अमेरिकेतल्या नेवाडा या ठिकाणी गँगस्टर डेव्हिसने प्रसिद्ध रॅपर टुपैक शकूरची हत्या केली. या प्रकरणात त्याला दोषी ठरवण्यात आलं आहे. १९९६ मध्ये लास वेगास या ठिकाणी प्रसिद्ध रॅपर टुपैक शापूरची गोळ्या झाडून हत्या करण्यात आल्याची घटना १९९६ मध्ये घडली होती. या प्रकरणी आरोपी केफे डी उर्फ डेव्हिसला आरोपी ठरवण्यात आलं आहे. मार्क डिगियाकोमो यांनी ही माहिती शुक्रवारी दिली आहे. प्रसिद्ध रॅपर टुपैक शकूर २५ वर्षांचा होता, त्याच वयात त्याची गोळ्या झाडून हत्या करण्यात आली. प्रसिद्ध रॅपरचं आयुष्य अवघ्या काही क्षणांत संपवललं गेलं. याप्रकरणी ६० वर्षीय डेव्हिसला आरोपी ठरवण्यात आलं आहे. २७ वर्षांच्या सुनावणीनंतर हा निर्णय देण्यात आला आहे. २७ वर्षांनी टुपैक शकूरला मिळाला न्याय रॅपर टुपैक शकूरला २७ वर्षांनी न्याय मिळाला आहे. डेव्हिसला शुक्रवारी त्याच्या घरातून अटक करण्यात आली आहे. कॅलिफोर्निय लव्हसारखी उत्तम गाणी सादर करणारा रॅपर म्हणजे शकूर होता. त्याची लास वेगासमध्ये गोळ्या झाडून हत्या करण्यात आली अशी माहिती सरकारी वकील मार्क डिगियाकोमो यांनी दिली आहे. कशी झाली होती रॅपर शकूर टुपैकची हत्या? सप्टेंबर १९९६ मध्ये रॅपर शकूर टुपैक त्याच्या ताफ्यातल्या कार्ससह त्याच्या कारमध्ये होता. त्याचवेळी त्याच्यावर हल्ला करण्यात आला. एका चौकात त्याची कार आणि त्याचा ताफा सिग्नलवर सुटण्याची वाट बघत होता. त्याचवेळी काही लोक समोरुन आले त्यांनी टुपैकवर गोळ्या झाडल्या. अनेक गोळ्या लागल्याने शकूर टुपैक जखमी झाला. त्याला तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आलं. मात्र त्यानंतर एक आठवड्यात उपचारांच्या दरम्यान त्याचा मृत्यू झाला. रॅपर शकूर टुपैकचं करिअर भरात होतं. वेगाने प्रगतीचा आलेख उंचावणाऱ्या रॅपर्समध्ये शकूर टुपैकची गणना होते. अत्यंत अल्पावधीत तो प्रसिद्ध झाला होता. अल्पावधीतच त्याचे साडेसात कोटी रेकॉर्ड्स विकले गेले आहेत. रॅपर शकूरचा जन्म न्यूयॉर्कमध्ये झाला होता. त्यानंतर त्याच्या लहानपणी तो कॅलिफोर्नियाला गेला होता.