राज्यातील शाळांचे वर्ग सोमवारपासून सुरू करण्यास अखेर शासनाने परवानगी दिली आहे. त्यामुळे राज्यातील बहुतेक भागांतील शाळांत प्रत्यक्ष अध्यापन सुरू होण्याची शक्यता आहे. शिक्षक, अभ्यासकांनी केलेल्या मागणीला यश मिळाले आहे.

प्रत्यक्ष वर्गांचा खेळखंडोबा –

गेल्या वर्षी करोनाचा प्रादुर्भाव वाढू लागल्यावर मार्चमध्ये शाळा बंद करण्यात आल्या. त्यानंतरचे शैक्षणिक वर्ष (२०२०-२१) ऑनलाईनच सुरू झाले. वर्षभरात त्यानंतर शाळा सुरू करण्याचा निर्णय घेण्यात आला. मात्र, दुसऱ्या लाटेने पुन्हा ऑनलाईन शिक्षणाचा पर्याय अनेक भागांत अवलंबावा लागला. गेल्या वर्षीही दुसऱ्या सत्रात शाळा सुरू करण्याचा निर्णय घेण्यात आला. मात्र त्यावेळी मुंबई, पुण्यासह अनेक भागांत शाळा सुरू होऊ शकल्या नाहीत. हे शैक्षणिक वर्षही (२०२१-२२) ऑनलाईन सुरू झाले. मात्र त्यानंतर शासनाने जुलैमध्ये परवानगी दिल्यानंतर ग्रामीण भागांतील काही शाळा सुरू झाल्या. मुंबईतील शाळा त्यावेळीही सुरू करता आल्या नाहीत. त्यातही माध्यमिक आणि उच्च माध्यमिकचे वर्ग म्हणजे नववी ते बारावीचे वर्ग सुरू करण्यात आले. प्राथमिकचे वर्ग बंद सुरू करण्यासाठी परवानगी देण्यात आली नाही. त्यानंतर नोव्हेंबर २०२१ मध्ये राज्यातील शाळा टप्प्याटप्प्याने सुरू करण्याचा निर्णय घेण्यात आला. मात्र त्यानंतर लगेच दिवाळीची सुट्टी लागली.

Pradhan Mantri Awas Yojana,
पंतप्रधान आवास योजना, राज्याची वाटचाल संथगतीनेच! अद्याप दोन लाख घरांच्या कामाला प्रारंभ नाही
Summer vacation has been announced for schools in the state When will the school start
राज्यातील शाळांना उन्हाळी सुटी जाहीर… शाळा सुरू कधी होणार? शिक्षण विभागाने दिली माहिती…
Government decision not to increase read reckoner for elections
रेडीरेकनर वाढीला निवडणुकीची वेसण; घरांच्या किमती घटणार? रिअल इस्टेटमधील गुंतवणुकीवर काय परिणाम?
tariff hike electricity
राज्यांतील वीज ग्राहकांवर १५ ते ४० टक्के दरवाढ लागू; वीज तज्ञ प्रताप होगाडे यांची माहिती

दिवाळीनंतर तिसरी लाट…

दिवाळीनंतर माध्यमिकचे वर्ग सुरू झाले आणि डिसेंबरपासून पहिलीपासून सर्व वर्ग प्रत्यक्ष भरवण्यास परवानगी देण्यात आली. मात्र, त्यानंतर अनेक भागांतील रुग्णसंख्या वाढू लागली होती. मुंबईतून तिसऱ्या लाटेची सुरुवात झाली होती. झपाट्याने वाढलेली रुग्णसंख्या पाहून पुन्हा एकदा प्रत्यक्ष वर्गातील अध्यापन बंद करण्यात आले. गेल्या दोन वर्षातील उलाढालीनंतर आता अखेर पुन्हा एकदा शाळा सुरू करण्यास परवानगी देण्यात आली आहे. पूर्वप्राथमिक वर्गापासून बारावीपर्यंतचे वर्ग भरवण्यास परवानगी देण्यात आली आहे.

परवानगी मिळाली पण…

शासनाने शाळा सुरू करण्यास परवानगी दिली असली तरी त्याबाबतचा निर्णय घेण्याचे अधिकार स्थानिक प्रशासनाला देण्यात आले आहेत. सध्या मुंबईतील रुग्णसंख्या उतरणीला लागली असली तरी ग्रामीण भागांतील रुग्णसंख्या झपाट्याने वाढू लागली आहे. तीस जिल्ह्यांमधील नोंद झालेली रुग्णसंख्या दहा टक्क्यांपेक्षा अधिक आहे. अनेक जिल्ह्यांमध्ये चाचण्यांचे प्रमाण अद्यापही कमी आहेत. दवाखान्यांसमोर सर्दी-तापाच्या रुग्णांची अक्षरश रांग लागली आहे. शाळा सुरू करताना रुग्णसंख्या आणि परिसरातील स्थितीचा आढावा घेऊन त्यानुसार निर्णय घ्यावा अशा सूचना शासनाने जिल्हा प्रशासनाला दिल्या आहेत.

