scorecardresearch

स्वयंपाक करताना अचानक गॅस संपण्याची भीती? आता व्हा टेंशन फ्री, जाणून घ्या शिल्लक गॅस ओळखण्याच्या सोप्या पद्धती

गॅस अचानक संपल्यामुळे स्त्रीयांना स्वयंपाक करताना अडचणींचा सामना करावा लागतो

स्वयंपाक करताना अचानक गॅस संपण्याची भीती? आता व्हा टेंशन फ्री, जाणून घ्या शिल्लक गॅस ओळखण्याच्या सोप्या पद्धती
स्वयंपाक करता करता अचानक गॅस संपण्याची भीती? (Photo : Indain Express)

एलपीजी गॅसमुळे स्वयंपाकघरातील कामे खूप सोप्पी झाली आहेत. शिवाय गॅस आता जवळपास सर्वांच्या घरामध्ये उपलब्ध देखील झाला आहे. गॅसमुळे स्वयंपाकघरातील कामं सोप्पी होत असली तरीदेखील अनेकदा गॅस सिलिंडर अचानक संपल्यामुळे, स्त्रीयांना स्वयंपाक करताना अडचणींचा सामना करावा लागतो.

शिवाय घरातील गॅस संपला आणि तो आणण्यासाठी जर घरात कोणी उपलब्ध नसेल तर त्यावरुन त्यांची चिडचिड देखील होते आणि या कारणावरुन घरात वादही होतात. तर ‘गॅस संपला हे ऐनवेळी सांगता, गॅस संपत आला हे तुम्ही आधी का सांगत नाही?’ असा घरातील स्त्रीयांना पुरुषांचा प्रश्न हमखास असतो. त्यामुळे गॅस संपण्यापुर्वी जर आपणाला तो कधी संपणार आहे याचा अंदाज आला तर तो वेळेत आणता येईल आणि त्यामुळे होणारे किरकोळ वाद आणि अडचणी दोन्ही दूर होतील. त्यासाठी तुम्हाला सिलिंडरमध्ये गॅस किती शिल्लक किती आहे? याची माहिती करुन घेणं खूप गरजेचं आहे.

हेही पाहा- अजबच! आई-वडीलांनी मुलाला चक्क रात्रभर टीव्हीसमोर बसवलं अन्…; कारण जाणून तुम्हीही व्हाल हैराण

सिलिंडरमध्ये गॅस किती शिल्लक राहिला आहे, हे ओळखण्याबाबत काही उपाय आहेत ते जाणून घेऊयात. अनेक लोकं सिलिंडर उचलून त्याच्या वजनानुसार गॅस किती शिल्लक राहिला आहे याचा अंदाज लावतात. तर काही जण गॅसच्या बर्नरमधून येणाऱ्या आगीचा रंग निळा असतो तो पिवळा झाला की गॅस संपल्याचा अंदाज लावतात. पण तो केवळ अंदाज झाला. नेमका गॅस किती उरला यासाठी सर्वात सोप्पा उपाय कोणता ते जाणून घेऊयात.

सिलिंडरमधील शिल्लक गॅस तपासण्यासाठी तुम्हाला एक कपडा पाण्यात भिजवा, भिजवलेला ओला कपडा गॅस सिलेंडरला गुंडाळून १ मिनिटापर्यंत ठेवा. एक मिनिट झाला की गुंडाळलेलं कापड काढा. ते कापड काढल्यावर तुम्हाला सिलेंडरवरील काही भाग सुकलेला, तर काही भाग ओला दिसेल. जो भाग ओला दिसतोय तेवढा सिलिंडर अजून शिल्लक असेल.

हेही वाचा- ज्योतिषाचा सल्ला शेतकऱ्याला पडला महागात, सापाला जीभ दाखवली अन् आयुष्यभरासाठी गमावला…

आता हे असं कसं घडलं? याबाबत तुमच्या मनामध्ये प्रश्न निर्माण झाला असेल, तर त्याचं कारण म्हणजे, रिकामा असणारा सिलेंडरचा भाग जेव्हा गरम होतो तेव्हा त्या भागातील पाणी लवकर शोषलं जातं. शिवाय सिलिंडरचा ज्या भागामध्ये गॅस अजून शिल्लक आहे तो भाग रिकाम्या भागाच्या तुलनेत थंड राहतो त्यामुळे त्या ठिकाणचे पाणी सुकायला थोडा वेळ लागतो. अशाप्रकारे तुम्हा एका कापडाच्या साह्याने सिलिंडर न उचलता त्यामध्ये गॅस किती शिल्लक आहे माहिती करुन घेऊ शकता.

मराठीतील सर्व FYI ( Do-you-know ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

First published on: 27-11-2022 at 17:27 IST

संबंधित बातम्या