अमेरिकेतल्या नेवाडा या ठिकाणी गँगस्टर डेव्हिसने प्रसिद्ध रॅपर टुपैक शकूरची हत्या केली. या प्रकरणात त्याला दोषी ठरवण्यात आलं आहे. १९९६ मध्ये लास वेगास या ठिकाणी प्रसिद्ध रॅपर टुपैक शापूरची गोळ्या झाडून हत्या करण्यात आल्याची घटना १९९६ मध्ये घडली होती. या प्रकरणी आरोपी केफे डी उर्फ डेव्हिसला आरोपी ठरवण्यात आलं आहे. मार्क डिगियाकोमो यांनी ही माहिती शुक्रवारी दिली आहे. प्रसिद्ध रॅपर टुपैक शकूर २५ वर्षांचा होता, त्याच वयात त्याची गोळ्या झाडून हत्या करण्यात आली. प्रसिद्ध रॅपरचं आयुष्य अवघ्या काही क्षणांत संपवललं गेलं. याप्रकरणी ६० वर्षीय डेव्हिसला आरोपी ठरवण्यात आलं आहे. २७ वर्षांच्या सुनावणीनंतर हा निर्णय देण्यात आला आहे.
२७ वर्षांनी टुपैक शकूरला मिळाला न्याय
रॅपर टुपैक शकूरला २७ वर्षांनी न्याय मिळाला आहे. डेव्हिसला शुक्रवारी त्याच्या घरातून अटक करण्यात आली आहे. कॅलिफोर्निय लव्हसारखी उत्तम गाणी सादर करणारा रॅपर म्हणजे शकूर होता. त्याची लास वेगासमध्ये गोळ्या झाडून हत्या करण्यात आली अशी माहिती सरकारी वकील मार्क डिगियाकोमो यांनी दिली आहे.
मराठीतील सर्व FYI बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Famous rapper tupac shakur death in 1996 man charged says prosecutor know what happened scj