PAN Card for Minor Application Process: पर्मनंट अकाउंट नंबर (PAN) हा प्रत्येक कर भरणाऱ्या व्यक्तीला जारी करण्यात आलेला १० अंकी युनिक आयडेंटिफिकेशन अल्फान्यूमरिक नंबर आहे. कर भरणाऱ्या प्रत्येक व्यक्ती, संस्था, व्यवसाय यांच्याकडे पॅन कार्ड असणे आवश्यक आहे.

लहान मुलांचेदेखील पॅन कार्ड बनवता येते हे अनेकांना माहित नसते. भारतात आयटीआर भरण्यासाठी वयाची मर्यादा नाही. त्यामुळे लहान मुलांचे पॅन कार्ड बनवण्यासाठी अर्ज करता येतो. यासाठी काय प्रक्रिया आहे आणि यासाठी कोणती कागदपत्रं आवश्यक असतात, जाणून घ्या.

Fatty Liver Can Happen Without Drinking Alcohol Check These Changes Signs
मद्यपान न करताही होतो फॅटी लिव्हर; भूक, लघवीचा रंग व त्वचेसह ‘या’ ८ बदलांमधून शरीर देतं संकेत, उपचार काय?
bottle gourd halwa for diabetics and heart patients
मधुमेही अन् हृदयरोग्यांसाठी ‘दुधी हलवा’ ठरतो फायदेशीर? डॉक्टर्स नेमके काय सांगतात जाणून घ्या…
Addicted to junk food and can’t seem to stop Here’s how to overcome it
तुम्हाला जंक फूड खाण्याचे व्यसन आहे का? तज्ज्ञांकडून जाणून घ्या कशी सोडावी ही वाईट सवय
What should parents do to reduce childrens mobile usage
Health Special : मुलांचा मोबाइल वापर कमी करण्यासाठी आईवडिलांनी काय करावं?

आणखी वाचा: ‘यात्रीगण कृपया ध्यान दे…’ रेल्वे स्थानकांवर ऐकू येणाऱ्या आवाजामागील चेहरा; जाणून घ्या कशी झाली निवड

लहान मुलांना पॅन कार्डची गरज कधी भासते?

  • जेव्हा तुम्ही मुलांच्या नावावर गुंतवणूक करता.
  • तुमच्या गुंतवणूकीचे मुलांना नॉमिनी बनवता.
  • मुलांचे बँक खाते उघडायचे असल्यास.
  • जेव्हा लहान मुलं पैसे कमावत असतात.

लहान मुलांच्या पॅन कार्डसाठी कोण अर्ज करू शकते?
लहान मुलांच्या पॅन कार्डसाठी त्यांचे आई-वडील किंवा त्यांचे कायदेशीर पालक अर्ज करू शकतात. मुलांच्या वतीने आयटीआर फाईल करणे पालकांची जबाबदारी आहे.

लहान मुलांचे पॅन कार्ड बनवले तरी, त्यावर फोटो आणि सही नसल्याने ते आयडी प्रूफ म्हणून वापरता येणार नाही. जेव्हा तो मुलगा किंवा मुलगी १८ वर्षांचा होईल, तेव्हा हे पॅन कार्ड अपडेट करणे आवश्यक आहे.

आणखी वाचा: मोबाईलचा कॅमेरा डाव्या बाजूला का असतो? जाणून घ्या यामागचे कारण

लहान मुलांच्या पॅन कार्डसाठी अर्ज कसा करायचा?

  • एनएसडीएलच्या अधिकृत वेबसाईटवर जा.
  • फॉर्म फील 49A या पर्यायावर जाऊन त्यात दिलेल्या सर्व सूचना वाचा.
  • मुलाचे वयाचे प्रमाणपत्र, इतर महत्वाची कागदपत्र, पालकांचा फोटो, पालकांची सही अशी कागदपत्रं सबमिट करा.
  • त्यानंतर १०७ रुपयांच्या पेमेंटसह प्रक्रिया पुर्ण करून सबमिटवर क्लिक करा. ही प्रक्रिया पुर्ण झाली का हे जाणून घेण्यासाठी तुम्हाला एक नंबर पाठवला जाईल.
  • व्हेरीफीकेशन पुर्ण झाल्यानंतर १५ दिवसांनी पॅन कार्ड दिलेल्या पत्त्यावर पाठवले जाईल.

आणखी वाचा: हिवाळ्यात इलेक्ट्रिक गाड्यांची रेंज कमी का होते? जाणून घ्या यामागचे कारण

आवश्यक कागदपत्र

  • जन्माचे प्रमाणपत्र
  • पत्त्याचा पुरावा (पालकांची ओळख व्हावी म्हणून)
  • अर्ज करणाऱ्या व्यक्तीच्या पत्त्याचा पुरावा देखील आवश्यक आहे.
  • ओळखीच्या पुराव्यासाठी पालक आधार कार्ड, रेशन कार्ड, पासपोर्ट, ड्रायव्हिंग लायसन्स यापैकी कोणतेही एक कागदपत्र सादर करू शकतात.