History Of Clock: माणसाला आपली वेळ ठरवता येत नाही असे म्हणतात पण तुम्ही जर वेळ बघून वेळेनुसार व वेळेत काम पूर्ण केलं तर वेळ पालटण्याची शक्तीही आपल्यातच असते, हो ना? आता वेळ बघायची म्हणजे कुठे, अलीकडे आपण वेळेसाठी मोबाईल, डिजिटल वॉच, फॅन्सी घड्याळ वापरतो पण तुम्हाला कधी हा प्रश्न पडला आहे का की जेव्हा घड्याळच अस्तित्वात नव्हतं तेव्हा लोक वेळ कशी ओळखायचे? आपल्या खाण्या-पिण्याच्या, कामाच्या, अगदी शौचाला जाण्याच्या वेळा सुद्धा घड्याळावर अवलंबून असतात पण मग या घड्याळाशिवाय वेळेचं गणित लोकं कशी जुळवत असतील? आज आपण या लेखाच्या माध्यमातून याबाबत माहिती करून घेणार आहोत.

घड्याळाचा शोध कधी लागला?

प्राप्त माहितीनुसार, पोप सिल्व्हेस्टरने इसवी सन ९६६ मध्ये घड्याळाचा शोध लावला. १२५० मध्ये युरोपीय देशात विकसित घड्याळे बनवली जाऊ लागली. इंग्लंडमधील वेस्टमिंस्टर येथे एक वॉचहाऊस बनवण्यात आले होते. भारतातही अगदी आपल्या मुंबईतही अशी अनेक वॉच हाऊस म्हणजेच बिल्डिंग व त्याला वरच्या बाजूला मोठं घड्याला असणारी वास्तू पाहायला मिळते.

upsc student surprised father with upsc 2023 result in his office then what happened you will get cry watch viral video
या आनंदाला तोड नाही! UPSC निकालानंतर वडिलांच्या ऑफिसमध्ये पोहोचला लेक अन्…; VIDEO पाहून पाणावतील तुमचेही डोळे
boys did dangerous stunt with car to make reels video went viral on social media
रिल्ससाठी जीवघेणा स्टंट! मित्राला प्लास्टिकच्या रॅपरमध्ये गुंडाळले अन् चालत्या कारच्या बाहेर…
How To Make Juice Premix Recipes To Save Money
१ वर्ष टिकणारी फळांच्या सरबताची पावडर बनवून संत्री, कलिंगडाचा आस्वाद हवा तेव्हा घ्या; वेळ, पैसे वाचवणारा Video पाहा
what is the right way to wash and store grapes
द्राक्षांवरील जंतू कसे घालवायचे? ‘व्हिनेगर अन् सोडा’ खरंच ठरतो उपयोगी? जाणून घ्या तज्ज्ञांचे मत…

घड्याळाच्या आधी वेळ कशी ओळखली जात होती?

घड्याळाचा शोध लागण्यापूर्वी लोक सूर्याच्या किरणांवरून वेळेचा अंदाज लावत होते. म्हणूनच आजही आपल्याकडे उजाडलं की झोपेतून उठण्याची वेळ, सूर्य डोक्यावर आला की मध्यान्ह, सूर्य पश्चिमेकडू वळू लागला की संध्याकाळ व सूर्यास्तानंतर पुन्हा झोपण्याची वेळ असं गणित फॉलो केलं जातं. यासंदर्भातच जुन्या म्हणी सुद्धा आहेत. सूर्यानुसार वेळ बघणं हे कमाल वाटत असलं तरी जेव्हा ढगांच्या आड सूर्य लपला जात असे तेव्हा मात्र चांगलीच पंचाईत व्हायची. यावरून ढगाळ वातावरणात थोडा सुस्तावलेपणा व वेळेचा थांगपत्ता न लागणे ही परिस्थिती तयार झाली असावी.

हे ही वाचा<< विमानात ‘ही’ सीट असते सर्वात सुरक्षित? ३५ वर्षातील दुर्घटनांच्या रेकॉर्डमधून समोर आली मोठी माहिती

घड्याळ मनगटात घालण्याची सुरुवात कधी झाली?

दरम्यान, घड्याळाच्या प्रकारांमध्ये विशेष प्रगती होत गेली. सध्या वापरले जाणारे आधुनिक स्प्रिंग घड्याळ हे जर्मनीमध्ये राहणाऱ्या पीटर हेलिन यांनी बनवलेले होते. १५७७ मध्ये स्वित्झर्लंड येथे राहणाऱ्या जॉस बर्गी यांनी घड्याळातील मिनिट काट्याचा शोध लावला होता. आपण आज ज्याप्रकारे मनगटात घड्याळ घालतो ते सुद्धा ब्लेज पास्कल नामक फ्रान्सच्या नागरिकाने सुरु केलेली पद्धत आहे कारण त्यापूर्वी पॉकेट वॉच वापरले जात होते. ब्लेज पास्कलने पुढे कॅल्क्युलेटरचा शोध लावला होता.