DMart store : डी मार्ट हे बहुतेक सर्वांच्याच परिचयाचं आहे. घरातील किराणा सामान आणि गरजेच्या वस्तू भरण्यासाठी सर्वात स्वस्त सुपरमार्केट म्हणजे डी मार्ट आहे. पण डी मार्टला इतर सुपरमार्केटच्या तुलनेत इतकं स्वस्त सामान विकणं कसं परवडतं? त्यांना त्यातून नफा कसा मिळतो, याबाबतचा प्रश्न तुम्हालाही पडला असलेच, याच प्रश्नांचं उत्तर आम्ही तुम्हाला सांगणार आहोत.

डी मार्टचे मालक कोण?

डी मार्टचे मालक राधाकिशन दमाणी आहेत. ते एक भारतीय व्यापारी आहेत. राधाकिशन दमाणींचा जन्म १६ ऑगस्ट १९५४ रोजी राजस्थानमधील बिकानेर येथे झाला होता, पण ते मुंबईत वाढले. त्यांनी मुंबई विद्यापीठातून शिक्षण घेतलं होतं.

multi asset portfolio, investment, shares, stocks, mutual fund, commodity market, gold, expensive paintings, crypto currency, finance article
मार्ग सुबत्तेचा : मल्टिअ‍ॅसेट पोर्टफोलिओ – काय, का आणि कसा?
NASA captures mysterious ‘surfboard-shaped’ object orbiting moon
चंद्राभोवती घिरट्या घालतेय UFO? नासाने शेअर केला रहस्यमयी फोटो, नक्की काय आहे प्रकरण?
civil service servants vehicle with a board coming to wrong side
चक्क अधिकाऱ्याच्या गाडीने मोडला वाहतूक नियम! भर रस्त्यावर थांबवताच पेटला वाद, पाहा VIDEO
Loksatta anvayarth The security law was approved by the Beijing based government in Hong Kong
अन्वयार्थ: हाँगकाँगची गळचेपी..कायदेशीर मार्गानी!

डी मार्टची स्थापना कधी झाली?

डी मार्ट ही एक भारतीय कंपनी असून त्याचे मुख्यालय मुंबईमध्ये आहे. राधाकिशन दमानी यांनी डी मार्टची स्थापना २००२ मध्ये केली आणि या कंपनीची पहिली शाखा हिरानंदानी गार्डन, पवई इथं उघडण्यात आली होती. त्यानंतर या कंपनीने हळूहळू अनेक रिटेल स्टोअर सुरू केले. सध्या देशभरात २३० पेक्षा जास्त डी मार्ट स्टोअर्स आहेत.

आणखी वाचा – ब्रॅण्डनामा : डी’मार्ट

स्वस्त सामान विकण्यामागची महत्त्वाची कारणं

डी मार्ट आउटलेटचा परिसर

डी मार्टचे प्रत्येक आउटलेट असलेले ठिकाण अतिशय विचारपूर्वक निवडलेले असते. रहिवासी परिसर आणि दाट वर्दळीच्या ठिकाणी हे आउटलेट उघडले जाते. डी मार्टमध्ये रोज किमान १००० लोक खरेदीसाठी येतात. सणासुदीच्या काळात ही संख्या १०-१५ पटीने वाढते. डीमार्ट शॉपिंग मॉल्समध्ये त्यांचे आउटलेट चालवत नाही. त्यांचा ‘स्टोअर ओनरशिप मॉडेल’वर विश्वास आहे. ते स्वतः जमीन खरेदी करून स्टोअर उघडतात. त्यामुळे त्यांचं भाडं वाचतं. जे स्टोअर त्यांच्या मालकीचे नाहीत, ते त्यांनी किमान १५-२० वर्षांसाठी लीजवर घेतलेले असते.

इतर उत्पादनांच्या कंपन्यांकडून घेतात पैसे

डी मार्टमध्ये आपल्याला विविध कंपन्यांची उत्पादनं खरेदी करतात. तसेच इथे आपल्याला डी मार्ट मिनिमॅक्स, डी मार्ट प्रेमिया, डी होम्स, डच हार्बर या त्यांच्या स्वतःच्या ब्रँडची उत्पादनंही मिळतात. या उत्पादनांच्या किमती इतर ब्रँड्सच्या तुलनेने कमी असतात. तसेच डी मार्ट स्लॉटिंग फी देखील आकारते. जेव्हा एखाद्या कंपनीला त्यांचे उत्पादन डी मार्टमध्ये विकायचे असते, तेव्हा त्यांना स्लॉटिंग फी भरावी लागते. यातून डी मार्टला पैसे मिळतात. याशिवाय डी मार्टने अनेक स्थानिक ब्रँडशी करार केला आहे, ज्यामुळे काही वस्तूंच्या किंमती इतर ब्रँड्सच्या तुलनेने कमी होतात.

आणखी वाचा – व्हायरलची साथ : डी कंपनी

डी मार्टचे कमी किमतीचे धोरण

डी मार्ट “Everyday low cost – Everyday low price” मॉडेलचे अनुसरण करते. त्यांच्या या धोरणामुळे उत्पादनांच्या किमती कमी असतात, पण त्यांची विक्री खूप जास्त होते. विक्री जास्त असल्यामुळे डी मार्टच्या उत्पादनांची मागणी जास्त असते, त्यामुळे इतर कंपन्यांच्या तुलनेत किमती कमी ठेवून ते जास्त विक्रीचं लक्ष्य गाठून नफा मिळवतात.

पुरवठादारांशी किमतीवरून वाटाघाटी

डीमार्टने व्यवसायातील मध्यस्थ काढून टाकले आहेत, त्यामुळे त्यांचा व्यवसाय ग्राहकांच्या मॉडेलवर अवलंबून असतो. डीमार्टमध्ये अनेक मोठी आउटलेट्स आहेत. तसेच डी मार्ट इतर कंपन्यांची उत्पादनं बल्कमध्ये खरेदी करते, त्यामुळे ते किमतीवरून कंपन्यांशी, पुरवठादारांशी वाटाघाटी करतात. त्याचाही फायदा त्यांना होतो आणि वस्तू कमी किमतीत मिळतात.

खर्च कमी

डी मार्टने आपला ऑपरेटिंग खर्च खूपच कमी ठेवला आहे. त्‍यांचे ८०-८५ टक्के आऊटलेट्स स्वतःच्या मालकीची आहेत. तसेच ते जाहिरात, मार्केटिंग आणि इंटिरियर्सवर जास्त खर्च करत नाही. पुरवठादारांना वेळेवर पेमेंट केल्यामुळे त्यांना अधिक क्रेडिट आणि सूट मिळते. डीमार्टमध्ये मनुष्यबळ कमी आहे, त्यामुळे अतिरिक्त खर्च टाळण्यास मदत होते.