पालकांची संमती आवश्यक –

शाळांमध्ये प्रत्यक्ष वर्ग भरवून अध्यापन सुरू होणार असले तरी विद्यार्थ्यांना शाळेत उपस्थित राहणे बंधनकारक नसेल. उपस्थितीसाठी देण्यात येणारी पारितोषिके रद्द करण्यात आली आहेत. विद्याथ्यार्ंना शाळेत पाठवायचे की नाही याचा निर्णय सर्वस्वी पालकांवर सोपवण्यात आला आहे. पालकांचे संमतीपत्र आवश्यक आहे. शाळेत प्रत्यक्ष उपस्थित न राहणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी ऑनलाइन वर्ग सुरू ठेवण्याची सूचनाही देण्यात आली आहे. त्याचप्रमाणे एका दिवशी वर्गातील पन्नास टक्के विद्यार्थ्यांनाच प्रवेश द्यायचा आहे.

शाळांसमोर नियोजनाचे आव्हान –

दोन विद्यार्थ्यांमध्ये सहा फुटांचे अंतर राखणे, एकाचवेळी ऑनलाइन आणि प्रत्यक्ष वर्गातील शिक्षण सुरू ठेवणे, मनुष्यबळाचे नियोजन, शाळा निर्जंतुक ठेवणे, शाळेत वैद्यकीय मदत कक्ष सुरू करणे अशा अनेक जबाबदाऱ्या पेलून शाळांना नियोजन करावे लागणार आहे. या सर्वाचा खर्चही शाळांनाच पेलावा लागणार आहे. शासकीय शाळांना मिळणाऱ्या तुटपुंज्या निधीतून अतिरिक्त खर्च पेलावा लागणार आहे. यापूर्वी शाळा सुरू करण्याचा निर्णय घेतल्यानंतर संस्थांनी तयारी केली. अनेक महिने बंद असलेल्या शाळांच्या इमारती स्वच्छ केल्या. स्वच्छता, सुरक्षा यादृष्टीने अतिरिक्त कर्मचाऱ्यांच्या नियुक्त्याही केल्या होत्या. त्यासाठीचा खर्च पेलला. आता पुन्हा एकदा यासाठी शाळांना तरतूद करावी लागेल. शिक्षकांनीही ४८ तास आधी चाचणी करावी अशी सूचना देण्यात आली आहे. चाचणीनुसार करोनाची बाधा झाली नसल्याचा अहवाल असल्यास शिक्षकांना शाळेत प्रवेश देण्यात यईल. मात्र, या चाचण्याबाबतही शिक्षकांमध्ये संभ्रम आहे. त्याचप्रमाणे दोन्ही मात्रा घेतलेल्या शिक्षक, कर्मचाऱ्यांनाच शाळेत उपस्थित राहता येणार आहे.

विद्यार्थी करोनाबाधित झाल्यास काय करावे?

एखादा विद्यार्थी किंवा त्याच्या घरातील कुणी आजारी असल्यास विद्यार्थ्यांना शाळेत पाठवू नये अशा सूचना पालकांना देण्यात आल्या आहेत. मात्र तरीही एखादा विद्यार्थ्याला सर्दी, ताप, डोळे लाल होणे, अंगावर चट्टे किंवा ओरखडे, सांधे किंवा हातापायावर सूज, उलट्या-जुलाब असे कोणतेही लक्षणे दिसल्यास विद्यार्थ्याला डॉक्टरांकडे नेण्याची व्यवस्था करावी अशी सूचना शाळांना देण्यात आली आहे. विद्यार्थी करोना बाधित असल्यास त्याच्या मागील, पुढील आणि शेजारील तीन रांगांतील विद्यार्थ्यांना बाधित विद्यार्थ्याच्या निकट सहवासातील मानण्यात येईल. अशा विद्यार्थ्यांना दोन आठवडे गृह विलगीकरणात ठेवणे अपेक्षित आहे. या कालावधीत करोनाची कोणतीही लक्षणे आढळल्यास अशा विद्यार्थ्यांची तात्काळ तर लक्षणे न दिसल्यास पाच ते दहा दिवसांनी चाचणी करण्यात येईल.