Marathi Meanings of Common Words: आजच्या आधुनिक जीवनात रोजच्या बोलण्यात इंग्रजी शब्दांचा वापर मोठ्या प्रमाणात वाढला आहे. बस, मोबाईल, टेबल, बँक, सिग्नल अशा असंख्य शब्दांचा आपण सहजपणे वापर करतो. इतका सहज की, हे शब्द इंग्रजी आहेत की मराठी, याचा विचारही आपण करत नाही.

परंतु, वास्तव मात्र थोडं वेगळं आहे…

आपल्या दैनंदिन जीवनात वापरल्या जाणाऱ्या अनेक शब्दांना सुंदर मराठी पर्यायी शब्द आहेत. पण दुर्दैवानं हे पर्याय अनेक लोकांना माहीतच नसतात. त्यामुळे मराठी भाषा श्रीमंत असूनही आपण नकळत इंग्रजी शब्दांवर अवलंबून राहतो.

अशीच एक रोचक गोष्ट सध्या चर्चेत आली आहे. एका शाळेत शिक्षकांनी विद्यार्थ्यांना एक साधा प्रश्न विचारला, “आपण रोज वापरत असलेल्या वस्तूंना मराठीत काय म्हणतात?”

हा प्रश्न ऐकताच वर्गात शांतता पसरली. कारण- उत्तर जितकं सोपं वाटत होतं, तितकंच ते विचार करायला लावणारं होतं.

शिक्षकांनी फळ्यावर काही शब्द लिहिले बस, टेबल, बँक, ग्लास, पँट, कॅलक्युलेटर, चिकन, मटण, मोबाईल, सिग्नल व पोलीस.

विद्यार्थ्यांना वाटलं, “हे तर रोज वापरतो… यामध्ये काय विशेष?”

पण शिक्षकांनी सांगितलं, “या प्रत्येक शब्दाला मराठीमध्ये सुंदर पर्याय आहे. आपण फक्त ते विसरून गेलो आहोत.”

आणि इथूनच सुरू झाला एक छोटासा भाषिक प्रवास…

हळूहळू वर्गात चर्चा सुरू झाली. काही विद्यार्थ्यांनी अंदाज केले, काहींनी गोंधळ केला, तर काही जण विचारात पडले की, आपण इतके शब्द रोज वापरतो; पण त्यांचे मराठी अर्थ खरोखरच आपल्याला माहीत नाहीत.

गावात ही बातमी पसरताच उत्सुकता वाढली. लोक एकमेकांना विचारू लागले “खरंच या शब्दांचे मराठी पर्याय काय असतील?”

बस स्टँड, चहा टपरीवर आणि दुकानांमध्ये फक्त एकच चर्चा सुरू झाली होती.

आणि अखेर शिक्षकांनी सांगितलं की, “हे फक्त शब्द नाहीत… ही आपली भाषा आहे. आणि आपली भाषा समजून घेणं म्हणजे स्वतःची ओळख समजून घेणं.”

सगळ्यांना आता शेवटची उत्सुकता होती फळ्यावर लिहिलेल्या शब्दांना मराठी प्रतिशब्द कोणते आहेत?

आणि जेव्हा उत्तर समोर आलं, तेव्हा अनेकांना आश्चर्य वाटलं की, आपण हे शब्द रोज वापरत होतो; पण कधी त्याबाबत विचारच केला नाही…

इंग्रजी शब्दांचे मराठी अर्थ :

बस – जनिका
टेबल -मेज
बँक -अधिकोष
ग्लास- पेला
पँट- विजार
कॅलक्युलेटर – गणकयंत्र
चिकन- कोंबडीचे मांस
मटण – बकरीचे मांस किंवा शेळीचे मांस
मोबाईल – भ्रमणध्वनी
झेरॉक्स – छायाप्रत किंवा प्रतिमुद्रा
पोलीस – आरक्षक