How to Find Your Computer’s IP Address : प्रत्येक संगणकाचा स्वत:चा एक पत्ता असतो, ज्याला संगणकी भाषेत आयपी अ‍ॅड्रेस म्हणतात. जे लोक सतत लॅपटॉप, संगणकावर काम करतात त्यांनी बऱ्याचदा आयपी अ‍ॅड्रेसविषयी ऐकले असेल, पण अनेकांना हा आयपी अ‍ॅड्रेस शोधायचा कसा, या विषयी माहिती नसते. आज आपण त्याविषयी जाणून घेणार आहोत, पण त्यापूर्वी आयपी अ‍ॅड्रेस म्हणजे काय? आणि त्याचे महत्त्व काय? हे जाणून घेऊ या.

आयपी अ‍ॅड्रेस म्हणजे काय?

आयपी अ‍ॅड्रेस (IP Address) म्हणजेच इंटरनेट प्रोटोकॉल अ‍ॅड्रेस (Internet Protol Address). आयपी अ‍ॅड्रेस हे अंकीय लेबल आहे. जेव्हा एखादा संगणक नेटवर्कशी जोडलेला असतो, त्याला आयपी अ‍ॅड्रेस असे म्हणतात.

आयपी अ‍ॅड्रेस का महत्त्वाचा?

आयपी अ‍ॅड्रेस इंटरनेटवर आपला डिव्हाइस शोधण्यास मदत करतो. हा आयपी अ‍ॅड्रेस आपल्या डिव्हाइस आणि इंटरनेटदरम्यान डेटा पुरविण्याचे काम करतो. जेव्हा आपण एखादी वेबसाइट उघडतो तेव्हा आपला संगणक वेबसाइटच्या सर्व्हरला स्वत:चा आयपी अ‍ॅड्रेस सांगतो आणि त्यानंतर आपल्याला वेबसाइटवरील माहिती दिसून येते. याशिवाय आयपी अ‍ॅड्रेसच्या मदतीने नेटवर्कमधील उपकरणे एकमेकांशी जोडली जातात.

हेही वाचा : What is a Pager: पेजर म्हणजे काय? लेबनानमध्ये पेजरचा स्फोट कसा काय झाला?

आयपी अ‍ॅड्रेस कसा शोधावा?

१. आयपी अ‍ॅड्रेस शोधण्यापूर्वी तुमचा संगणक नीट चालतोय का हे नीट तपासा.

२. विंडोजमध्ये ‘Command Prompt’ आणि मॅकमध्ये “Terminal” पर्याय उघडा.

विंडोजसाठी –

कीबोर्डवर विंडोजचे बटण दाबा,
त्यानंतर “cmd” टाइप करा आणि एंटर बटण दाबा,
त्यानंतर Command Prompt पर्याय दिसून येईल.

मॅकसाठी

संगणकाच्या उजव्या बाजूला वरती ‘magnifying glass icon’ (Spotlight Search) चिन्ह दिसेल, त्यावर क्लिक करा आणि “Terminal” टाइप करा आणि त्यानंतर एंटर दाबा, त्यानंतर Terminal app उघडा.

३. तुमचा आयपी अ‍ॅड्रेस शोधा

जेव्हा तुमच्या विंडोजमध्ये Command Prompt किंवा मॅकमध्ये Terminal पर्याय दिसतो, त्यानंतर खालील गोष्टी फॉलो करा.

हेही वाचा : Saleema Imtiaz : आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये अंपायर बनणारी पहिली पाकिस्तानी महिला कोण आहे? जाणून घ्या

विंडोजसाठी –

Command Prompt मध्ये “ipconfig” टाइप करा आणि एंटर दाबा.
त्यानंतर तुम्ही कोणता आयपी अ‍ॅड्रेस वापरता, म्हणजेच “IPv4 Address” किंवा “IPv6 Address” नीट बघा. तुम्हाला तुमचा आयपी अ‍ॅड्रेस दिसेल.

मॅकसाठी

Terminal पर्याय उघडल्यानंतर “ifconfig” टाइप करा आणि एंटर करा.
तुमच्या नेटवर्क कनेक्शनशी संबंधित सेक्शन शोधा.
त्यात तुम्हाला “inet” हा शब्द दिसून येईल, त्याच्यापुढे तुम्हाला आकडे दिसून येतील. हाच तुमच्या संगणकाचा आयपी अ‍ॅड्रेस असेल.