scorecardresearch

मृत व्यक्तीच्या Fingerprint चा वापर करुन त्याचा स्मार्टफोन Unlock करणं शक्य असते का? जाणून घ्या..

एखाद्या व्यक्तीच्या निधनानंतर त्याचे फिंगरप्रिंट्स वापरुन त्याच्या फोनचे लॉक उघडता येते का?

fingerprint locks
फिंगरप्रिंट लॉक (फोटो सौजन्य – Freepik)

प्रत्येक मनुष्य हा यूनिक असतो हे तुम्ही अनेकदा ऐकले असेल. लोकांची वागणूक, त्यांच्या सवयी काही प्रमाणात सारख्या असू शकतात. पण दोन व्यक्ती कधीही पूर्णपणे समान असू शकत नाही. प्रत्येकाचे हातांचे ठसे देखील निरनिराळे असतात. हे ठसे कधीही समान नसतात. बोटांच्या ठसे हे व्यक्तीची ओळख तपासण्यासाठी वापरले जातात. पासपोर्ट, आधार कार्डसह अनेक अधिकृत कागदपत्रांमध्ये बोटांच्या ठश्यांची म्हणजेच फिंगरप्रिंट्सची माहिती नमूद केलेली असते. स्मार्टफोन लॉकसाठीही फिंगरप्रिंट्सचा वापर केला जातो.

व्यक्तीची ओळख आणि सुरक्षितता या गोष्टींसाठी बोटांच्या ठश्यांची मदत होते. पण जर एखाद्या व्यक्तीचा मृत्यू झाला तर त्याच्या फिंगरप्रिंट्सचा वापर करता येतो का? किंवा मृत्यूनंतर ओळख पटवून घेण्यासाठी बोटांच्या ठश्यांचा वापर करणे शक्य होते का? या प्रश्नाचे उत्तर आज देणार आहोत.

मृत्यू झाल्यानंतर शरीरातील विद्युत वहन (Electrical Conductance) थांबते. आपल्या शरीरातील पेशी हळूहळू काम करणं बंद करतात. एखाद्या व्यक्तीच्या निधनानंतर त्याच्या बोटांचे ठसे पूर्वीसारखे राहत नाहीत. मृत्यूनंतर शरीरामध्ये असंख्य बदल होत असतात. अशा स्थितीमध्ये बोटांचे ठसे मिळवणे खूप जास्त कठीण असते. काहीजणांच्या मते, मृत्यू झाल्यावर मानवांच्या बोटांचे ठसे बदलतात. हा बदल फॉरेन्सिक एक्सपर्ट शोधून काढू शकतात. मृत शरीर लॅबमध्ये नेऊन त्याचे परीक्षण केल्यावर फिंगरप्रिंट्समध्ये झालेला बदल ओळखता येतो.

आणखी वाचा – भारतात नोटा कुठे छापल्या जातात? कागद आणि इतर गोष्टी कुठून आणल्या जातात? वाचा सविस्तर

मृत व्यक्तीचे Fingerprint वापरुन त्याचा स्मार्टफोन Unlock करता येतो का?

निधनानंतर व्यक्तीच्या बोटांच्या ठश्यांचा वापर करुन त्याचा स्मार्टफोन अनलॉक करता येत नाही. यामागे शास्त्रीय कारण आहे. जेव्हा आपण फोनच्या फिंगरप्रिंट स्कॅनरवर बोट ठेवतो, त्यावेळी Electrical Conductance मुळे फोनचे सेंसरला बोटांच्या ठश्यांची माहिती मिळते. मृत्यू झाल्यावर विद्युत वहन पूर्णपणे थांबते. याच कारणामुळे फोन अनलॉ करता येत नाही.

मराठीतील सर्व FYI बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

First published on: 26-05-2023 at 13:22 IST

संबंधित बातम्या