणार नाही याची विशेष खबरदारी घेतली पाहिजे. घरामध्ये सुद्धा करोनाचा संसर्ग झालेल्या, होम आयसोलेशनमध्ये असलेल्यांच्या संपर्कात मुलं येणार नाही याची काळजी पालकांनी घ्यायला हवी.