What Is The Full Form of BRA: कितीही नकोशी वाटली तरी ब्रा ही प्रत्येक महिलेसाठी आवश्यक गोष्टींपैकी एक आहे. अलीकडे तर ब्राचे अनेक फॅन्सी प्रकार सुद्धा बाजारात आले आहेत. टोचणाऱ्या वायर्स व पट्ट्यांच्या जागी महिलांच्या कम्फर्टचा विचार करून बनवलेल्या वेगवेगळ्या ब्रा च्या स्टाईल बाजारात उपलब्ध आहेत. वर म्हटल्याप्रमाणे ब्रा ही कितीही गरजेची वस्तू असली तरी आजही अंतर्वस्त्रांविषयी बोलताना एक विचित्र संकोच अनेकांच्या मनात असतो यामुळेच काही वेळा आपल्यासाठी कोणती साईझ व कसा प्रकार योग्य आहे हे ही अनेक महिलांना माहित नसते. आज आपण याच आवश्यक पण तरीही दुर्लक्षित ब्रा बद्दलच्या काही न ऐकलेल्या गोष्टी जाणून घेणार आहोत. सुरुवात करूया, ब्रा चा फुल फॉर्म काय आहे, या प्रश्नापासून…

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

ब्रा चा फुल फॉर्म काय आहे? (What Is The Full Form of BRA)

ब्रा (BRA) हा सध्या प्रचलित शब्द असला तरी हा एक शॉर्ट फॉर्म आहे. १८९३ मध्ये न्यूयॉर्कमध्ये ईवनिंग हेराल्ड पेपरमध्ये पहिल्यांदा हा शब्दप्रयोग वापरण्यात आला होता. १९०४ पर्यंत हा शब्द चांगलाच प्रचलित झाला होता. १९०७ मध्ये Vogue मॅगझीनने पुन्हा एकदा ब्रा या शब्दाचा मूळ शब्द म्हणजेच Brassiere (brassière) हा आपल्या मॅगझीनमध्ये प्रिंट केला होता. काही वर्षांनी ऑक्सफोर्ड इंग्लिश डिक्शनरी मध्ये सुद्धा या शब्दाचा समावेश करण्यात आला.

सुरुवातीला ब्रा या शब्दाचा मूळ अर्थ हा लहान मुलांचे अंडरशर्ट (टीशर्ट- शर्टच्या आत घालण्याचे वस्त्र) असा होता. जो नंतर महिलांचे अंतर्वस्त्र अशा अर्थाने वापरण्यात आला होता. ब्रा या शब्दाचा फुल फॉर्म आहे ब्रेस्ट रेस्टिंग एरिआ. याशिवाय ब्रा च्या विविध प्रकारानुसार सुद्धा त्याची नावे पुढे बदलत गेली.

हे ही वाचा<< कार बाईकसाठी बेस्ट काय, नॉर्मल पेट्रोल की पॉवर पेट्रोल? फरक काय व तुम्ही कशामुळे पैसे वाचवू शकता

ब्रा ची कप साईझ कशी ठरवण्यात आली? (BRA Cup Size)

सुरुवातीला ब्रा ही एकाच मापाची बनवली जात होती जी स्ट्रॅप्स वापरून कमी जास्त घट्ट व सैल करता येऊ शकत होती. पण यामुळे महिलांना होणारा त्रास लक्षात घेता १९३० मध्ये S. H. Camp कंपनीने पहिल्यांदा ब्राच्या कप साईजचा अविष्कार केला आणि मग वेळेनुसार यामध्ये A ते D असे विविध प्रकार बाजारात आले. पण तुम्हाला हे जाणून धक्का बसेल की केवळ संकोच बाळगून आजही जगातील ८० टक्के महिला या चुकीच्या साईझच्या ब्रा परिधान करतात.

मराठीतील सर्व FYI बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Full form of bra who decided bra cup size for the first time a cup to d cup brassiere designs did you know svs
First published on: 09-06-2023 at 08:58 IST