scorecardresearch

रुपया खर्च न करता लॅपटॉपचा वेग करा सुपरफास्ट; ‘या’ ५ टिप्स वाचवतील पैसे व वेळ

How To Increase Laptop Speed: अशावेळी रिस्टार्ट करा ना असा एक सल्ला प्रत्येक जण देतो पण जेव्हा तुम्ही रिस्टार्ट करायला जाता तेव्हाच नेमका लॅपटॉप अपडेटला जातो. एकीकडे वेळेचा खोळंबा..

How To Increase Laptop Speed What To do When PC and Laptop Hanging Frequently Smart Tech Tips Without Spending Money
रुपया खर्च न करता लॅपटॉपचा वेग करा सुपरफास्ट (फोटो: लोकसत्ता ग्राफिक्स टीम)

How To Make Laptop Work Fast: अनेकदा आपण काम करायला बसलो की लॅपटॉपचं काही ना काहीतरी बिनसतं. यापेक्षा हाताने पत्र पटकन लिहून झालं असतं असं वाटावं इतका लॅपटॉप स्लो काम करायला लागतो. अशावेळी रिस्टार्ट करा ना असा एक सल्ला प्रत्येक जण देतो पण जेव्हा तुम्ही रिस्टार्ट करायला जाता तेव्हाच नेमका लॅपटॉप अपडेटला जातो. एकीकडे वेळेचा खोळंबा होतो तो वेगळाच पण अनेकदा तुम्ही खोटं कारण देताय असंही तुमचे अन्य सहकारी बोलू शकतात. सहकाऱ्यांची, बॉसची बोलणी खावी लागू नयेत यासाठी आज आपण लॅपटॉपचा स्पीड वाढवण्यासाठी काही सोप्या टिप्स पाहणार आहोत.

लॅपटॉपचा स्पीड कसा वाढवावा? (How To Boost Laptop Speed)

१) लॅपटॉपवर खूप टॅब्स सुरु असतील तर ते आधी बंद करा. टॅब्समुळे प्रोसेसर आणि रॅमवर परिणाम होऊन लॅपटॉपचा स्पीड कमी होऊ शकतो.

२) तुमचा लॅपटॉप वारंवार अपडेटला जात असेल तर तुम्ही सेटिंगमध्ये जाऊन दिवसातील एक वेळ निवडून त्याच वेळी लॅपटॉप रिफ्रेश व अपडेट होईल असे निवडून ठेवा जेणेकरून तुमचा कामाचा वेळ वाया जाणार नाही.

३) अनेक प्रोग्राम्स डिव्हाइसच्या बॅकग्राउंडमध्ये चालू असतात. Ctrl + Shift + Esc एकाच वेळी दाबून तुम्ही बॅकग्राउंडमध्ये किती अ‍ॅप्स चालू आहेत ते पाहू शकता. वापरात नसलेल्या प्रोग्रामवर राईट क्लिक करा आणि End Task चा पर्याय निवडा.

४) कॅशे मेमरी साफ करते. ऑपरेटिंग सिस्टम अपडेट करा. तुमच्या लॅपटॉप मधील RAM व हार्ड ड्राइव्ह वेळोवेळी अपडेट करा.

५) जेव्हा लॅपटॉप गरम होतो त्याला परफॉर्मन्स थ्रॉटलिंग म्हणतात. जेव्हा लॅपटॉप जास्त गरम होतो, तेव्हा लॅपटॉपच्या आतल्या कूलिंग फॅनद्वारे तुम्हाला मोठा आवाज ऐकू येतो. यावेळी कूलिंग पॅड वापरू शकता किंवा थोड्यावेळ लॅपटॉप बंद करा.

हे ही वाचा<< घरातील LED बल्बमुळे महिन्याच्या वीज बिलामध्ये किती खर्च येतो माहितेय का? पाहा सोपी आकडेवारी

दरम्यान अनेकदा आपण लॅपटॉप बंद करताना सर्व ऍप बंद करत नाही आणि थेट शट डाऊन करून मोकळे होतो, असे केल्याने लॅपटॉप कालानंतरने आपोआप कमी स्पीडमध्ये काम करू लागतो. लॅपटॉपवर सतत धूळ बसू देऊ नका. मेमरीसह लॅपटॉपचा कीबोर्ड, माउस प्लग सुद्धा वेळोवेळी स्वच्छ करा.

मराठीतील सर्व FYI ( Do-you-know ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

First published on: 01-03-2023 at 17:34 IST
ताज्या बातम्या