Fancy number for car : काही लोकांना वाहनांबाबत इतके प्रेम असते की त्यावर ते वारेमाप पैसा खर्च करतात. वाहन घेतल्यानंतर त्यात महागडे अ‍ॅक्सेसरीज बसवतात. इतकेच नव्हे तर आपले वाहन इतरांपेक्षा अनोखे आणि चटकन लक्षात यावे यासाठी त्याला फॅन्सी क्रमांक देखील देतात. फॅन्सी वाहन क्रमांक मिळणवणे महागडे ठरू शकते. मात्र, वाहनाच्या प्रेमापोटी काही लोक पैशांचा विचार करत नाही. तुम्हाला जर फॅन्सी वाहन क्रमांक हवा असेल तर आज तुम्हाला ते कसे मिळवता येईल? याबाबत माहिती देत आहोत.

फॅन्सी वाहन क्रमांक मिळवण्याची प्रक्रिया जटील आहे. अर्जकर्त्याला वाहन क्रमांक मिळवण्यासाठी ई – ऑक्शन प्रक्रियेत सहभाग घ्यावा लागतो. फॅन्सी वाहन क्रमांक मिळवण्यासाठीची प्रक्रिया पुढील प्रमाणे आहे.

liquor
परमीट रुममधील ‘मद्य’भेसळ आटोक्यात येणार! तपासणी यंत्र खरेदीसाठी शासनाची मान्यता
viral video of rainbow panipuri
हळदीच्या पुऱ्या, पालकाचे पाणी… पाहा ‘रेनबो पाणीपुरी’चा व्हायरल Video!; नेटकरी म्हणतात, “नको…”
How Much Green Tea Should One Drink In A Day?
Green Tea: ग्रीन टी दिवसातून किती वेळा घ्यावी? ग्रीन टी पिताना ‘या’ चुका करु नका
Pimpri-Chinchwad mnc
पिंपरी-चिंचवड महापालिकेचा वादग्रस्त निर्णय : एका बँकेत ९८४ कोटी अडकल्यानंतरही ठेवी पुन्हा खासगी बँकेत

१) ऑनलाइन नोंदणी

फॅन्सी वाहन क्रमांक ई ऑक्शनच्या माध्यमातून उपलब्ध असल्याने फॅन्सी वाहन क्रमांक ऑनलाईन कार डिलरशीपकडे उपलब्ध असते. कार मालकाला आरटीओला भेट न देता यादीतील फॅन्सी क्रमांक निवडता येते.

  • पब्लिक युजर म्हणून एमओआरटीएचच्या अधिकृत संकेतस्थळावर जा.
  • साईन इन अप केल्यानंतर खात्यात लॉग इन करून फॅन्सी क्रमांक निवडा.
  • फॅन्सी क्रमांक मिळवण्यासाठी नोंदणीसाठी शुल्क भरून क्रमांक बूक करा.
  • क्रमांकासाठी लिलावाच्या प्रक्रियेतून गेल्यानंतर निकाल लागतो.
  • निकाल लागल्यानंतर शिल्लक रक्कम जमा करा किंव रिफंड घ्या.
  • रेफरेन्ससाठी अलोटमेंट लेटरची प्रिंट घ्या.

२) फॅन्सी क्रमांकासाठी शुल्क

कारसाठी फॅन्सी क्रमांक मिळवण्यासाठी द्यावे लागणारे शुल्क आणि नोंदणी शुल्क हे राज्यांनुसार भिन्न असतात. फॅन्सी वाहन क्रमांक हे वाहनाच्या प्रकारावर अवलंबून असते. सुपर एलाइट, सिंगल डिजिट, सेमी फॅन्सी क्रमांक या भिन्न श्रेणीनुसार फॅन्सी क्रमांक मिळतात.

३) वाहन क्रमांक मिळण्यासाठी लागणारा कालावधी

नोंदणी केल्यानंतर अर्जदाराला फॅन्सी वाहन क्रमांक मिळण्यासाठी जवळपास ५ दिवसांचा कालावधी लागतो. संकेतस्थळावर नोंदणी केल्यानंतर चौथ्या दिवशी लिलाव प्रक्रिया सुरू होते आणि ती पाचव्या दिवशीपर्यंत चालते. एकदा अलोटमेंट लेटर मिळाले की अर्जदाराला आपले वाहन आरटीओकडे नोंदवण्यासाठी ९० दिवसांचा कालावधी मिळतो.